Author: Annant Ppangarkar
रविवार, दि. २ जून भाजप खासदार रामकृपाल यादव यांच्या ताफ्यावर गोळीबार करण्यात आल्याची घटना बिहारमध्ये घडली आहे. शनिवारी संध्याकाळी झालेल्या या गोळीबारातून खासदार यादव सुखरूप बचावले आहेत. पाटलीपुत्र लोकसभा मतदारसंघाचे भाजप उमेदवार व विद्यमान खासदार रामकृपा यादव यांच्यातर्फेवर गोळीबार करण्यात आल्याची घटना मसौढी येथील कणेरी परिसरात घडली. घटनेची माहिती मिळतात पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून तपासाला सुरुवात झाली आहे. पाटलीपुत्र लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार रामकृपाल यादव व बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव आणि राबडीदेवी यांच्या कन्या मिसा भारती यांच्यात लढत झाली. गतवेळच्या निवडणुकीत यादव यांनी मिसा भारती यांचा पराभव केला होता. दरम्यान या प्रकरणी एसआयटीकडे तपास सोपविण्यात आला असून एसआयटीने…
हिंदीमध्ये एक चांगली म्हण आहे, सौ चुवे खाके बिल्ली चली हज… या उक्तीला साजेसं वर्तन आपल्या देशाचे पंतप्रधान मोदींचं सुरू आहे. सारी पापं धुवून काढणारं ध्यान साधनेचं अध्यात्मिक तंत्र त्यांनी अंगिकारलं आहे. डोळ्यावर चष्मा आणि शेकडो कॅमेरामनच्या साक्षीने त्यांनी ध्यानाला सुरूवात केली आणि ४५ तासात ती संपलीही. या अध्यात्मिक तंत्राचा लोकांच्या मनावर बसेल असा उपयोग त्यांनी करून घेतला. लोकसभा निवडणुकीचा आपल्या सोयीचा सातवा टप्पा पार पडण्याआधी मोदी ध्यानसाधनेत मंत्रमुग्ध झाले. ‘नयनेन्ं यत्रम्ं…’ असल्या बेफिकीर आणि अश्लाघ्य अशा स्वत:च बनवलेल्या संस्कृत श्लोकाचा आधार घेत लोकांना वेडं बनवणार्या आपल्या पंतप्रधानाला सत्ता प्रचंड प्यारी आहे. सत्तेसाठी कोणताही मार्ग…
शनिवार, दि. १ जून देशभरातील सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीची मतमोजणी मंगळवारी (दि. ४ जून) होत आहे. नगर जिल्ह्यातील अहमदनगर आणि शिर्डी लोकसभेची मतमोजणी अहमदनगरच्या एमआयडीसीमधील (नागापूर) महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या गोदामात सकाळी ८ वाजल्यापासून होत आहे. या मतमोजणीसाठी सुमारे १,५०० अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असुन मतमोजणीसाठी सर्व निवडणूक यंत्रणा सज्ज असल्याची माहिती देण्यात आली आहे. जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ हे स्वतः सर्व व्यवस्थेवर लक्ष ठेवून आहेत. अहमदनगर लोकसभा मतदार संघाची मतमोजणी गोदाम क्र. १ येथे तर शिर्डी लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी गोदाम क्र.३ मध्ये होणार आहे. अशी आहे तयारी… एका विधानसभा क्षेत्रासाठी १४ टेबल – अहमदनगर लोकसभा मतदार…
शनिवार, दि. १ जून नाशिक शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट समोर आला आहे. विद्यमान आमदार किशोर दराडे यांच्या ऐवजी आता ॲड. संदीप गुळवे ठाकरे गटाचे उमेदवार असतील. काँग्रेसचे दिवंगत नेते गोपाळराव गुळवे यांचे चिरंजीव काँग्रेस नेते आणि मराठा विद्या प्रसारक संस्थेचे संचालक असलेल्या ॲड. संदीप गुळवे यांनी शनिवारी मुंबईत शिवसेना नेते, खासदार संजय राऊत, शिवसेना नेते दिवाकर रावते, सुभाष देसाई, खासदार अरविंद सावंत यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला. यावेळी शिवसेनेचे नाशिक जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर, माजी आमदार योगेश घोलप आदी उपस्थित होते. त्यानंतर शिवसेनेने नाशिक मतदार संघातून विद्यमान आमदार किशोर दराडे यांचा पत्ता कट करत आपला उमेदवार जाहीर केला. गुळवे आता…
शनिवार, दि. १ जून ‘गाढवाचं लग्न’ या वगनाट्यातून सर्व परिचित झालेल्या, आपल्या कारकिर्दीत १०० हून अधिक भूमिका साकारणाऱ्या लोक कलावंत प्रभा शिवणेकर यांनी वयाच्या ८१ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. पिंपरी येथील एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. या उपचारादरम्यानच शुक्रवारी (दि. ३१ मे) त्यांची प्राणज्योत मालवली. अविवाहित असलेल्या प्रभा शिवणेकर आपल्या बहीण व भावांबरोबर राहायच्या. त्यांच्या भावंडांनीच त्यांचा शेवटपर्यंत सांभाळ केला. ‘गाढवाचे लग्न’ या वगनाट्यात त्यांनी गंगीची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका चांगलीच लोकप्रिय झाली होती. या नाटकाला केंद्र सरकारचा राष्ट्रपती पुरस्कार मिळाला होता. संगीत नाट्य अकादमीने त्यांना १९७४ मध्ये तत्कालीन राष्ट्रपतीच्या हस्ते राष्ट्रीय पुरस्कार देऊन सन्मानित…
शनिवार, दि. १ जून नाशिक विभागाचे शिक्षक मतदार संघाचे ठाकरे गटाचे पुरस्कृत विद्यमान शिक्षक आमदार किशोर दराडे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या संपर्कात असल्याची माहिती समोर येत असून महायुतीतर्फे पाठिंबा मिळविण्याच्या प्रयत्न करीत असल्याचे समजते. आमदार दराडे यांचा कार्यकाल पुढील महिन्यात संपत असून या जागेसाठी निवडणूक आयोगाने निवडणूक जाहीर केली आहे. भाजपाच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांचे सुपुत्र विवेक कोल्हे यांनी शुक्रवारी या मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी दाखल करत नवा ट्विस्ट आणला आहे. कोल्हे यांच्या उमेदवारीने या मतदारसंघातील राजकीय गणित बदलण्याची चिन्हे आहेत. आमदार दराडे पुन्हा निवडणूक लढविण्यास इच्छुक असून ते ठाकरे गटाकडून निवडणूक लढवितात की मुख्यमंत्री शिंदे गटाकडून निवडणूक लढवत महायुतीचा…
शनिवार, दि. १ जून धान्य दुकानचा परवाना रद्द न करण्यासाठी तहसीलदाराने धान्य दुकानदाराकडे चाळीस हजार रुपयांची लाच मागितल्याचा प्रकार समोर आला आहे. तहसीलदार साहेबांच्या सांगण्यावरून तडजोडी अंती वीस हजार रुपयांची लाच स्वीकारताना कोतवाल रंगेहात पकडला गेला. अभिजीत लक्ष्मण जगताप व मच्छिंद्र मारुती माने अशी लाचखोरांची नावे असून अभिजीत जगताप हा तहसीलदार तर मच्छिंद्र माने कोतवाल आहे. या दोघा विरोधात बीडच्या केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून एसीबीच्या धाराशिव युनिटने ही कामगिरी केली आहे. एसीबीकडे तक्रार करणाऱ्या तक्रारदाराचे रास्त भाव धान्य दुकान असून त्याच्या दुकानांमध्ये शासनाकडून मिळालेला धान्यसाठा आणि तक्रारदाराने ग्राहकांना केलेले धान्य वाटप यामध्ये तपासणी तफावत आढळून आली…
शनिवार, दि. १ जून नाशिकच्या विभागीय महसूल आयुक्तपदी बदली होताच डॉ. प्रवीण गेडाम यांनी महसूल आयुक्त पदाचा कार्यभार मावळते आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्याकडून स्वीकारला. गेडाम आता नाशिकचे नवे महसूल आयुक्त असतील. गमे सेवानिवृत्त झाल्याने त्यांच्या रिक्त होणाऱ्या जागेवर राज्य शासनाने गेडाम यांची नियुक्ती केली. यापूर्वी नाशिकमध्ये महापालिका आयुक्त राहिलेले गेडा म सध्या कृषी आयुक्त म्हणून कार्यरत होते. डॉ. गेडाम राज्यात कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून परिचित आहे. राज्यभरात गाजलेला जळगावचा घरकुल घोटाळा गेडाम यांनी बाहेर काढला होता. याच प्रकरणात माजी आमदार सुरेश जैन यांच्यासह अन्य बड्या राजकीय नेत्यांना तुरुंगवास भोगावा लागला होता. गेडाम यांच्या अगदी सुरुवातीच्या काळात त्यांनी संगमनेर नगर परिषदेत मुख्याधिकारीपदाचा…
शुक्रवार, दि. ३१ मे शिक्षक हे देशाचा कणा आहेत. ते राष्ट्र जडणघडण करण्यात मोलाचे योगदान देतात. मात्र विविध प्रश्नांच्या विळख्यात पिढी घडवणारे गुरुजन अडकून पडले असताना त्यांना योग्य तो न्याय मिळावा, यासाठी मला अनेकांनी मागणी केल्यानंतर विधानपरिषद लढवण्याचा मी निर्णय घेतला आहे. अनेक शिक्षक संघटना, पाच जिल्ह्यातील शिक्षक संस्थाचालक यांच्याशी संवाद साधल्यानंतर आपल्याला सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचा विश्वास नाशिक शिक्षक मतदार संघातील अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे यांनी व्यक्त केला. माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या सोबतीने गणेश कारखाना निवडणुकीच्या माध्यमातून मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पॅनलचा पराभव करत राज्याला परिचित झालेल्या माजी मंत्री स्वर्गीय शंकरराव कोल्हे यांचे नातू, माजी आमदार स्नेहलता…
शुक्रवार, दि. ३१ मे गेल्या आठवड्यात २८ हजार रुपयांची लाच घेताना पकडलेल्या कार्यकारी अभियंत्याच्या नावावर असलेल्या बँकेच्या लॉकरमध्ये लाच लुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांना आज मोठे घबाड आढळून आले. चिंचोटी तलावातील बुडीत क्षेत्रातील गाळ व माती शेतात टाकण्याकरिता परवानगी मिळण्यासाठी माजलगाव, परळी वैजनाथ येथील कार्यकारी अभियंत्याला सात शेतकऱ्यांनी विनंती अर्ज दिला होता. या शेतकऱ्यांना गाळ व माती त्यांच्या शेतात टाकण्यासाठी परवानगी देण्यासाठी प्रत्येकी पाच हजार रुपयांप्रमाणे पस्तीस हजार रुपयांची लाच घेताना गेल्या आठवड्यात तक्रारदाराकडून दि. २२ मे रोजी कार्यकारी अभियंता राजेश आनंदराव सलगरकर याला बीडच्या लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी पकडले होते. पोलीस निरीक्षक युनूस शेख यांच्या पथकाने ही कारवाई केली होती. त्यानंतर लाच…
शुक्रवार, दि. ३१ मे नाशिक विभागाच्या शिक्षक मतदार संघाच्या निवडणूक प्रक्रियेला शुक्रवारी सुरुवात झाली. या निवडणुकीसाठी पहिल्याच दिवशी नगर जिल्ह्यातील दोघा उमेदवारांनी तीन उमेदवारी अर्ज दाखल केले आहे. कोपरगावच्या भाजपच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांचे चिरंजीव विवेक बिपिनदादा कोल्हे यांनी दोन अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केले. याशिवाय डॉ. छगन भिकाजी पानसरे यांनी देखील हिंदुस्तान जनता पार्टी कडून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. विधान परिषदेच्या नाशिकसह चार जागांसाठी २६ जून रोजी निवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी ७ जूनपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेला आजपासून सुरुवात झाली. १० जून रोजी दाखल उमेदवारी अर्जांची छाननी होणार असून…
शुक्रवार, दि. ३१ मे नाशिकच्या विभागीय महसूल आयुक्तपदी राज्य शासनाने डॉ. प्रवीण गेडाम यांची नियुक्ती केली आहे. अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा यांनी गेडाम यांच्या नियुक्तीचे आदेश काढले असून तातडीने पदभार स्वीकारण्यास सांगितले आहे. नाशिकचे महसूल आयुक्त राधाकृष्ण गमे शुक्रवारी (३१ मे) सेवानिवृत्त झाले. त्यांच्या रिक्त जागेवर गेडाम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कडक शिस्तीचे आणि खमके अधिकारी म्हणून डॉ. गेडाम सर्वपरिचित आहेत. अहमदनगर, नासिक, नंदुरबार, धुळे आणि जळगाव या जिल्ह्यांचा कार्यभार डॉ. गेडाम यांच्याकडे असेल. गेडाम यांच्याकडे सध्या कृषी विभागाच्या आयुक्तपदाचा पदभार होता. तर सुरुवातीच्या काळात काही काळ त्यांनी संगमनेर नगर परिषदेचे मुख्याधिकारी म्हणून देखील काम पाहिले. त्यांचा कार्यकाल…
शुक्रवार, दि. ३१ मे तक्रारदाराविरुद्ध असलेल्या तक्रार अर्जाची चौकशी करून कारवाई न करण्यासाठी लाचेची मागणी करणारा शेवगाव पोलीस ठाण्यातील पोलीस हेड कॉन्स्टेबल लाचेच्या सापळ्यात अडकला असून त्याच्याविरुद्ध शेवगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अहमदनगर लाचलुचपत विभागाने ही कारवाई केली असून पांडुरंग बाबुराव वीर असे गुन्हा दाखल झालेल्या पोलीस हेड कॉन्स्टेबलचे नाव आहे. वीर याच्याविरुद्ध श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान येथील व्यक्तीने लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली होती. तक्रारदाराविरुद्ध शेवगाव पोलीस ठाण्यात असलेल्या तक्रार अर्जाची चौकशी करून कारवाई न करण्यासाठी शेवगाव पोलीस ठाण्यातील पोलीस हेड कॉन्स्टेबल वीर यांनी पाच ते दहा हजार रुपये लाचेची मागणी केली होती. त्यामुळे तक्रारदाराने लाच लुचपतकडे ११…
शुक्रवार, दि. ३१ मे अल्पवयीन मुलीवर सार्वजनिक शौचालयात बलात्कार करणाऱ्या दोघा नराधमांना जिल्हा व सत्र न्यायाधीश मलकापट्टी रेड्डी यांनी २० वर्षे सश्रम कारावास व ४५ हजारांचा दंड अशी शिक्षा सुनावली. वसंत तुकाराम गांगोडे (वय ३५), हरिदास ऊर्फ सोनू पांडुरंग राऊत (२०) अशी शिक्षा झालेल्या आरोपींची नावे आहेत. नाशिकच्या गंगापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत २०१९ मध्ये ही घटना घडली होती. आरोपी गांगोडे व राऊत यांनी एका अल्पवयीन मुलीला सार्वजनिक शौचालयात एकटे गाठले होते. नैसर्गिक विधीसाठी ती शौचालयात गेली असता गांगोडे याने आतमध्ये जाऊन कडी लावून घेत बळजबरीने अत्याचार केले होते. तसेच राऊत याने पीडितेसोबत तिच्या राहत्या जाऊन अत्याचार केला होता. याप्रकरणी गंगापूर…
शुक्रवार, दि. ३१ मे गेल्या काही दिवसांपासून पुण्यातील ससून सर्वोपचार रुग्णालय येथील गैरव्यवहारामुळे चर्चेत आले आहे. त्यातच आता या रुग्णालयासंदर्भात धक्कादायक बाब समोर आली आहे. राज्यातील सरकारी रुग्णालयातील सर्वाधिक मृत्यू या रुग्णालयात गेल्या वर्षभरात झाले असून या रुग्णालयात दिवसाला सरासरी २४ रुग्णांचा मृत्यू होत असल्याचे समोर आले आहे. ललित पाटील, अग्रवाल प्रकरणानंतर ससून रुग्णालय चर्चेत आले आहे. या रुग्णालयात गैरप्रकार वाढत असून प्रशासनाचे रुग्णसेवेकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसते. राज्यातील सरकारी रुग्णालयांत गेल्या वर्षी झालेल्या रुग्णांच्या मृत्यूची आकडेवारी माहिती अधिकारांतर्गत सामाजिक कार्यकर्ते संतोष घोलप यांनी मागविली होती. त्याला सार्वजनिक आरोग्य विभागाने उत्तर दिले आहे. त्यात २०२३ मध्ये सर्व सरकारी रुग्णालयांत झालेल्या…
गुरुवार, दि. ३० मे पुण्याचे काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर आणि शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांना राज्य उत्पादन शुल्क विभागाचे मंत्री शंभूराजे देसाई यांनी अब्रू नुकसानीची नोटीस बजावली आहे. कल्याणीनगर पोर्शे कार अपघातानंतर आक्रमक झालेल्या आमदार रवींद्र धंगेकर यांनी सर्वच विभागांची पोलखोल करण्यास सुरुवात केली आहे. पुण्यातले बेकायदेशीर आणि बार विरोधात कारवाईची मागणी करत या विभागाच्या अधिकाऱ्यांच्या हप्त्याचे रेट कार्ड समोर आणि धंगेकर आणि सुषमा अंधारे यांनी आंदोलन केलं होतं. राज्य शुल्क विभागाचे मंत्री शंभुराज देसाई यांचा फोटो असलेल्या एका खोक्यावर ५० खोके असं लिहिलं होतं. यासोबत ५०० रूपयांच्या बनावट नोटा घेऊन घोषणा दिल्या. या दोन्ही नेत्यांनी पुण्यात केलेल्या…
गुरुवार, दि. ३० मे काँग्रेस खासदार शशी थरूर यांच्या पीएला सोने तस्करी प्रकरणी अटक करण्यात आली आहे. दिल्ली कस्टमने इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर ही कारवाई केली. काँग्रेस नेत्याच्या पीएकडून सोने तस्करीचा हा प्रकार समोर आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. दिल्ली विमानतळावरील कस्टम विभागाने शशी थरूर यांचे पीए शिवकुमार यांना सोन्याच्या तस्करी प्रकरणी अटक केली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार शिवकुमार हा इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर एका माणसाकडून परदेशातून आणलेले सोने हस्तांतरित करत असताना कस्टमने बुधवारी ही कारवाई केली. शिवकुमार यांच्याकडून जप्त करण्यात आलेल्या सोन्याची किंमत तीस लाख रुपये आहे. तो दुबईहून दिल्लीत आला असून कस्टमचे अधिकारी त्याची चौकशी करत आहे.
गुरुवार, दि. ३० मे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या कृतीतून अडचणीत सापडले असतानाच “मला फाशी दिली तरी चालेल, पण मी मनुस्मृती आणि मनुवादाच्या विरोधात उभा राहणार आहे”, अशा स्पष्ट शब्दात जितेंद्र आव्हाड यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. मनुस्मृती दहन करत असतानाच आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो असलेलं पोस्टर फाडलं गेलं. याप्रकरणी जितेंद्र आव्हाड यांनी माफी मागितली, मात्र तरीदेखील सत्ताधारी पक्षाकडून याप्रकरणी रान उठवलं गेलं. सत्ताधाऱ्यांनी ठिकठिकाणी आंदोलनं करून अनेक पातळीवर आव्हाडांचा विरोध सुरू ठेवला आहे. या पार्श्वभूमीवर जितेंद्र आव्हाड यांनी आपली भूमिका स्पष्ट केली असून ते म्हणाले की, मी काल महाडला…
गुरुवार, दि. ३० मे मनुस्मृति दहन करण्याच्या नादात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याकडून महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे छायाचित्र फाडले गेले. याप्रकरणी आव्हाड यांनी माफी मागितल्यानंतर देखील राज्यात त्यांच्या विरोधात आंदोलने सुरू आहे. या पार्श्वभूमीवर व्यक्तिगत भावना दुखविल्याच्या कारणावरून संगमनेर शहर पोलीस ठाण्यात आमदार आव्हाड यांच्याविरुद्ध दिलेल्या तक्रारीवरून अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. शहर पोलीस ठाण्यात येथील विकास साहेबराव जाधव (वय ३० वर्ष, रा. सय्यद बाबा चौक, संगमनेर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आव्हाड यांच्या विरोधात भारतीय दंड विधान कलम ५०४ प्रमाणे बुधवारी गुन्हा नोंद करण्यात आला आहे. दरम्यान याच विषयावरून महायुतीच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी संगमनेरमध्ये आव्हाड यांच्या…
गुरुवार, दि. ३० मे प्रवरा नदी पात्रात मित्रांसमवेत पोहायला गेलेल्या शालेय विद्यार्थ्यांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून नदीपात्रात बळी जाण्याची मालिका अद्याप सुरूच असल्याचे यातून समोर आले. अविनाश पाराजी जोगदंड (वय १५ वर्षे, रा. कोल्हार भगवतीपुर) असे या विद्यार्थ्याचे नाव आहे. स्थानिक नागरिक आणि आपत्ती दलाच्या जवानांनी राबविलेल्या पाच तासाच्या शोध मोहिमेत याचा मृतदेह नदीपात्राच्या कपारीत आढळून आला. अविनाश जोगदंड हा आपल्या मित्रांसोबत बुधवारी कोल्हार-बेलापूर रस्त्यालगत असलेल्या बागमळ्याच्या मागील बाजूस असलेल्या प्रवरा नदी पात्रात होण्यासाठी गेला होता. अविनाशचा नदीपात्रातील गाळात अथवा कपारीत अडकून मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. अविनाश हा बीड जिल्ह्यातील…
