Author: अनंत पांगारकर
संगमनेर, दि. २ एप्रिल – प्रतिनिधी संगमनेरची आंतरराष्ट्रीय सायकलपटू प्रणिता सोमणला राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी युरोपमध्ये प्रशिक्षणासाठी जाण्याकरिता पाच लाख रुपयांची आर्थिक मदत केली आहे. संगमनेर चे आमदार अमोल खताळ यांच्या माध्यमातून मदतीचा हा धनादेश सोमण कुटुंबीयांना प्रदान करण्यात आला आहे.संगमनेरची सायकल पटू असलेल्या प्रणिता सोमण हिने राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर सायकलिंग मध्ये अनेक बक्षिसे मिळवत देशाचे नाव सर्वत्र उंचावले आहे. राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदकाची मानकरी ठरलेल्या प्रणिताचा आमदार अमोल खताळ यांनी नुकताच डॉ. प्रफुल्ल सोमण यांच्या घरी जाऊन सत्कार केला होता. त्यावेळी प्रणिताच्या वडिलांनी युरोपमधील प्रशिक्षणासाठी आर्थिक मदतीची गरज असल्याच खताळ यांना सांगितले. खताळ यांनी तात्काळ राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे…
शिर्डी, दि. २ एप्रिल – थोरात कारखान्यापाठोपाठ, आता पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण, पुणे यांनी जाहीर केला आहे. पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्यासाठी ९ मे २०२५ रोजी मतदान होणार आहे, आणि १० मे रोजी मतमोजणीनंतर निकाल घोषित केला जाणार आहे. नामनिर्देशन पत्रे गुरुवारपासून (३ एप्रिल) ते ९ एप्रिल या कालावधीत निवडणूक निर्णय अधिकारी, शिर्डी यांचे कार्यालय, राहाता प्रशासकीय इमारत (राहाता तहसील कार्यालय) पहिला मजला, राहाता येथे सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत मिळतील आणि स्वीकारण्यात येतील. प्राप्त नामनिर्देशन पत्रांची छाननी ११ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता…
शिर्डी, दि. २ एप्रिल – शिर्डीत शनिवारपासून (दि. ५) ते सोमवार (दि. ७) या काळात श्री साईबाबा संस्थानतर्फे ११४ वा श्रीरामनवमी उत्सव साजरा होणार आहे. या उत्सवाची तयारी पूर्ण झाली असून, १ लाख ७३ हजार भक्तमंडळ सभासदांना निमंत्रण पाठवण्यात आले आहे. या उत्सवात मुंबईच्या व्दारकामाई मंडळाने श्री गजमुख गणपतीचा देखावा सादर केला असून, मंदिर परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. सौदी अरेबियातील एका साईभक्ताने फुलांची सजावट केली आहे. उत्सव काळात विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, या उत्सवात विविध ठिकाणच्या ८७ पालख्या सहभागी होणार आहेत.…
संगमनेर, दि. २ एप्रिल – प्रतिनिधी राजहंस दूध संघाच्या ‘मिशन ५० लिटर’ उपक्रमाअंतर्गत कालवड संगोपन कार्यशाळेत माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी संघाच्या कार्याचे कौतुक केले. सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांनी शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी दूध संघाची स्थापना केली, आज तालुक्यात ९ लाख लिटर दूध उत्पादन होत आहे. कमी गाईंमध्ये जास्त दूध उत्पादन होण्यासाठी राजहंस दूध संघाचा ५० लिटर दूध उत्पादन करणाऱ्या गाई निर्माण करण्याचा उपक्रम दिशादर्शक आहे, असे प्रतिपादन माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले. यावेळी ५० लिटर दूध निर्मिती करणाऱ्या नवीन कालवडी आणि गाईंचे प्रदर्शन झाले. मिशन ५० लिटर अंतर्गत कालवड संगोपन योजना कार्यशाळेत थोरात बोलत होते. अध्यक्षस्थानी चेअरमन रणजीतसिंह देशमुख होते.…
संगमनेर, दि. २ एप्रिल – प्रतिनिधी सहकाराचे मोठे वलय लाभलेल्या संगमनेर तालुक्यात पतसंस्थांचे जाळे मोठ्या प्रमाणात भक्कमपणे विणले गेले आहे. या पतसंस्थांच्या माध्यमातून कोट्यावधी रुपयांची उलाढाल तालुक्यात होत असते. घुलेवाडी येथील स्वातंत्र्य सैनिक भास्करराव दुर्वे नाना ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेने मावळत्या आर्थिक वर्षात मोठे यश मिळविले आहे. संस्थेने आर्थिक वर्षांमध्ये १३ कोटी १२ लाख ६२५ रुपयांची उलाढाल करत ९ लाख ११ हजार रुपयांचा नफा मिळवला असल्याची माहिती देण्यात आली आहे. मावळत्या आर्थिक वर्ष अखेर पतसंस्थेकडे १० कोटी ४८ लाख ४० हजार ३०३ रुपयांच्या ठेवी असून, ८ कोटी २३ लाख ५८ हजार ७०० रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले आहे. तसेच…
संगमनेर, दि. १ एप्रिल – प्रतिनिधी संगमनेरमधील टोमॅटो व्यापारी भाऊसाहेब शंकर मेहेत्रे यांची राजस्थानमधील ललित रामचंद्र चंदावनी या टोमॅटो व्यापाऱ्याने सुमारे १९ लाख रुपयांची फसवणूक केली. या प्रकरणी संगमनेर शहर पोलिसांनी चंदावनी याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भाऊसाहेब मेहेत्रे यांनी संगमनेरमधून टोमॅटो खरेदी करून ते राजस्थानमधील राम ट्रेडिंग कंपनीला (मालक: ललित रामचंद्र चंदावनी, रा. जोधपूर, राजस्थान) वेळोवेळी पुरवले. मात्र, चंदावनीने या टोमॅटोचे पैसे मेहेत्रे यांना दिले नाहीत. त्यामुळे मेहेत्रे यांचे १९ लाख २२ हजार ४३३ रुपयांचे नुकसान झाले. या प्रकरणी भाऊसाहेब मेहेत्रे यांनी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी ललित रामचंद्र चंदावनी यांच्याविरुद्ध गुन्हा रजिस्टर…
संगमनेर, दि. १ एप्रिल – प्रतिनिधी संगमनेर येथील सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम पुण्याच्या राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने जाहीर केला आहे. विधानसभेपाठोपाठ आता संगमनेरमध्ये कारखान्यासाठीच्या निवडणुकीचा धुराळा उडणार आहे. त्यामुळे पुन्हा एकदा संगमनेरमध्ये निवडणूक ज्वर बघावयास मिळेल. निवडणूक कार्यक्रमानुसार ११ मे २०२५ रोजी मतदान होणार असून १२ मे रोजी मतमोजणीनंतर निकाल घोषित केला जाणार आहे. नामनिर्देशन पत्रे निवडणूक निर्णय अधिकारी संगमनेर यांच्या कार्यालयात ३ एप्रिल ते ९ एप्रिल या कालावधीत साप्ताहिक व शासकीय सुट्टीचे दिवस वगळून सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत मिळतील व स्वीकारण्यात येतील. प्राप्त नामनिर्देशन पत्रांची छाननी ११ एप्रिल रोजी सकाळी ११…
संगमनेर, दि. १ एप्रिल – प्रतिनिधी गोवत्स परमपूज्य श्री राधाकृष्णजी महाराज यांच्या अमृतवाणीतून संगमनेर येथे ९ दिवस श्रीराम कथेचे आयोजन करण्यात आले आहे. या कथेच्या निमित्ताने शहरातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली. मंगळवारी सकाळी निघालेल्या शोभायात्रेत ढोल ताशांच्या गजरात आणि सनई चौघड्याच्या सुरांनी संगमनेर शहर भक्तीमय वातावरणाने दुमदुमून गेले होते. शेकडो संगमनेरकर महिला पुरुषांसह या शोभायात्रेत माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, एकविरा फाउंडेशनच्या डॉ. जयश्री थोरात यांच्यासह आमदार अमोल खताळ यांच्या पत्नी नीलम यादेखील सहभागी झाल्या होत्या. संगमनेर शहरातील मालपाणी लॉन्स येथे १ एप्रिल ते ९ एप्रिल दरम्यान गोवत्स राधाकृष्ण महाराज यांच्या श्रीराम कथेचे आयोजन करण्यात आले आहे. कथेच्या शुभारंभानिमित्त संगमनेरमधील चंद्रशेखर…
महाराष्ट्र संवाद न्यूज मंगळवार, दि. १ एप्रिल येवला तालुक्यातील सावखेडा येथे दोन शाळकरी मुलांचा शेततळ्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याने परिसरात शोककळा पसरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सोमवार, ३१ मार्च रोजी सकाळी ८:३० च्या सुमारास सावखेडा येथील समाधान गोरे यांच्या शेततळ्यात शुभम शांताराम गोरे आणि साई संदीप कुमावत (वय १२) ही दोन मुले अंघोळीसाठी गेली होती. पाण्याचा अंदाज न आल्याने दोघेही शेततळ्यात बुडाले. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. येवला तालुका पोलिसांनी या प्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी येवला उपजिल्हा रुग्णालयात जाऊन मृत मुलांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. तसेच, मतदारसंघात पुन्हा…
मुंबई, दि. १ एप्रिल – राज्याचे बजेट सादर झाल्यानंतर आर्थिक संकटाचे भयावह चित्र समोर आले आहे. जमा आणि खर्चाचा ताळमेळ साधणे अशक्य होत असताना, राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी कठोर परिपत्रक जारी करून खर्चावर नियंत्रणाचे आदेश दिले आहेत. फुकट अनुदान योजनांना पूर्णपणे आळा घालण्याच्या सूचना दिल्याने, ‘लाडकी बहीण’ योजनेतील वाढीव २१०० रुपये मिळण्याची शक्यता जवळपास संपुष्टात आली आहे. डिसेंबर २०१९ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राष्ट्रीय परिषदेत सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांना मर्यादित निधीचा सुयोग्य वापर करून अनुत्पादक अनुदान योजना बंद करण्याचे आणि उत्पादक भांडवली खर्च वाढवण्याचे निर्देश देण्यात आले होते. मात्र, राज्यातील विधानसभा निवडणुकीदरम्यान महायुती सरकारने लोकप्रिय…
