Author: अनंत पांगारकर

संगमनेर, दि. ३ मार्च – प्रतिनिधी संगमनेर तालुक्याची तोडफोड करण्याच्या उद्देशाने आश्वी बुद्रुक येथे प्रस्तावित केलेल्या अप्पर तहसील कार्यालयाला संपूर्ण संगमनेर तालुक्यातून मोठा विरोध होत आहे. जोर्वे येथील ग्रामसभेत या तहसील कार्यालयातला कडकडून विरोध करण्याचा ठराव एकमताने संबंध झाला. यावेळी विखे समर्थकांनी आश्वी येथेच कार्यालय करण्याची मागणी केली. यावर संपूर्ण गावातील नागरिक महिला व युवक आक्रमक झाल्याने विखे समर्थकांनी पळ काढला. जोर्वे येथील ग्रामपंचायतच्यावतीने जुने गावातील पारावर ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी या ग्रामसभेत एकमताने आश्वी बुद्रुक येथे होणाऱ्या अपर तहसील कार्यालयाला विरोधाचा ठराव मांडण्यात आला. याला सर्व गावाने झालेल्या मतदानातून संमती दर्शवली. मात्र तालुक्याच्या आणि जोर्वे गावच्या कायम…

Read More

संगमनेर, दि. ३ मार्च संगमनेर तालुक्याचे महसुली विभाजन करून आश्वी बुद्रुक येथे अपर तहसील कार्यालय निर्मितीचा घाट घातला गेला आहे. यावरून तालुक्यात वाद निर्माण झालेला असतानाच आता पालकमंत्री समर्थकांनी प्रस्तावित असलेले आश्वी बुद्रुक अपर तहसील कार्यालय तातडीने सुरू करण्याची मागणी केली आहे. या मागणीचे निवेदन संगमनेरचे प्रांताधिकारी शैलेश हिंगे यांच्या प्रतिनिधींना दिले आहे. हे कार्यालय तातडीने सुरू करून या भागातील ग्रामस्थ, शेतकरी, महीला, विद्यार्थ्यांची अडचण दूर करा, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा पंचक्रोशीतील नागरीकांनी निवेदनाद्वारे दिला आहे. यामुळे तालुक्यातील अपर तहसील कार्यालयाचा वाद आता आणखी पेटण्याची चिन्हे निर्माण झाली आहे. पद्मश्रीं डॉ. विखे पाटील कारखान्याचे अध्यक्ष कैलास तांबे, प्रवरा बँकेचे…

Read More

संगमनेर, दि. ३ मार्च आपली समिती आपली ताकद हे ब्रीद असलेल्या शिवजयंती उत्सव युवक समितीच्या अध्यक्षपदी रोहित वाळके यांची सर्वांनूमध्ये निवड करण्यात आली आहे. मावळते अध्यक्ष रोहित बागे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत नव्याने पदाधिकारी निवडी करण्यात आल्या आहे. समितीच्या अध्यक्षपदी कोणाची निवड केली जाते याची दरवर्षी कार्यकर्त्यांना उत्सुकता असते. ग्रामदैवत असलेल्या चंद्रशेखर चौकातील मारुती मंदिरामध्ये झालेल्या बैठकीत या निवडी करण्यात आल्या. एक वर्षासाठी या निवडी आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कामाची प्रेरणा घेऊन संगमनेरमध्ये सर्वपक्षीय तरुणांनी एकत्रित येत अकरा वर्षांपूर्वी शिवजयंती उत्सव युवक समितीची स्थापना केली होती. समितीच्या माध्यमातून वर्षभर विविध उपक्रम राबविले जात असून तिथीनुसार शिवजयंती साजरी केली जाते.…

Read More

सोमवार, दि. ३ मार्च सोमवारी विधिमंडळाच्या अधिवेशनाला सुरुवात झाली. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड हातात बेड्या घालून विधानभवनात दाखल झाले. थेट बेड्या घालून आलेल्या आव्हाड यांच्यामुळे काही वेळ नेमकं काय घडलं याची चर्चा सुरू होती. आव्हाड यांनी याचं स्पष्टीकरण देत सांगितले की, अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर सरकारकडून घाला घातला जात आहे. गुन्हे दाखल केले जात आहेत. मूलभूत अधिकार शाबूत राहिले पाहिजे. यावरून त्यांनी सरकारवर निशाणा साधला. अमेरिकेत भारतीय नागरिकांवर अन्याय करण्यात आला आहे. त्यांना विमानात कोंबून भारतात पाठवल्या जाणं म्हणजे अपमानित करण्याचा प्रकार आहे. लोक भोगत असलेल्या यातना या बेड्यांपेक्षा कमी नाही, असं देखील ते म्हणाले.…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज पुणे, दि. ३ मार्च – पुणे स्वारगेट बस स्थानक अत्याचार प्रकरणातील आरोपीने गुन्ह्याची कबुली देण्याऐवजी उलट पीडित तरुणीवर खळबळजनक आरोप केले होते. पीडित तरुणीला शरीर संबंधासाठी साडेसात हजार रुपये दिल्याचा आरोप करणाऱ्या आरोपीच्या बँक खात्याची पोलिसांनी तपासणी केली आहे. २६ वर्षीय तरुणीवर स्वारगेट बस स्थानकामध्ये बलात्कार झाल्याची घटना समोर आली होती. या घटनेमुळे राज्यभर खळबळ उडाली होती तसेच यंत्रणेविरोधात राज्यभर संताप व्यक्त केला जात होता. या प्रकरणातील मुख्य आरोपी नराधम दत्तात्रय गाडे याला पुणे पोलिसांनी अटक केली होती. त्याला पकडून देण्यासाठी लाखभर रुपयांचे बक्षीस देखील पोलिसांनी जाहीर केले होते. आरोपी गाडे याच्या वकिलांनी पीडित तरुणीवर तरुणीवर कुठलीही…

Read More

पूर्ण ताकदीचं सरकार राज्यात वा केंद्रात असलं की सार्‍या गोष्टी सुरळीत सुरू असतात. तक्रारीविना राज्याचा गाडा हाकता येतो असं मानलं जातं. पण अनेकदा यावर पाणीही पडतं. सरकारकडे बहुमताची ताकद असून काही फायदा नसतो. कायदा करणारा आणि त्याची अंमलबजावणी करणार्‍यांमध्ये अभद्र युती झाली की कायदा सहज गुंडाळला जातो. हवे ते उद्योग करायला जो तो मोकळा असतो. हेतूमध्ये खोट असली की अशा गोष्टी होत राहणं स्वाभाविक. मात्र हेतूत बाधा नसेल तर कोणीही कितीही आगाऊपणा केला की त्याची खोड मोडणं अवघड नसते. कारवाई न करणार्‍या अधिकार्‍याला कुठलं निमित्त पुढे करता येत नाही. सध्या मजबुत असलेल्या महायुतीच्या राज्य सरकारची अवस्था अशीच काहीशी झाली आहे.…

Read More

शनिवार, दि. १ मार्च  नाशिक – आमदार देवयानी फरांदे यांनी शनिवारी नाशिक शहरातील उच्चभ्रू वस्तीत सुरू असलेल्या एका कॅफेमध्ये छापा टाकला असता समोरच्या दृश्य बघून त्यांना देखील धक्का बसला. घटनास्थळी आलेल्या पोलिसांनी यावेळी काही तरुण-तरुणींना ताब्यात घेतले असून या प्रकारामुळे शहरात चांगलीच खळबळ उडाली आहे. नाशिक शहरामध्ये अनेक गैरप्रकार सुरू असून कॅफे संस्कृतीच्या नावाखाली तरुण-तरुणींना गैरप्रकार करण्यासाठी अल्प दरात जागा उपलब्ध करून दिला जात असल्याची माहिती आमदार देवयानी फरांदे यांना कार्यकर्त्यांनी दिली होती. त्यामुळे या माहितीची पडताळणी करण्यासाठी फरांदे यांनी शनिवारी घटनेचे गांभीर्य ओळखून स्वतः कारवाई करण्याचे ठरविले. त्यांनी गंगापूर रोड परिसरातील उच्च  वस्तीत असलेल्या विद्या विकास सर्कल परिसरामध्ये असलेल्या…

Read More

शनिवार, दि. १ मार्च काँग्रेसने विधान परिषदेच्या गटनेतेपदी सतेज पाटील यांची तर विधानसभा मुख्य प्रतोदपदी अमित देशमुख यांची निवड केली आहे. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी शनिवारी (१ मार्च) काँग्रेस विधिमंडळ पक्ष पदाधिकाऱ्यांची घोषणा केली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी त्यांच्या सोशल मीडिया ‘X’ अकाउंटवरून याची माहिती दिली आहे. सपकाळ यांनी म्हटले आहे की, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी काँग्रेस विधिमंडळ पक्ष पदाधिकाऱ्यांच्या नियुक्ती जाहीर केल्या आहे. यामध्ये विधानसभा उपनेते म्हणून अमीन पटेल, विधानसभा मुख्य प्रतोद अमित देशमुख, विधानसभा सचिव विश्वजीत कदम, विधानसभा प्रतोद शिरीषकुमार नाईक व संजय मेश्राम, विधानपरिषद गटनेता सतेज उर्फ बंटी पाटील, विधान…

Read More

संगमनेर, दि. १ मार्च मागील तीन महिन्यापासून प्रवरा नदीकाठी तसेच पठार भागामध्ये विजेचा पूर्ण खेळखंडोबा झाला आहे. पूर्ण दाबाने पूर्ण वेळ वीज मिळाली पाहिजे, मात्र असे न होता अगदी चार तास लाईट मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना नदीचे पाणी उचलता येत नाही. संगमनेर तालुक्यातील वीज पुरवठा बंद ठेवून हे पाणी पूर्वेला देण्यासाठी सत्ताधारी काम करत आहे आणि येथील नवीन लोकप्रतिनिधी त्यांच्या तालावर नाचत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या विश्रामगृहावर तालुक्यातील विविध गावांमधील नागरिकांनी लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्यापुढे वीज व पाण्याबाबतच्या समस्या मांडल्या. यावेळी माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, रणजितसिंह देशमुख, डॉ. जयश्री थोरात, सोमेश्वर…

Read More

विशेष प्रतिनिधी / मुंबई लोकसभा निवडणुकीत सपाटून मार खाल्ल्यानंतर महायुतीने लोकप्रिय योजनांच्या घोषणांचा पाऊस पाडून विधानसभा निवडणुकीत भरघोस यश मिळविले. त्यातही ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ गेमचेंजर ठरली. पण सत्तेत पुन्हा आल्यानंतर आर्थिक भाराची जाणीव झाल्याने महायुतीने थेट ३० टक्के खर्चकपात करण्याचा निर्णय घेतला. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे (NCP SP) आमदार रोहित पवार यांनी, सरकारी आकडेवारी शेअर करत महायुतीवर टीका केली आहे. राज्य दिवाळखोरीकडे वाटचाल करत असल्याचा दावा त्यांनी केला आहे. सन २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी सुधारित अंदाजपत्रक निश्चित करताना, वित्त विभागाने प्रत्येक विभागाची खर्चमर्यादा ठरवून दिली आहे. त्यानुसार निवृत्ती वेतन, शिष्यवृत्ती, विद्यावेतन, सहाय्यक अनुदानित वेतन, कर्ज…

Read More