Author: अनंत पांगारकर

संगमनेर, प्रतिनिधी:  संगमनेर शहर आणि तालुक्यात अवैध धंदे आणि कत्तलखान्यांनंतर आता चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. नुकत्याच शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत, निमोण आणि घारगाव येथे झालेल्या घरफोड्यांमध्ये लाखो रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने आणि रोकड लंपास करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, या सर्व घटना एकाच दिवशी घडल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. संगमनेरला पोलिस उपअधीक्षक दर्जाचे अधिकारी आणि संगमनेर शहर, संगमनेर तालुका आश्वी व घारगाव ही चार पोलिस ठाणी असूनही चोरट्यांवर पोलिसांचा कोणताही वचक राहिला नसल्याचे चित्र आहे. सोमवारी शहर हद्दीत रायते फाटा येथे झालेल्या घरफोडीत १ लाख ६६ हजारांचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरून नेला. मंगळवारी, संगमनेर तालुक्यातील पठार भागातील घारगाव पोलिस ठाण्याच्या…

Read More

मुंबई, दि. २ जुलै २०२५:  महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. आतापर्यंत कधीही न झालेल्या थेट मुलाखतींद्वारे तालुकाध्यक्षांची निवड प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या माध्यमातून कार्यक्षम आणि मेहनती कार्यकर्त्यांना संघटनेत महत्त्वाची पदे देऊन तळागाळापर्यंत पक्ष मजबूत करण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखालील निवड समितीने आतापर्यंत ८३ तालुकाध्यक्षांच्या नियुक्त्या केल्या आहेत. यात ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, आ. विजय वडेट्टीवार, आ. सतेज पाटील, नसीम खान, खासदार चंद्रकांत हंडोरे, खा. प्रणिती शिंदे, बी. एम. संदीप, कुणाल चौधरी, आणि ॲड. गणेश पाटील यांचा समावेश आहे. पक्ष निरीक्षकांनी केलेल्या शिफारसी आणि मुलाखतींच्या आधारे ही…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी:  संगमनेर शहरातील अवैध कत्तलखान्यांबाबत शासनाला खोटी आणि दिशाभूल करणारी माहिती दिल्याप्रकरणी संगमनेरचे उपविभागीय पोलीस अधिकारी (SDPO) आणि शहर पोलीस निरीक्षक (PI) यांच्यावर कारवाई करून त्यांना निलंबित करण्याची जोरदार मागणी आमदार अमोल खताळ यांनी विधानसभेत गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांकडे केली.  संगमनेरमधील कत्तलखान्यासंदर्भात खताळ यांनी सभागृहात मंगळवारी प्रश्न उपस्थित केला होता त्यावर राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले. फडणवीस यांच्या उत्तरानंतर पोलिसांनी सभागृहाला खोटी माहिती पुरविल्याचे खताळ यांनी बुधवारी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. आमदार खताळ यांनी सभागृहात सांगितले की, संगमनेर शहरात सर्रासपणे अवैध कत्तलखाने सुरू आहेत. मात्र, शहर पोलीस त्यांच्यावर केवळ थातुरमातुर कारवाई करत आहेत. गोवंश हत्याबंदी कायद्यातील…

Read More

पंढरपूर:  आषाढी वारीसाठी अवघे काही दिवस शिल्लक असताना, महाराष्ट्र राज्य सरकारने वारकऱ्यांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यंदाच्या वारीदरम्यान कोणत्याही वारकऱ्याचा अपघात, विषबाधा किंवा नैसर्गिक कारणांमुळे मृत्यू झाल्यास, त्यांच्या वारसांना आता 4 लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाईल. याशिवाय, वारीदरम्यान अपंगत्व आल्यास किंवा रुग्णालयात दाखल होण्याची वेळ आल्यास देखील आर्थिक मदतीची तरतूद करण्यात आली आहे. महसूल विभागाने याबाबतचे परिपत्रक नुकतेच जारी केले आहे. गेल्या वर्षीप्रमाणेच यंदाही आषाढी एकादशीसाठी मानाच्या 10 पालख्यांसोबतच्या 1109 दिंड्यांना प्रत्येकी 20 हजार रुपये अनुदान वितरित करण्यास शासनाने मान्यता दिली होती. आता या नव्या निर्णयामुळे वारकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी आणि त्यांना मदतीचा हात देण्यासाठी सरकारने आणखी एक पाऊल पुढे…

Read More

अहिल्यानगर:  बिगरशेती (Non-Agriculture – NA) कायद्यातील सुधारणा नियमांचे उल्लंघन करत, सातबारा उताऱ्यांमध्ये विनापरवाना फेरफार केल्याप्रकरणी अहमदनगर जिल्हाधिकाऱ्यांनी संगमनेरमधील चार महसूल कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे. या गंभीर प्रकरणात तत्कालीन तहसीलदारांचीही चौकशी करण्याची शिफारस विभागीय आयुक्तांकडे करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून ही माहिती मिळाली असून, यामुळे महसूल विभागात खळबळ उडाली आहे. जवळपास वर्षभरापूर्वीचे हे प्रकरण असून, या प्रकरणी तत्कालीन ग्राम महसूल अधिकारी भीमराज शांताराम काकड, मंडलाधिकारी वैशाली अंबादास मोरे, तलाठी पोमल दत्तात्रय तोरणे, आणि महसूल सहायक वसंत निवृत्ती वाघ या चौघांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. नेमकं काय घडलं?- संगमनेर नगरपालिका हद्दीतील तसेच गावठाणातील जागांशी संबंधित हे प्रकरण आहे. ४२ ब, ४२…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज: शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे नवनियुक्त नाशिक महानगरप्रमुख सुनील बागुल यांचे खंदे समर्थक मामा राजवाडे यांच्यासह अन्य काही जणांवर गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घरात घुसून तोडफोड करणे, मारहाण करणे, चोरी करणे आणि जीवे मारण्याची धमकी देणे असे आरोप त्यांच्यावर आहेत. या घटनेमुळे नाशिकच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरएसएस समर्थक आणि सराफ व्यावसायिक किशोर उर्फ गजू घोडके यांनी ठाकरे गटाचे उपनेते सुनील बागुल यांच्या गैरव्यवहाराचे आरोप करणारे व्हिडिओ २७ जून रोजी फेसबुकवर अपलोड केले होते. बागुल यांनी समाजसेवेच्या नावाखाली पैशांचा गैरव्यवहार करत कोट्यवधी रुपयांची संपत्ती जमवल्याचा आरोप घोडके यांनी या व्हिडिओतून केला होता…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी:  संगमनेरमधून जाणाऱ्या पुणे-नाशिक महामार्गावरील संगमनेर खुर्द आणि बुद्रुकला जोडणाऱ्या ब्रिटिशकालीन प्रवरा नदीवरील पुलासह राज्यातील जुन्या पुलांचे तातडीने स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची मागणी आमदार अमोल खताळ यांनी विधानसभेत केली आहे. याशिवाय, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीतील कामांच्या दिरंगाईवरही त्यांनी सभागृहाचे लक्ष वेधले. मुंबईत सुरू असलेल्या विधिमंडळ पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी आमदार खताळ यांनी हा महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला. प्रवरा नदीवरील हा पूल वाहतुकीसाठी जुना झाला असून त्याचे स्ट्रक्चरल ऑडिट होणे अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी सभागृहात सांगितले. याचवेळी, संगमनेर सार्वजनिक बांधकाम विभागाअंतर्गत येणारी रस्त्यांची कामे निर्धारित वेळेत पूर्ण होत नसल्याचा मुद्दाही त्यांनी उचलून धरला. शासन निधी उपलब्ध करून देत असतानाही कामे वेळेत…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज –  लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) मोठी कारवाई करत न्यायालयाच्या दोन लिपिकांना 35 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले आहे. भाडेकरूकडून सदनिकेचा ताबा मिळवून देण्यासाठी या लिपिकांनी सदनिका मालकाकडून लाचेची मागणी केली होती. या प्रकरणी न्यायालयाचे लिपिक रवींद्र हिंदुराव पवार (40) आणि अमित बबन भुसारी (34) यांच्याविरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे दोघेही भाडे नियंत्रण कायदा न्यायालयात कार्यरत आहेत. सिंहगड रोड येथील हिंगणे खुर्द येथील विशाल पार्क सोसायटीत तक्रारदारांची सदनिका आहे, ती त्यांनी भाड्याने दिली होती. भाडेकरू सदनिका सोडण्यास तयार नसल्याने तक्रारदारांनी भाडे नियंत्रण कायदा न्यायालयात खटला दाखल केला होता. न्यायालयाने तक्रारदारांच्या बाजूने निकाल…

Read More

अहिल्यानगर:  प्रेमाचे नाटक करत, अल्पवयीन मुलीचे (वय १७) फोटो व्हायरल करण्याची धमकी देत तिच्यावर दोन वेळा लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पीडित मुलीने सोमवारी (३० जून) पहाटे तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, कर्जत येथील एका अल्पवयीन मुलावर अत्याचार आणि पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जामखेड तालुक्यातील रहिवासी असलेली पीडित मुलगी कर्जत येथील महाविद्यालयात शिकत असताना, डिसेंबर २०२४ मध्ये तिची व्हॉट्सअ‍ॅपवरून संशयित आरोपीशी ओळख झाली. जानेवारी २०२५ मध्ये त्यांची कर्जत येथील कॅफेमध्ये पहिली भेट झाली. यानंतर मुलाने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केला. सुरुवातीला नकार दिल्यानंतर, पीडिता ‘नीट’ परीक्षेच्या तयारीसाठी अहिल्यानगर येथे आली. याच…

Read More

जामखेड:  जामखेड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान उपसभापती कैलास वराट यांच्या विरोधात बाजार समितीच्या १२ सदस्यांनी सोमवारी अविश्वास ठराव दाखल केला आहे. वराट हे बाजार समितीच्या सदस्यांना विश्वासात न घेता मनमानी पद्धतीने कामकाज करत असल्याची तक्रार या सदस्यांनी केली असून, त्यांना उपसभापती पदावरून दूर करण्याची मागणी अहिल्यानगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्याकडे करण्यात आली आहे. महाराष्ट्र कृषी उत्पन्न खरेदी-विक्री (विकास व विनियमन) अधिनियम १९६३ नुसार, जिल्हाधिकाऱ्यांना असे पत्र मिळाल्यानंतर पंधरा दिवसांच्या आत समितीची विशेष सभा बोलावून या विषयावर समिती सदस्यांच्या मतदानाद्वारे निर्णय घेण्याची तरतूद आहे. त्यामुळे आता जिल्हाधिकारी यावर काय निर्णय घेतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. अहिल्यानगर…

Read More