Author: अनंत पांगारकर
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर: खऱ्या नोटांच्या बदल्यात चौपट बनावट नोटा देऊन नागरिकांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा संगमनेर शहर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. शहरातील जनता नगर परिसरात सापळा रचून पोलिसांनी १२ लाख ४० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपींनी दोन लाख रुपयांच्या खऱ्या नोटांच्या मोबदल्यात आठ लाख रुपयांच्या बनावट नोटा देण्याचे आमिष दाखवले होते. या बनावट नोटांच्या बंडलमध्ये वर आणि खाली खऱ्या नोटा लावून मध्ये ‘चिल्ड्रन बँक ऑफ इंडिया’ छापलेल्या खेळण्यातील नोटांचा वापर करून फसवणूक केली जात होती. पोलीस कॉन्स्टेबल सागर नागरे यांच्या फिर्याद दिली असून या प्रकरणी मयुर किशोर सिद्धपुरा (वय ३८, रा. खामगाव), उमेश कांबळे…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर: कोल्हार-घोटी राज्यमार्गावरील सातवा मैल येथे रविवारी सकाळी अपघात घडला आहे. स्कार्पिओ आणि स्कुटी दुचाकीच्या या अपघातात आरुषी कर्पे या विद्यार्थिनीचा मृत्यू झाला आहे. संगमनेर तालुक्यातील पिंपळगाव कोंझिरा येथील रहिवासी असलेली आरुषी अनिल कर्पे ही विद्यार्थिनी नेहमीप्रमाणे आपल्या स्कुटीवरून क्लाससाठी संगमनेरच्या दिशेने जात असताना हा अपघात झाला. भंडारदरा परिसरामध्ये पर्यटनासाठी निघालेल्या एका भरधाव स्कॉर्पिओ (MH 10 DV 3447) कारने तिच्या स्कुटीला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, आरुषीला या वाहनाने काही अंतर फरफटत नेले, यामुळे तिचा जागीच मृत्यू झाला. प्रत्यक्षदर्शींच्या अंदाजानुसार, दुसऱ्या वाहनाला धोकादायक रीतीने ओव्हरटेक करत असताना स्कॉर्पिओचा वेग भरधाव होता. सदर…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर: संगमनेरमधील एका दुकानावर धाड टाकून औषध प्रशासन आणि शहर पोलिसांनी मानवी आरोग्यास अत्यंत घातक असणाऱ्या १२ हजार ९०० रुपयांच्या बेकायदेशीर पाकिस्तानी ‘गोरी ब्युटी क्रीम’चा साठा जप्त केला आहे. पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांना मिळालेल्या माहितीवरून संगमनेर शहर पोलिसांनी अहिल्यानगरचे औषध निरीक्षक सोमनाथ मुळे आणि राहुल पांडे यांच्या मदतीने ही कारवाई केली. पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत सावंत, विजय खुळे बाबासाहेब सातपुते विजय आगलावे सागर नागरे यांचा या पथकात समावेश होता. याप्रकरणी मोगलपुरा, शिकलकर लाईन येथील रहिवासी दुकानदार शाहिद रियाज शेख (वय ३६) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दुकानाची पाहणी केली असता तेथे ‘मेड इन पाकिस्तान’ व ‘पाकिस्तान…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर: संगमनेर पोलिसांनी कारवाई करत बेकायदेशीर गोमांसाची वाहतूक करणारी एक इनोव्हा गाडी जप्त केली आहे. या कारवाईत पोलिसांनी ४ लाख रुपयांची इनोव्हा कार आणि २ लाख ७० हजार रुपये किमतीचे ९०० किलो गोमांस असा एकूण ६ लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी (१ ऑगस्ट) रात्री १:५५ वाजेच्या सुमारास संगमनेर येथील जमजम कॉलनी क्रमांक १० च्या रस्त्याकडेला एक संशयास्पद इनोव्हा गाडी (क्र. MH 12 KA 4795) उभी असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. पोलिसांनी जाऊन पाहणी केली असता या वाहनामध्ये मानवी आरोग्यास धोकादायक ठरेल अशा पद्धतीने गोवंशाचे कापलेले मांस भरलेले आढळले. पोलीस पथक जवळ…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन मुंबई: फ्रेंडशिप डेच्या निमित्ताने आमदार सत्यजीत तांबे यांनी सोशल मीडियावरून केलेल्या आवाहनाला राज्यभरातून, विशेषतः उत्तर महाराष्ट्र आणि पुणे परिसरातील तरुणांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. नाशिक–पुणे सेमी हायस्पीड रेल्वे सरळ मार्गानेच व्हावी या मागणीसाठी ९ ऑगस्ट रोजी होणाऱ्या चक्काजाम आंदोलनात सहभागी होण्याची तयारी अनेक युवक, विद्यार्थी आणि विविध महाविद्यालयांतील विद्यार्थी संघटनांनी दर्शवली आहे. फ्रेंडशिप डेच्या संदेशातून आमदार तांबे यांनी “मित्र एकत्र आले तर मोठा बदल घडवू शकतो” हा संदेश देत आपल्या मित्राला टॅग करण्याचे आणि ९ ऑगस्टच्या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले होते. या आवाहनानंतर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात पोस्ट शेअर होत असून, अनेक विद्यार्थी आपल्या मित्रांसह…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर: संगमनेर शहरात अवैध गांजाची विक्री करण्याच्या उद्देशाने तो जवळ बाळगणाऱ्या तीन जणांवर संगमनेर शहर पोलीस ठाण्यात अंमली पदार्थ विरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत पोलिसांनी ४ किलो १३० ग्रॅम सुका गांजा, एक दुचाकी, आयफोन आणि इतर साहित्यासह एकूण २,३४,२५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. शहर पोलिसांनी रविवारी (२ ऑगस्ट) मध्यरात्री ही कारवाई केली असून तीनही आरोपींना अटक करण्यात आली आहे. संगमनेर शहरातील जनता नगर भागात असलेल्या एका घरात आरोपी गांजा बाळगून असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस कॉन्स्टेबल बाळासाहेब अशोक गुंजाळ यांनी तक्रार दिली…
प्रवीण पुरो केंद्र सरकारच्या नव्या शिक्षण अभियानांतर्गत शैक्षणिक व्यवस्थेत करण्यात आलेल्या बदलाचे विपरीत आणि दीर्घकालीन परिणाम दिसायला लागले आहेत. नव्या पिढीसाठी विनाशाची दिशा दाखवणारा हा मार्ग असल्याने देशाची घडण अडचणीत आणू शकेल, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. गेल्या सहा वर्षांत शिक्षणातील हा बदल वरवर भौतिक वाटत असला, तरी तो स्पर्धेची दिशा रोखणारा, देशातील युवकांना शिक्षणापासून वंचित ठेवणारा बनला आहे. जेव्हापासून हे घडतंय तेव्हापासून देश जागतिक शिक्षणाला पारखा होऊ लागला आहे. आगामी काळात यात सुधारणा न झाल्यास भारतीय शिक्षण व्यवस्था भीषण संकटात सापडेल, हे सांगायला नको. याचे नैसर्गिक परिणाम क्रयशक्तीवर होऊन रोजगाराच्या संधी हातून जातील. तरुणांच्या हातातील काम जाईल. दिल्लीमध्ये ‘जेन-झी’…
आजचे राशीभविष्य मेष – आजचा दिवस तुमच्यासाठी नवीन ऊर्जा आणि आत्मविश्वास घेऊन येईल. महत्त्वाची कामे दुपारपूर्वी पूर्ण करून घेणे फायदेशीर ठरेल. मित्र आणि कुटुंबाच्या सहकार्याने मोठी कामे पार पडतील. आर्थिक नियोजनावर भर द्यावा लागेल. वृषभ – व्यवसायात धनलाभाचे उत्तम योग आहेत. भौतिक सुखांमध्ये वाढ होईल आणि अडकलेली कामे पूर्ण होतील. सामाजिक क्षेत्रात तुमचा प्रभाव वाढेल. कामातील गुप्त गोष्टी आणि वादग्रस्त विषय योग्य रीतीने हाताळा. मिथुन – जिद्दीने आणि मेहनतीने काम केल्यास अपेक्षित यश मिळेल. जुने नातेवाईक आणि मित्रांचे सहकार्य लाभेल. व्यवसायात नवीन योजना आखू शकाल, मात्र अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. कर्क – दैनंदिन कामांमध्ये काही अडथळे येण्याची…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर: दलित, शोषितांचा आपल्या साहित्यातून आवाज बुलंद करणारे आणि हक्कांसाठी लढा देणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी साहित्यातून मोठी क्रांती केली आहे. त्यांचे विचार सदैव प्रेरणादायी असून लोकनेते बाळासाहेब थोरात व आमदार सत्यजित तांबे यांच्या पुढाकारातून संगमनेर शहरात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे अद्यावत स्मारक लवकरात लवकर साकारण्यात येणार असल्याची माहिती माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी दिली. संगमनेर हायटेक बसस्थानकासमोर मातंग एकता समाज व सकल मातंग समाजाच्या वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०६ व्या जयंतीनिमित्त आयोजित अभिवादन कार्यक्रमात ते बोलत होते. याच कार्यक्रमात लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्तही त्यांना आदरांजली अर्पण करण्यात आली. याप्रसंगी बोलताना डॉ. तांबे यांनी…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर: संगमनेर येथील ‘मालपाणी हेल्थ क्लब’ येथे गुरुवारी ‘कडलग इन्व्हेस्टमेंट’तर्फे आयोजित करण्यात आलेल्या विशेष आर्थिक साक्षरता कार्यशाळेला गुंतवणूकदारांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. दोन तासांहून अधिक काळ चाललेल्या या सत्रात उपस्थितांनी आर्थिक नियोजन आणि संपत्ती निर्मितीविषयक मार्गदर्शन घेतले. सुरत येथील प्रसिद्ध प्रशिक्षक व आर्थिक तज्ज्ञ पलक शाह यांनी या कार्यशाळेत मुख्य मार्गदर्शन केले. त्यांनी दैनंदिन जीवनातील सोपी उदाहरणे देत आर्थिक शिस्त, ध्येय-आधारित गुंतवणूक, महागाईचा प्रभाव, चक्रवाढ व्याजाची ताकद, एसआयपी, वारसा नियोजन आणि मृत्युपत्राचे महत्त्व यांसारख्या मुद्द्यांवर उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे उद्घाटन बालरोगतज्ज्ञ डॉ. ओमप्रकाश सिकची यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी व्यासपीठावर ‘एनजे वेल्थ’चे विभागीय प्रमुख विक्रमसिंह परदेशी, लेखापरीक्षक…
