Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

स्वातंत्र्यदिनी भंडारदरा, कळसूबाई फिरण्याचा प्लॅन आहे? आधी पोलिसांचे ‘हे’ नवीन वाहतूक नियम नक्की वाचा!

August 12, 2026

संगमनेरमध्ये ‘बाजारपेठ व्यापारी मित्र मंडळा’चा ऐतिहासिक निर्णय; यंदा गणपती वर्गणीसाठी वापरणार ‘डिजिटल पावती ॲप’

August 12, 2026

हॉटेल सुरभीपर्यंत पोहोचले बनावट दारूचे धागेदोरे; आस्थापना कायमस्वरूपी सील करा, शिवसेनेच्या (ठाकरे गट) अमर कतारी यांची मागणी

August 12, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » पद्म पुरस्कार शिफारस समितीच्या अध्यक्षपदी भाजपच्या या नेत्याची निवड; समितीत यांचा आहे समावेश…
सामाजिक

पद्म पुरस्कार शिफारस समितीच्या अध्यक्षपदी भाजपच्या या नेत्याची निवड; समितीत यांचा आहे समावेश…

समिती पद्म पुरस्कारासाठी करणार शिफारस
अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरAugust 4, 2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज

मुंबई – वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्यांना वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्यांना पद्म पुरस्काराने गौरविले जाते. पद्म पुरस्कारांसाठी या नावांची शिफारस करण्याकरिता महाराष्ट्रात समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीच्या अध्यक्षपदी भारतीय जनता पक्षाचे सुधीर मुनगंटीवार यांची निवड करण्यात आली आहे.

यांचाही आहे समितीत समावेश : मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या या समितीत दिलीप वळसे पाटील, दादा भुसे, चंद्रकांत पाटील, धनंजय मुंडे, उदय सामंत आणि राजशिष्टाचार विभागाचे अप्पर मुख्य सचिव यांचा समावेश आहे.

कधीपासून दिले जातात हे पुरस्कार : अतिशय मानाच्या समजल्या जाणाऱ्या या पुरस्काराचे वितरण 1954 पासून केंद्र सरकार करते. पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री अशा तीन प्रकारात हे पुरस्कार विभागून देतात. २६ जानेवारीच्या पू्र्वसंध्येला हे पुरस्कार जाहीर करण्यात येतात. तर मार्च अथवा एप्रिलमध्ये या पुरस्कारांचे वितरण राष्ट्रपतींच्या हस्ते करण्यात येते.

असे आहे पुरस्काराचे स्वरूप : महामहिम राष्ट्रपतींची स्वाक्षरी असलेले पुरस्कारपत्र आणि एक पदक असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. हे पुरस्कार विविध क्षेत्रात असामान्य, विशेष आणि उच्चस्तरीय कार्यासाठी प्रदान करण्यात येतात.

केंद्र सरकारने दिले निर्देश : वेगवेगळ्या क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केलेल्या मान्यवरांची पद्म पुरस्कारांसाठी शिफारस करण्याचे निर्देश केंद्र सरकारकडून राज्य सरकारला देण्यात आले या पुरस्कारांसाठी नावाची शिफारस ही समिती करेल. समितीच्या माध्यमातून प्राप्त झालेल्या नावांची छाननी करून ती केंद्राकडे पाठविली जातील.

कोण करत पद्म पुरस्कारांची निवड : पद्म पुरस्कारासाठी मान्यवरांची निवड करण्यासाठी देशाच्या पंतप्रधानांकडून दरवर्षी नियुक्त करण्यात आलेली समिती करत असते. या समितीला पद्म-पुरस्कार-समिती असं म्हटलं जातं. राज्य शासनाकडून गठित करण्यात आलेली समिती मान्यवरांच्या नावांची शिफारस या समितीकडे करते. समिती शिफारस करण्यात आलेल्या नामांकनातून पुरस्कारासाठी नावे निश्चित करतात. त्यानंतर ही नावे पंतप्रधान आणि राष्ट्रपतींच्या मान्यतेसाठी सादर करण्यात येते.

यांचा असतो समितीत समावेश : या समितीचे प्रमुख मंत्रिमंडळ सचिव (कॅबिनेट सेक्रेटरी) असतात. तसेच गृहसचिव, राष्ट्रपतींचे सचिव आणि चार ते सहा ख्यातनाम व्यक्तींचा या समितीत समावेश असतो.

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 566
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

हॉटेल सुरभीपर्यंत पोहोचले बनावट दारूचे धागेदोरे; आस्थापना कायमस्वरूपी सील करा, शिवसेनेच्या (ठाकरे गट) अमर कतारी यांची मागणी

August 12, 2026

नाशिक–पुणे सेमी हायस्पीड रेल्वेसाठी आमदार सत्यजीत तांबे यांच्या आवाहनाला युवकांचा वाढता प्रतिसाद, फ्रेंडशिप डेच्या संदेशातून ९ ऑगस्टच्या चक्काजाम आंदोलनाचे आवाहन

August 2, 2026

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे संगमनेर शहरात अद्यावत स्मारक उभारणार : माजी आमदार डॉ. सुधीर तांबे

August 1, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
प्रशासन

स्वातंत्र्यदिनी भंडारदरा, कळसूबाई फिरण्याचा प्लॅन आहे? आधी पोलिसांचे ‘हे’ नवीन वाहतूक नियम नक्की वाचा!

By अनंत पांगारकरAugust 12, 20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन  अहिल्यानगर: अहिल्यानगर पोलीस प्रशासनाने १५ आणि १६ ऑगस्ट रोजी अकोले तालुक्यातील…

संगमनेरमध्ये ‘बाजारपेठ व्यापारी मित्र मंडळा’चा ऐतिहासिक निर्णय; यंदा गणपती वर्गणीसाठी वापरणार ‘डिजिटल पावती ॲप’

August 12, 2026

हॉटेल सुरभीपर्यंत पोहोचले बनावट दारूचे धागेदोरे; आस्थापना कायमस्वरूपी सील करा, शिवसेनेच्या (ठाकरे गट) अमर कतारी यांची मागणी

August 12, 2026

बुधवार, १२ ऑगस्ट २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

August 12, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.