Author: अनंत पांगारकर

मंगळवार, ०९ जुलै | मुंबई   पॅथॉलॉजी लॅब सुरू करण्याची आवश्यक परवानगी नसताना राज्यात अनधिकृत लॅब सुरू असल्याचे सभागृहात समोर आल्याने या अनधिकृत पॅथॉलॉजी लॅबवर नियंत्रण आणण्यासाठी राज्य शासन लवकरच कडक कायदा आणेल. यामध्ये विना नोंदणी लॅब सुरू असतील, तर त्यांना शिक्षेची तरतूद या कायद्यात असेल, अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी मंगळवारी विधानसभेत दिली. आमदार सुनील राणे यांनी या संदर्भात सभागृहात प्रश्न उपस्थित केला होता. यावर मंत्री सामंत यांनी उत्तर घेताना ही माहिती दिली. सामंत म्हणाले, जिल्हास्तरावर बोगस डॉक्टर शोध मोहिमेप्रमाणेच बोगस लॅब शोध मोहीम हाती घेण्यात येईल. राज्यभरात भरारी पथक नेमून अशा बोगस लॅब शोधण्याची कार्यवाही केली जाईल. राज्यात…

Read More

विशेष प्रतिनिधी, मुंबई  राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू झाल्यापासून विधान परिषदेत उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्या विरोधातील विरोधकांच्या कुरबुरी सतत वाढत आहेत. परिणामी उपसभापतींना विचारलेल्या जाबानंतर त्यांनी चक्क माघार घेत स्वतःच केलेली शेरेबाजी तपासून ती कामकाजातून काढून घेण्याचा शब्द विरोधकांना द्यावा लागण्याचे घटना सोमवारी सभागृहात घडली. उपसभापती गोऱ्हे या सभागृहात विरोधकांना बोलू देत नाहीत, असा आरोप अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु झाल्यापासून विरोधी नेत्यांकडून सातत्याने केला जात आहे. आठवड्याभरापूर्वी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचे निलंबन झाले होते, तेव्हा त्यांनीही असाच आरोप केला होता. सत्ताधाऱ्यांना बोलू दिले जाते, मात्र विरोधकांना बोलण्याची संधी मिळत नाही, असं दानवे यांनी सभागृहात म्हटले होते. अशातच सोमवारी विधानपरिषदेचे ठाकरे…

Read More

मंगळवार, ०९ जुलै  पोलिसांनी नाशिकमध्ये एका कारवाईत ऑनलाईन बुक केलेल्या टुरिस्ट गाडीत लाखो रुपयांचा गांजा पकडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. पोलिसांनी गांजाने भरलेली गाडी मुंबई नाका पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या भारतनगर येथून ताब्यात घेतली आहे. या प्रकारणी चालकाला अटक करण्यात आली आहे. पुण्यातून हा गांजा आणला गेल्याची माहिती समोर येत आहे. मुंबई नाका येथील भारत नगर परिसरात मुंबई नाका पोलीस पेट्रोलिंग करत असताना त्यांना एक चार चाकी वाहन संशयास्पद स्थितीत आढळून आले. त्यानंतर पोलिसांनी या वाहनाची झाडाझडती घेतली असता त्यात १९.६५० किलो गांजा आढळून आला. कारवाई दरम्यान पोलिसांनी चालक किरण धुमाळ याला ताब्यात घेतले आहे. याची चौकशी सुरू आहे. साधकाने…

Read More

मंगळवार ०९ जुलै | संगमनेर  समाजातील अनेक घटकांसाठी जिव्हाळ्याचे असलेल्या व आर्थिक विकासाची गंगोत्री समजल्या जाणार्‍या संगमनेर मर्चंट बँकेच्या अध्यक्षपदी माजी नगरसेवक राजेंद्र वाकचौरे, उपाध्यक्षपदी मुकेश कोठारी यांची बिनविरोध निवड करण्यात आली. अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीसाठी संगमनेर मर्चंट बँकेच्या स्वामी विवेकानंद सभागृहात सहाय्यक उपनिबंधक तथा निवडणूक निर्णय अधिकारी अमोल वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली संचालकांची बैठक बोलाविण्यात आली होती. या बैठकीत एकमताने दोन्ही निवडी करण्यात आल्या. यावेळी बँकेचे प्रमुख मार्गदर्शक उद्योजक राजेश मालपाणी म्हणाले, संगमनेर मर्चंट्स बँकेच्या लोकाभिमुख आणि वेगवान सेवेमुळे दिवसेंदिवस बँकेकडे अधिकाधिक ग्राहक आकर्षित होत असून बँकेच्या परिपूर्ण सेवेमुळे समाधानी होत आहेत. ग्राहकांची जिंकलेली मने आणि मिळवलेला विश्वास हाच बँकेचा सर्वश्रेष्ठ…

Read More

मंगळवार, ०९ जुलै | संगमनेर महाराष्ट्र पोलीस दलातील डीवायएसपी, एसीपी बढती घोटाळ्याची चर्चा असतानाच आता नगर जिल्ह्यातील पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्या आणि त्यांना बदल्याच्या ठिकाणी नियुक्त न करणे, बदल्याच्या ठिकाणी न सोडणे याबाबतच्या घोटाळ्याच्या तक्रारी समोर येऊ लागल्या आहे. नाशिकच्या विशेष पोलीस महानिरीक्षकांनी आदेश देवूनही अद्यापही बदली झालेल्या कर्मचाऱ्यांना बदलीच्या ठिकाणी सोडण्यात आले नाही. तसेच दोन गंभीर गुन्हे दाखल असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याची बदली व नेमणूक नसतानादेखील त्याला पोलीस अधीक्षकांचे खास मर्जी असल्याने नगर एलसीबीच्या विशेष पथकात वर्षभरापासून ठेवले असल्याचे बोलले जाते. विशेष म्हणजे या कर्मचाऱ्याची तक्रार खासदार निलेश लंके यांनी देखील केलेली आहे. नगर जिल्ह्यातील पोलीस पथकांच्या विविध कारवाया आणि त्यामागे…

Read More

मंगळवार, ०९ जुलै  विधीमंडळातील विधानपरिषद सभागृहात नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी संपन्न झाला. विधानपरिषदेसाठी नवनिर्वाचित झालेले सदस्य निरंजन डावखरे आणि जगन्नाथ अभ्यंकर यांना उपसभापती निलम गोर्‍हे यांनी सोमवारी सदस्यत्वाची शपथ दिली. डावखरे हे कोकण विभाग पदवीधर मतदारसंघातून तर अभ्यंकर हे मुंबई शिक्षक मतदारसंघातून निवडून आले आहेत. विधिमंडळातील विधानपरिषद सभागृहात हा शपथविधी सोहळा पार पडला.

Read More

मंगळवार, ०९ जुलै : मुंबई  विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात आमदार भाई गिरकर आणि जयंत पाटील यांनी विधान परिषदेत उपस्थित केलेल्या अंगणवाड्यांच्या प्रश्नावर वाजवी दरानुसार अंगणवाडी जागेचे भाडे द्यावे तसेच अंगणवाड्यांना आपण भेटी देणार असल्याची माहिती उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिली आहे. गिरकर यांनी अधिवेशनात भंडारा जिल्ह्यातील अंगणवाडी केंद्राचा मुद्दा उपस्थित करत १४१७ अंगणवाडी केंद्रे भंडारा जिल्ह्यात कार्यरत असून त्यापैकी १२४८ अंगणवाडी केंद्रे हे स्वमालकीच्या इमारतीत आहे. उर्वरित अंगणवाड्याना स्वमालकीची इमारत नसल्याचे सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. यावर उत्तर देताना मंत्री अदिती तटकरे यांनी अंगणवाडीच्या बांधकामासाठी जिथे जागा उपलब्ध होत नाही अशा ठिकाणी त्या भाडे तत्त्वावर असतात, भाड्यासाठी देण्यात येणारा निधीमध्ये सुद्धा…

Read More

सोमवार, ०८ जुलै नुकतेच संगमनेरच्या स्थानिक वृत्तपत्रात बहुजन पालक छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाबाबद वृत्त प्रसिद्ध झाले आहे. छत्रपती शिवरायांच्या स्मारकासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महसूलमंत्री यांनी जिल्हा नियोजन आणि विकास समितीच्या माध्यमातून १ कोटी रुपये मंजूर केल्याचे खात्रीलायक सूत्रांनी वृत्तपत्रांना माहिती दिल्याचे प्रसिद्ध झाले आहे. याबरोबरच छत्रपती शिवरांयाच्या स्मारकासाठी एसटी महामंडळाच्या जागेला माननीय मुख्यमंत्र्यांनी परवानगी दिल्याचे या बातमीत म्हटले आहे. याचे सर्व श्रेय संबंधितांनी माननीय पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना दिले आहे. स्मारकाची संकल्पना हीच मुळात माननीय पालकमंत्र्यांची आहे तेव्हा इतरांनी श्रेय घेऊ नये असेही पालकमंत्र्यांच्या समर्थकांनी म्हटले आहे.  तर दुसरीकडे संगमनेरच्या लोकप्रतिनिधींनी देखील या पूर्णाकृती स्मारकाबद्दल मुख्यमंत्र्यांच्या पातळीवर प्रयत्न केल्याचा…

Read More

सोमवार, ०८ जुलै  अहमदनगर जिल्ह्यात आज व उद्या (दिनांक ८, ९ जुलै) दुजांच्या कडकडाटासह वादळी वारा व अतिवृष्टीची शक्यता हवामान खात्याकडून वर्तविण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे. प्रशासनाने केले हे आवाहन …  मेघगर्जनेच्या वेळी, वीजा चमकत असताना किंवा वादळीवारे वाहत असतांना झाडाखाली किंवा झाडांजवळ उभे राहू नये. विजेपासून बचावासाठी सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा. धोकादायक ठिकाणी सेल्फी काढू नये. गडगडाटीच्या वादळादरम्यान व विजा चमकतांना कोणत्याही विद्युत उपकरणांचा वापर करू नये. वीजेच्या सुवाहक भागांशी संपर्क टाळावा. ट्रॅक्टर्स, शेतीची अवजारे, मोटारसायकल, सायकल यांचेपासून दूर रहावे. मोकळे मैदान, झाडाखाली, टॉवर्स, ध्वजांचे खांब, विद्युत, दिव्यांचे खांब,…

Read More

सोमवार, ०८ जुलै हवामान खात्याने मुंबईला ऑरेंज अलर्ट दिला असून राज्य आपत्ती नियंत्रण विभाग, मुंबई महापालिका, रेल्वे प्रशासन एकत्रितपणे काम करून मुंबईकरांना दिलासा देण्याचं काम करीत आहेत. मुंबईत काल रात्रीपासून २६७ ते ३०० मिलीमीटर एवढ्या मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला आहे. नागरिकांना मदतीसाठी सर्वोच्च प्राधान्य दिले जात असून सर्व यंत्रणा २४ तास अलर्ट मोडवर असल्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. मंत्रालयातील राज्य आपत्ती नियंत्रण कक्षाला भेट देऊन मुख्यमंत्री शिंदे यांनी मुंबई महापालिकेच्या नियंत्रण कक्षाला भेट देऊन मुंबईच्या परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी त्यांच्या समवेत मुंबई शहरचे पालकमंत्री दीपक केसरकर, मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, ग्रामविकास विभागाचे मंत्री गिरीष महाजन, मुख्य…

Read More