Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

डीजेचा आवाज आणि लेझर लाईट्स खरोखरच जीवघेणे ठरू शकतात? तज्ज्ञ डॉक्टर काय म्हणतात, पाहा… शिंदेवाडीतील विद्यार्थ्यांच्या शिबिरात नेमकं काय घडलं…

13/10/2026

शिक्षण क्षेत्राची मान उंचावणारी बातमी! संगमनेरच्या या लेखकाच्या चार पुस्तकांचा शासनमान्य ग्रंथ निवडसुचित समावेश; वाचा सविस्तर

13/10/2026

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत कधी मिळणार? आमदार अमोल खताळांनी दिली ही माहिती

13/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » गोवंश जनावरांची अवैध वाहतूक उघडकीस; दोघे ताब्यात, कत्तलीसाठी संगमनेरात जाणाऱ्या गोवंश जनावरांसह लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त
गुन्हेगारी

गोवंश जनावरांची अवैध वाहतूक उघडकीस; दोघे ताब्यात, कत्तलीसाठी संगमनेरात जाणाऱ्या गोवंश जनावरांसह लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त

ट्रकच्या आत १७ गोवंश जातीच्या मोठ्या गायी दाटीवाटीने आणि चारा-पाण्याविना बांधलेल्या अवस्थेत आढळून आल्या.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar08/05/2025Updated:08/05/2025No Comments3 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज – संगमनेर

पुणे-नाशिक महामार्गावर आंबीखालसा फाटा येथे गुरुवारी मध्यरात्री पोलिसांनी केलेल्या कारवाईत गोवंश जनावरांची अवैध वाहतूक उघडकीस आली. याप्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना ताब्यात घेतले असून, सुमारे १४ लाख २५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

अधिक माहिती अशी की, ०८ मे २०२५ रोजी मध्यरात्री १ वाजेच्या सुमारास पोलीस स्टेशनमध्ये बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी ठाणे अमलदारांना कत्तलीच्या उद्देशाने गोवंश जनावरांची वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती दिली. पुणे-नाशिक महामार्गावरून एम.एच. २५ यु १४५५ क्रमांकाच्या ट्रक मधून गोवंश जनावरे कत्तलीसाठी घेऊन जाणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस हेड कॉन्स्टेबल दिवटे यांनी तात्काळ पोलीस निरीक्षकांना याबाबत कळवले. त्यांच्या आदेशानुसार रात्रगस्तीवर असलेले पो. कॉ. प्रमोद गाडेकर व पो. कॉ. सुभाष बोडखे यांना कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले. त्यानंतर पोलीस पथक, पंच आणि बजरंग दलाचे कार्यकर्ते खाजगी व सरकारी वाहनाने आंबीखालसा फाटा येथे रवाना झाले.

मध्यरात्री १:३० वाजेच्या सुमारास पुणे-नाशिक महामार्गावरून घारगांवाच्या दिशेने येणारा एम.एच. २५ यु १४५५ क्रमांकाचा ट्रक पोलिसांनी थांबवून त्याची झडती घेतली. ट्रकच्या आत १७ गोवंश जातीच्या मोठ्या गायी दाटीवाटीने आणि चारा-पाण्याविना बांधलेल्या अवस्थेत आढळून आल्या. पोलिसांनी ट्रक चालक आणि त्याच्या साथीदाराची चौकशी केली असता, त्यांनी त्यांची नावे बबन बाबुराव लोंढे (वय ४२ वर्षे, रा. अवसरी, मंचर, ता. आंबेगांव, जि. पुणे) आणि दीन महंमद इनमादार (वय २२ वर्षे, रा. भैरवनाथ आळी, मंचर, ता. आंबेगांव, जि. पुणे) असल्याचे सांगितले.

पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून, जप्त केलेल्या १७ गायींची किंमत अंदाजे ४ लाख २५ हजार रुपये आणि ट्रकची किंमत अंदाजे १० लाख रुपये आहे. पोलिसांनी एकूण १४ लाख २५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. सदर गोवंश जनावरे पुढील संगोपनासाठी संगमनेरच्या सायखिंडी येथील गोरक्षण केंद्रात जमा करण्यात आली आहेत.

याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल प्रमोद गाडेकर यांच्या फिर्यादीवरून घारगाव पोलीस ठाण्यात आरोपी बबन लोंढे आणि दीन महंमद इनमादार यांच्याविरुद्ध महाराष्ट्र पशुसंरक्षण (सुधारणा) अधिनियम १९९५ चे सुधारित सन २०१५ चे कलम ५, ५ (अ), (ब), ९ (ब) आणि प्राण्यांना निर्दयतेने वागण्यास प्रतिबंध अधिनियम १९६० चे कलम ३, ११ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास घारगांव पोलीस स्टेशनचे अधिकारी करत आहेत.

संगमनेर मधील कत्तलखान्यात जनावरांची होणार होती कत्तल… जप्त केलेल्या जनावरांबद्दल पोलिसांनी अधिक माहिती घेतली असता, ही जनावरे मोहम्मदसाले खालीद बेपारी (रा. आळे, ता. जुन्नर, जि. पुणे) यांच्याकडून भरली असून ती तौसीफ कुरेशी (रा. संगमनेर) यांच्याकडे कत्तलीसाठी घेऊन जात असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे कोणत्याही कायदेशीर कारवाईला न घाबरता संगमनेरमध्ये राजरोसपणे गोवंश जनावरांची कत्तल सुरूच असल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान संगमनेरमधील कत्तलखान्यांवर कारवाई करण्याचे आदेश आमदार अमोल खताळ यांनी काही दिवसांपूर्वी नगरपालिका आणि पोलीस प्रशासनाला दिले होते. मात्र संबंधितांनी या आदेशाला केराची टोपली दाखविल्याचे स्पष्ट होत आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,762
गोवंश कत्तल गोवंश कारवाई घारगाव पोलीस
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेरमध्ये ८८ लाखांचा गांजा जप्त; दोन तस्करांना अटक, तीन साथीदार फरार

06/10/2026

एलसीबी अन्‌ एफडीएची धडक कारवाई; १२.८१ लाखांच्या गुटख्यासह दोघांना अटक, चार जण फरार

05/10/2026

पोलिसाच्या शेतातील बाजरीच्या कणसांवर जादूटोणा; संगमनेर तालुक्यात एकावर गुन्हा दाखल

03/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
शिक्षण

डीजेचा आवाज आणि लेझर लाईट्स खरोखरच जीवघेणे ठरू शकतात? तज्ज्ञ डॉक्टर काय म्हणतात, पाहा… शिंदेवाडीतील विद्यार्थ्यांच्या शिबिरात नेमकं काय घडलं…

By Annant Ppangarkar13/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- सण-उत्सवांमध्ये वाढणारा डीजेचा कर्णकर्कश आवाज आणि लेझर लाईट्सचा अतिवापर मानवी आरोग्यासाठी…

शिक्षण क्षेत्राची मान उंचावणारी बातमी! संगमनेरच्या या लेखकाच्या चार पुस्तकांचा शासनमान्य ग्रंथ निवडसुचित समावेश; वाचा सविस्तर

13/10/2026

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत कधी मिळणार? आमदार अमोल खताळांनी दिली ही माहिती

13/10/2026

मंगळवार, १३ ऑक्टोंबर — जाणून घ्या तुमची रास आज काय सांगते

13/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.