Author: अनंत पांगारकर
महाराष्ट्र संवाद न्यूज़ नेटवर्क नाशिक: नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची मतदानाची प्रक्रीया 30 जानेवारी रोजी सुरळीतपणे पार पडली. या निवडणुकीची मतमोजणी 2 फेब्रुवारी, 2023 रोजी सकाळी 8 वाजता जिल्हा निवडणूक शाखेने स्वमालकीचे उभारलेल्या ईव्हीएम गोदाम, सय्यद प्रिंप्री, नाशिक येथे होणार आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने सय्यद प्रिंप्री येथील मतमोजणी केंद्राची पाहणी केली असून मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज आहे, असे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपायुक्त (प्रशासन) रमेश काळे यांनी सांगितले. यावेळी उपायुक्त उन्मेष महाजन, तहसीलदार साहेबराव सोनवणे, सहायक संचालक (लेखा) विजय सोनवणे, तहसीलदार राजेंद्र नजन, नायब तहसीलदार राजेश अहिरे व इतर अधिकारी- कर्मचारी उपस्थित होते. यावर्षी प्रथमच जिल्हा निवडणूक शाखेच्या सय्यद प्रिंप्री येथील…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क संगमनेर ¤ शेतात गवत कापणाऱ्या महिलेवर बिबट्याने हल्ला केल्याची घटना संगमनेर तालुक्यातील दरेवाडी येथे मंगळवारी घडली. बिबट्याच्या हल्ल्यामध्ये जखमी झालेल्या महिलेला प्राथमिक उपचारानंतर अहमदनगरच्या जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. मंगळवारी (३१ जानेवारी) सकाळी साडेअकरा वाजण्याच्या दरम्यान संगमनेर तालुक्यातील दरेवाडी येथे ही घटना घडली असून शकुंतला शंकर मैड (वय ५५ वर्ष) असे बिबट्याच्या हल्ल्यामध्ये जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे. मैड जनावरांसाठी चारा आणण्याकरिता घराजवळील शिवाजी देवराम शेजवळ यांच्या शेतात गेल्या होत्या. बांधाच्या कडेला गवत कापत होत्या. या दरम्यान शेतात डबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानकपणे त्यांच्यावर हल्ला चढविला. अचानक झालेल्या आपल्यावरील हल्ल्यामुळे मैड घाबरून गेल्या. बिबट्याने त्यांच्या हाताला…
अनंत पांगारकर ¤ महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर शहर आणि तालुक्यात दररोज सुरू असलेल्या चोऱ्या, घरफोड्यांमुळे कायदा सुव्यवस्था धोक्यात आली असून गुन्हेगारांचा शोध लावण्यास अपयशी ठरणाऱ्या पोलीस यंत्रणेचा गुन्हेगारांवरील धाक संपल्याने संगमनेरकर चोर, भामट्यांच्या दहशतीखाली वावरत आहे. त्यातच पोलीस उपअधीक्षकांसह शहर पोलीस ठाण्यातील प्रभारी राज मुळे विविध गुन्ह्यांचा तपास अधांतरी लटकत असल्याने पोलीस यंत्रणा गुन्हेगारांना कधी जेरबंद करणार असा प्रश्न निर्माण झाला आहे. पोलिसांच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याने जिल्हा पोलीस अधीक्षकांनी यात लक्ष घालण्याची मागणी संगमनेरकर करत आहे. चोऱ्या, घरफोड्यांची मालिका सोमवारी देखील कायम होती. प्रजासत्ताक दिनी मावळतेला झालेली दरोड्याची घटना, डिसेंबरमधील संकेत नवले खून प्रकरण, दररोजच्या होणाऱ्या दुचाकी चोऱ्या आदी…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क नाशिकमधून एका 32 वर्षीय महिलेला पोलिसांनी अटक केली आहे. पंधरा वर्षे वयाच्या इयत्ता नववीमध्ये शिकणाऱ्या मुलाचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप या विवाहित महिलेवर असून तिच्या विरोधात पोक्सो कायद्यानुसार गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. दारू आणि अश्लील व्हिडिओ पाहण्याचे व्यसन या मुलाला लावत महिलेने त्याचे शोषण केले. तसेच स्वतःचे व मुलाचे काही अश्लील व्हिडिओ देखील तिने बनविले असल्याचे म्हटले आहे. या महिलेने पीडित अल्पवयीन मुलाशी शारीरिक संबंध ठेवले तसेच तो सातत्याने संपर्कात राहावा यासाठी तिने त्याला वीस हजार रुपये किमतीचा एक मोबाईलदेखील घेऊन दिला होता. त्याद्वारे हे दोघे सातत्याने संपर्कात होते. पीडित अल्पवयीन मुलगा हा कल्याण…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क | नाशिक नाशिक विभागात एकूण 338 मतदान केंद्र असून या सर्व मतदान केंद्रावर आज मतदान प्रक्रिया सुरळीतपणे पार पडली. विभागातील 2 लाख 62 हजार 678 मतदानापैकी 1 लाख 29 हजार 456 इतके मतदान झाले असून 49.28 टक्के मतदान झाल्याची माहिती सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपायुक्त (प्रशासन) रमेश काळे यांनी दिली. विभागातील नाशिक जिल्ह्यात एकूण 69 हजार 652 मतदारापैंकी 31 हजार 933 इतक्या मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून नाशिक जिल्ह्यात 45.85 टक्के मतदान झाले आहे. अहमदनगर जिल्ह्यात एकूण 1 लाख 15 हजार 638 मतदारापैंकी 58 हजार 283 इतक्या मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून अहमदनगर जिल्ह्यात 50.40…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क | अहमदनगर नाशिक पदवीधर मतदार संघ निवडणुकीसाठी अहमदनगर जिल्ह्यात सोमवारी सरासरी ५०.४० टक्के मतदान झाले असल्याची माहिती अहमदनगर निवडणूक शाखेतर्फे देण्यात आली आहे. महाविकास आघाडीच्या उमेदवार शुभांगी पाटील संगमनेरमध्ये एका मतदान केंद्रावर आल्या असता त्या मतदारांना हात जोडत असताना संगमनेरचे प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे यांनी त्यांना प्रचारापासून रोखण्याचा प्रकार समोर आला आहे. विधान परिषदेच्या नाशिक पदवीधर मतदार संघासाठी अहमदनगर जिल्ह्यात सर्वत्र मतदान प्रक्रिया अत्यंत शिस्तबद्ध व शांततेत पार पडली असल्याचे सांगण्यात आले. स्थानिक भूमिपुत्र असलेल्या अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे आणि महाविकास आघाडीने पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील यांच्यामध्ये प्रमुख लढत झाल्याचे दिसून आले. जिल्ह्यातील १४७…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क | संगमनेर ऊस तोडणी सुरू असताना उसाच्या शेतामध्ये बिबट्याची दोन बछडी आढळून आली आहेत. संगमनेर शहरासह परिसरात मोठ्या प्रमाणात बिबट्यांचा वावर असून मानवावर बिबट्याने हल्ला करण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. संगमनेर तालुक्यातील खळी या गावात साहेबराव तांबे या शेतकऱ्याच्या उसामध्ये बिबट्याचे दोन बछडे आढळून आले आहे. ऊसतोड सुरू असताना हे बछडे आढळल्याने या ठिकाणी बिबट्याचा वावर असल्याने घबराट निर्माण झाली आहे. वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. खळी गावच्या शिवारामध्ये साहेबराव तांबे यांनी ऊस लागवड केले आहे. रविवारी सकाळी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याचे ऊस तोडणी कामगार ऊस तोड करत असताना उसामध्ये आवाजासह…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क | अहमदनगर गो मातेच्या संरक्षण आणि संवर्धन चळवळीला बळकटी देण्यासाठी केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्यातही गोसेवा आयोगाची स्थापना करण्यासाठी सरकार सकारात्मक असून लवकरच या बाबतीतील निर्णय घेणार असल्याची माहीती पशुसंवर्धन आणि दूग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. गो विज्ञान संशोधन संस्था पुणे, दादरा नगर हवेली मुक्ती संग्राम समिती आणि गो सेवा समिती अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमाने श्रध्देय मोरोपंत पिंगळे गो सेवा पुरस्कार २०२३ चे वितरण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आले. राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे पश्चिम विभागाचे प्रांत संघचालक नानासाहेब जाधव, भारतीय किसान संघाचे दादा लाड, गो विज्ञान संशोधन संस्थेचे राजेंद्र लुंकड, दादरा नगर हवेली…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क | पंढरपूर / अकोले अखिल भारतीय मराठा महासंघाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी राजेंद्र कोंढरे, उपाध्यक्षपदी ना. नरेंद्र पाटील तर सरचिटणीसपदी प्रकाश देशमुख यांची निवड करण्यात आली. पंढरपूर येथे अखिल भारतीय मराठा महासंघ सर्वसाधारण सभेत महासंघाच्या २०२२ ते २५ या सालाकरिता नविन कार्यकारिणी निवड करण्यात आली. निवड निर्णय अधिकारी अँड. प्रविण गोगावले हे होते. त्यांनी घोषित केलेली कार्यकारिणी पुढील प्रमाणे : कार्यकारणी अध्यक्ष राजेंद्र कोंढरे, विभागीय उपाध्यक्ष अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ अध्यक्ष ना. नरेंद्र अण्णासाहेब पाटील, सरचिटणीस प्रकाश वसंतराव देशमुख, कोषाध्यक्ष प्रमोद बळवंत जाधव, विभागीय चिटणीस अतिश गायकवाड निवडणूक प्रक्रियेस अखिल भारतीय मराठा महासंघाचे माजी अध्यक्ष शशिकांत पवार…
रविवार विशेष 🔸प्रवीण पुरो राज्य भाजपचे सवेसर्वा आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उत्फूर्त खोटारडेपणाची सार्यांना आता चांगली जाणीव होऊ लागली आहे. फडणवीस कधीही कशाचीही सरमिसळ करू शकतात. असलेल्या बाबी नसल्याची आणि नसलेल्या घटना घडल्याचीही टेप सहज वाजवू शकतात. म्हणजे होत्याचं नव्हतं करण्याचा त्यांचा हातखंडा आहे, हे पुन्हा एकदा सिध्द झालंय. अशीच एक टेप त्यांनी नुकतीच दिल्लीत असताना पत्रकारांपुढे वाजवली. ती होती महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या नव्या कस्टडीची. फडणवीसांमुळे राज्यातल्या जनतेला कळलं की राज्यपाल नावाच्या संविधानिक व्यक्तीच्या कागदपत्रांची कस्टडी स्वतंत्र आहे ते. या भयानक खोटं बोलण्याच्या कृतीचं कौतुक करायचं तर लोकं कौतुक करणार्यालाच मुर्खात काढतील. तुम्ही काय त्यांच्या नादी…
