Author: अनंत पांगारकर

अहिल्यानगर दि. ०६ फेब्रुवारी – सुरक्षित वाहतुकीसाठी फेब्रुवारी अखेरपर्यंत जिल्ह्यातील महामार्गालगतची अतिक्रमणे त्वरित काढण्यात यावी आणि रस्त्याच्या बाजूला असलेले धोकादायक फलकही काढण्यात यावे, असे आदेश जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी दिले. मंगळवारी (०४ फेब्रुवारी) जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी हे आदेश दिले. बैठकीस सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता भरतकुमार बाविस्कर, उपजिल्हाधिकारी अतुल चोरमारे आणि विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी म्हणाले, रस्त्याच्या कडेला असणारी अतिक्रमणे काढण्यासाठी उपविभागीय अधिकारी समन्वयक अधिकारी म्हणून काम पाहतील. तोडलेल्या रस्ता दुभाजकांची दुरूस्ती करण्यात यावी. दुभाजक तोडणाऱ्या संबंधित पेट्रोल पंप चालक अथवा आस्थापना मालकावर कारवाई करावी. वाहतूक सुरक्षेबाबत सर्वेक्षण करण्यासाठी संस्थेची नियुक्ती करण्यात…

Read More

अहिल्यानगर, दि. ०६ फेब्रुवारी – शिर्डीत मंगळवारी भल्या पहाटे तीन जणांवर जीव गेला हल्ला करण्याचा प्रकार घडला. शिर्डी संस्थांच्या दोघा कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. या हत्याकांडाच्या पार्श्वभूमीवर शिर्डीच्या पोलीस निरीक्षकांची नियंत्रण कक्षात तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. शिर्डीचे पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांना नियंत्रण कक्षात बोलाविण्यात आले असून त्यांच्या जागेवर राहता पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रणजीत गलांडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गलांडे यांनी यापूर्वी शिर्डीत काम केले आहे. त्यामुळे त्यांच्यावर पुन्हा शिर्डी पोलीस ठाण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. याशिवाय गलांडे यांच्या रिक्त झालेल्या जागेवर आर्थिक गुन्हे शाखेतील पोलीस निरीक्षक नितीन चव्हाण यांची बदली करण्यात आली आहे. शिर्डीत घडलेल्या घटना नंतर…

Read More

शिर्डी, दि. ०६ फेब्रुवारी – साईबाबांच्या शिर्डीमध्ये दुहेरी हत्याकांडाचा प्रकार घडल्यानंतर सतर्क झालेल्या साई संस्थानने साई भक्तांसाठी आता मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी गुरुवारपासून लगेचच केली जाणार असल्याचे संस्थांनचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी म्हटले आहे. साई दर्शनासाठी रांगेत उभे असलेल्या साई भक्तांना आता दर्शन रांगेतच मोफत प्रसाद भोजन कुपन मिळणार आहे. तसेच, संस्थानच्या भक्त निवासात राहणाऱ्या भक्तांनाही हे कूपन वितरित केले जाणार आहे. दुहेरी हत्याकांड प्रकरणानंतर साई संस्थांचे यंत्रणा सतर्क झाली आहे. यापूर्वी साई संस्थानच्या प्रसादालयात थेट प्रवेश मिळत असे. ज्यामुळे मोफत जेवणासाठी कुणालाही सहज प्रवेश करता येत होता. यापूर्वी मोफत भोजनासाठी थेट प्रसादालयात प्रवेश दिला…

Read More

मुंबई दि. ०५ फेब्रुवारी –  मतदार संघात पायाभूत सुविधा, रस्ते, पाणीपुरवठा योजना, वीज, आरोग्य सेवा आणि ग्रामपंचायतींच्या विकासासंदर्भातील महत्त्वाच्या मुद्यांसंदर्भात चर्चा करत मतदारसंघातील गावांना सक्षम करण्यासाठी शासनाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. यासाठी संबंधित योजना मंजूर करून निधी लवकरात लवकर उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी आमदार अमोल खताळ यांनी ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे केली आहे. आमदार खताळ यांनी बुधवारी (०५फेब्रुवारी) मुंबई येथे ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे यांची सदिच्छा भेट घेऊन मतदारसंघातील विविध प्रलंबित प्रश्नांवर सविस्तर चर्चा केली. ग्रामस्थांच्या गरजा आणि स्थानिक प्रशासनाला भेडसावणाऱ्या अडचणी दूर करण्यासंदर्भात मंत्री गोरे यांनी सकारात्मक प्रतिसाद देत…

Read More

अहिल्यानगर दि. ०५- श्रीगोंदा येथे झालेल्या घटनेतील मृत व्यक्तीच्या कुटुंबियांची राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी घरी भेट घेवून सांत्वन केले. या संदर्भात उपोषणास बसलेल्या उपोषणकर्त्यांचीही त्यांनी भेट घेतली, यानंतर उपोषणकर्त्यांनी आपले उपोषण मागे घेतले. मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांना शासनामार्फत मदतीसाठी तातडीने प्रस्ताव तयार करून सादर करण्याचे निर्देशही मंत्री राणे यांनी प्रशासनाला दिले. यावेळी आमदार संग्राम जगताप, आमदार विक्रम पाचपुते, अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, तहसीलदार क्षितिजा वाघमारे, पोलीस निरीक्षक किरण शिंदे आदी उपस्थित होते.

Read More

संगमनेर, दि. ०५ फेब्रुवारी –  सांस्कृतिक उपक्रम हे व्यक्तिमत्व विकासाचे सर्वोत्तम साधन असून अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मुक्त आविष्कार असल्याचे प्रतिपादन संगमनेर नगर परिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक रामदास कोकरे यांनी केले आहे.  अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या वतीने यंदाचा कला महोत्सव दिगंबर गणेश सराफ विद्यालयात आयोजित करण्यात आला होता. या कला महोत्सवात नाटिका, नाट्यछटा, रंगभरण, भेटकार्ड आदी विविध स्पर्धांमधून दोन हजार विद्यार्थ्यांचा सहभाग नोंदविला गेला. स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ संगमनेर नगर परिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक रामदास कोकरे, बाल शिक्षण मंडळाचे अध्यक्ष डॉ. मुकुंद गाडगीळ यांच्या उपस्थितीत प्रा. डॉ. संजयकुमार दळवी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. यावेळी बोलताना कोकरे म्हणाले, कोणत्याही कलेची आवड सुसंस्कृत…

Read More

पुणे, दि. ०५ फेब्रुवारी – संत तुकाराम महाराजांचे अकरावे वंशज ह. भ. प. शिरीष महाराज मोरे (वय ३०) यांनी देहूतील आपल्या राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली आहे. प्राथमिक माहितीनुसार आर्थिक विवंचनेतून त्यांनी आत्महत्या केल्याचा अंदाज असून या घटनेमुळे देहू गावावर शोककळा पसरली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार शिरीष महाराज मोरे यांनी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास राहत्या घरी उपरण्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. काही दिवसापूर्वीच मोरे यांनी नुकतेच नवीन घर बांधले होते. खालच्या मजल्यावर आई-वडील आणि वरच्या मजल्यावर ते राहत होते. मंगळवारी रात्री ते आपल्या वरच्या खोलीत झोपण्यासाठी गेले होते. सकाळी साडेआठ वाजल्यानंतर देखील ते खाली आले नाही म्हणून घरातील लोकांनी…

Read More

संगमनेर दि. ०५ फेब्रुवारी – माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या माध्यमातून संगमनेर तालुक्यातील विविध गावांमधील देवस्थानचा पर्यटन निधी मधून मोठ्या प्रमाणात विकास झाला आहे. यातील वेल्हाळे, मालदाड, खळी, आश्वी येथील देवस्थान क वर्ग तीर्थस्थानाचा दर्जा देण्याची मागणी नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे यांनी अहिल्या नगरच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. वेल्हाळे येथील श्रीक्षेत्र हरीबाबा देवस्थान, मालदाड येथील चैतन्य मच्छिंद्रनाथ देवस्थान, आश्वी बुद्रुक येथील चैतन्य कानिफनाथ देवस्थान, खळी येथील खंडोबा महाराज देवस्थान आणि निळवंडे येथील दत्त महाराज देवस्थान या तीर्थस्थानांचा यात समावेश आहे. या संदर्भात आमदार तांबे यांनी म्हटले आहे की, माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुका अनेक मोठ्या विकास…

Read More

संगमनेर, ०५ फेब्रुवारी – संगमनेर तालुक्यात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत १४२ ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात एकूण ९,१७६ घरकुलांना मंजुरी देण्यात आली आहे. अशी माहिती संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांनी दिली. आमदार खताळ म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या संकल्पनेतून आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, तसेच पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनातून संगमनेर तालुक्यात महायुतीचे काम सुरू आहे. पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत समाजातील सर्वात गरीब आणि वंचित घटकांना स्वतःच्या हक्काचे घर मिळावे यासाठी केंद्र शासन ६०% आणि राज्य शासन ४०% असा आर्थिक सहभाग देत आहे. यात SC/ST घटकांसाठी २,५६४, अल्पसंख्याकांसाठी ९९२ आणि इतर घटकांसाठी ६,६२० घरकुलांचे वाटप करण्यात आले…

Read More

मुंबई : बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळे राज्यात राजकारणात खळबळ उडाली आहे. या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांकडून होत आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनीही धनंजय मुंडेंवर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. यावरुनच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी महायुती सरकारवर टीका केली आहे. महाराष्ट्रात २०१४ ते १९ दरम्यानचे फडणवीस सरकार असो वा त्यानंतरचे शिंदे-फडणवीस आणि आत्ताचे भाजपा-युती सरकार असो, या सरकारच्या काळात भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात बोकाळला आहे. मलई खाण्याची स्पर्धाच तीन पक्षात सुरु असून केवळ एखादा मंत्री भ्रष्ट आहे असे नाही तर संपूर्ण भाजप युती सरकारच भ्रष्ट आहे, असं नाना पटोले यांनी केली. “भाजपा युती…

Read More