Author: अनंत पांगारकर

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर : माणसाला आयुष्याच्या प्रवासाने भाकरीची खरी किंमत शिकवली आहे. त्याच भाकरीच्या भुकेने निर्माण झालेल्या समृद्ध साहित्यातून सामान्य माणसाच्या जगण्याच्या वेदना अत्यंत प्रभावीपणे टिपल्या गेल्या आहेत. त्यामुळेच नारायण सुर्वे यांच्यासारख्या थोर कवीचे साहित्य माणसाला संकटांशी लढण्याची, जगण्याची हिंमत आणि नवी शक्ती देते, असे प्रतिपादन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष व ज्येष्ठ संपादक उत्तम कांबळे यांनी केले. संगमनेर येथील साहित्य कला व सांस्कृतिक संघ आणि सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात वरिष्ठ महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘साहित्य जत्रा’ कार्यक्रमात संमेलनाध्यक्ष म्हणून ते बोलत होते. या साहित्य सोहळ्याचे उद्घाटन राज्याचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते करण्यात आले.…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर: तालुक्यातील जांबुत बुद्रुक येथे चारित्र्याच्या संशयातून होणाऱ्या सततच्या शारीरिक व मानसिक छळाला कंटाळून एका २८ वर्षीय विवाहितेने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. विठाबाई विकास घुले असे मृत महिलेचे नाव असून, या हृदयद्रावक घटनेमुळे पठार भागात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी मृत महिलेच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून घारगाव पोलिसांनी पतीसह सासरच्या तिघांविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, विठाबाई या घरच्यांना शेतात जात असल्याचे सांगून निघाल्या होत्या, मात्र त्या दीर्घकाळ परत न आल्याने कुटुंबीयांनी त्यांची शोधमोहीम सुरू केली होती. सुरुवातीला घारगाव पोलीस ठाण्यात त्या हरवल्याची तक्रारही नोंदवण्यात आली होती. शोध सुरू असताना…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर: घारगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत बेकायदेशीर वाळू वाहतुकीवर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. येठेवाडी गावाच्या शिवारातून अवैध वाळू घेऊन जाणाऱ्या एका लाल रंगाच्या टाटा डंपरवर पोलिसांनी छापा टाकून चालकाला ताब्यात घेतले आहे. या कारवाईत पोलिसांनी एकूण १० लाख २० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, १३ जुलै २०२६ रोजी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास घारगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बाबासाहेब बोरसे यांना एका गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली. येठेवाडी गावाच्या शिवारातून एक लाल रंगाचा टाटा कंपनीचा डंपर (क्रमांक MH 20 DT 0239) बेकायदेशीररीत्या वाळू भरून १९ मैल मार्गे घारगावच्या दिशेने जाणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर: ग्लोबल वॉर्मिंगचे गंभीर संकट, अपुरा पाऊस, वाढलेली उष्णता आणि दुष्काळाच्या दाहकतेवर मात करण्यासाठी पर्यावरण संवर्धन करणे ही आता प्रत्येकाची नैतिक जबाबदारी बनली आहे. या पार्श्वभूमीवर, चालू वर्षी दंडकारण्य अभियानांतर्गत सर्वांनी जास्तीत जास्त वृक्ष लागवड करून त्यांचे अत्यंत जबाबदारीने संगोपन करावे. वृक्षारोपण आणि त्याचे संवर्धन करणे हीच खरी मानवतेची आणि ईश्वराची सर्वोत्तम सेवा ठरेल, असे प्रतिपादन दंडकारण्य अभियानाचे मुख्य प्रवर्तक व माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी केले आहे. सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर आयोजित दंडकारण्य अभियानाच्या विशेष नियोजन बैठकीत ते बोलत होते. या प्रसंगी व्यासपीठावर कारखान्याचे व्हाईस चेअरमन पांडुरंग पाटील घुले, प्रकल्प प्रमुख…

Read More

आजचे राशिभविष्य मेष- आजचा दिवस तुमच्यासाठी प्रगतीकारक आणि धनलाभ घडवून आणणारा ठरेल. गजकेसरी योगामुळे कामाच्या ठिकाणी मोठे यश मिळण्याची शक्यता आहे. वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामाचे कौतुक करतील, मात्र कोणाशीही बोलताना कठोर शब्दांचा वापर करणे टाळावे. वृषभ- आज तुमची आर्थिक स्थिती सुधारेल आणि जुनी अडकलेली कामे मार्गी लागतील. नवीन हितसंबंध जोडले जातील, ज्यामुळे मनाला आनंद मिळेल. नवीन गुंतवणूक किंवा मोठा निर्णय घेताना घाई गडबड करू नका, अनुभवी लोकांचा सल्ला घेणे फायदेशीर ठरेल. मिथुन- आज मनात कोणताही संभ्रम न ठेवता कामावर लक्ष केंद्रित केल्यास यश निश्चित मिळेल. कौटुंबिक जीवनात सुख-शांती नांदेल आणि घरातील जुन्या समस्या दूर होतील. तब्येतीची थोडी काळजी घ्या आणि…

Read More

पुणे: सासवड-जेजुरी रस्त्यावरील बेलसर टोलनाक्याजवळ टोलनाक्याजवळ दिंडीच्या ट्रकने धडक दिल्यामुळे सांगली जिल्ह्यातील तीन महिला वारकऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून चार जणी गंभीर जखमी झाल्या आहेत. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा जेजुरी येथे मुक्कामी आल्यानंतर हा अपघात घडला. नांदेड जिल्ह्यातील एका दिंडीच्या ट्रकने रस्त्याच्या कडेला असलेल्या वारकरी महिलांना धडक दिली. या अपघातात सांगली जिल्ह्यातील नंदा पवार, माधवी सलगरे आणि राजश्री भोसले या तीन महिलांचा मृत्यू झाला, तर अन्य जखमींवर जेजुरीतील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी गुन्हा दाखल करत अपघात करणाऱ्या ट्रक चालकाला ताब्यात घेतले आहे. या दुर्दैवी घटनेची माहिती मिळताच राज्याच्या उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी तातडीने…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन  अहिल्यानगर:  राज्यातील शेतकऱ्यांना आर्थिक संरक्षण देण्यासाठी सन २०२६-२७ या आर्थिक वर्षात सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना लागू करण्यात आली आहे. चालू खरीप हंगामात सरासरी उत्पादन उंबरठा उत्पादनापेक्षा कमी झाल्यास शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली जाणार आहे. हवामान खात्याचा अंदाज पाहता शेतकऱ्यांनी ३१ जुलै २०२६ पूर्वी या योजनेत जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन कृषी आयुक्तालयाचे संचालक विनयकुमार आवटे यांनी केले आहे. या योजनेअंतर्गत खरीप हंगामातील भात, ज्वारी, बाजरी, नागली, मूग, उडीद, तूर, मका, भुईमूग, तीळ, कारळे, सोयाबीन, कापूस आणि खरीप कांदा अशा एकूण १४ पिकांचा समावेश करण्यात आला आहे. सर्वसाधारण पिकांसाठी विमा संरक्षित रकमेच्या दोन टक्के…

Read More

आजचे राशिभविष्य मेष- आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत उत्साहाचा आणि उर्जावान राहील. नवीन कामाची सुरुवात करण्यासाठी वेळ उत्तम असून केलेल्या मेहनतीला चांगले यश मिळेल. दुपारनंतर आर्थिक अडचणी दूर होतील, मात्र महत्त्वाचे निर्णय घेताना द्विधा मनःस्थिती झाल्यास घाईगडबड न करता तो निर्णय पुढे ढकलणे योग्य ठरेल. नोकरी बदलू इच्छिणाऱ्या लोकांसाठी आजचा काळ शुभकारक ठरेल. वैवाहिक जीवनात आनंदी वातावरण राहील आणि कुटुंबासोबत उत्तम भोजनाचा आनंद घेता येईल. वृषभ- तुमच्यासाठी आजचा दिवस अत्यंत शुभ आणि फलदायी असणार आहे. कामाच्या ठिकाणी नवीन आणि मोठ्या जबाबदाऱ्या तुमच्यावर सोपवल्या जाऊ शकतात, ज्यामुळे तुमचा प्रभाव वाढेल. व्यवसायाच्या निमित्ताने नवीन प्रवासाचे योग जुळून येत आहेत. आज तुम्ही तुमच्या गोड…

Read More

नाशिक: जयहिंद लोकचळवळीच्या कृषी विभागातर्फे आयोजित ‘राज्यस्तरीय युवा शेतकरी सन्मान सोहळा २०२६’ उत्साहात पार पडला. नाशिक येथे झालेल्या या सोहळ्यात राज्यभरातील आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेतीत नावीन्यपूर्ण प्रयोग करणाऱ्या युवा शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला. हरितक्रांतीचे प्रणेते, माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात येणाऱ्या या उपक्रमाचे यंदा दहावे वर्ष होते. लोकनेते बाळासाहेब थोरात आणि जयहिंद लोकचळवळीचे संस्थापक माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच आमदार सत्यजीत तांबे यांच्या पुढाकारातून हा उपक्रम राबविण्यात येतो. कार्यक्रमाला राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल, दिंडोरीचे खासदार भास्कर भगरे, सह्याद्री फार्म्सचे संस्थापक विलास अण्णा शिंदे, आमदार मनोज कायंदे, जयहिंद महिला मंचच्या अध्यक्ष…

Read More

अमोल शेलकर अयोध्या राम मंदिराची उभारणी हा कोट्यवधी हिंदूंच्या श्रद्धेचा आणि अस्मितेचा विषय आहे. देश-विदेशातून सामान्य नागरिकांनी आपल्या कष्टाची कमाई या मंदिरासाठी दान केली. परंतु, गेल्या काही दिवसांत समोर आलेले मीडिया रिपोर्ट्स, मंदिराचे माजी कर्मचारी आणि स्थानिक साधू-संतांचे दावे पाहिले तर या श्रद्धेला भ्रष्टाचाराचे ग्रहण लागल्याचे दिसून येत आहे. या प्रकरणाचा आढावा घेतल्यास दोन मुख्य प्रकारच्या गंभीर गडबडी समोर येतात, ज्यामध्ये पहिली पैशांच्या व दागिन्यांच्या चोरीची आणि दुसरी जमीन खरेदीतील कोट्यवधींच्या घोटाळ्याची आहे. राम मंदिरामध्ये भक्तांची प्रचंड गर्दी असते आणि तिथे एकूण ३५ दानपेट्या ठेवण्यात आल्या आहेत. या पेट्या भरल्यानंतर त्यातील दान सुरक्षित लोखंडी पेट्यांमध्ये साठवले जाते आणि तिथून अवघ्या…

Read More