Author: अनंत पांगारकर
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर: पुणे-नाशिक रेल्वे प्रकल्पाच्या प्रश्नावरून संगमनेर तालुक्यातील राजकीय आणि सामाजिक वातावरण चांगलेच तापले आहे. या प्रकल्पाच्या मागणीसाठी पुणे-नाशिक रेल्वे कृती समितीच्या वतीने आज रविवारी ऐतिहासिक चक्काजाम आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. या आंदोलनाच्या पूर्वसंध्येला संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांनी वेळप्रसंगी आमरण उपोषण करण्याची तयारी दर्शविल्याने या प्रश्नाला एक नवे वळण मिळाले आहे. कृती समितीने आमदार खताळ यांच्या बदलत्या भूमिकेवर तीव्र आक्षेप घेत, त्यांना केवळ घोषणा व बैठकांपर्यंत न थांबता चक्काजाम आंदोलनात आपल्या सर्व कार्यकर्त्यांसह प्रत्यक्ष सहभागी होण्याचे थेट आवाहन केले आहे. आमदारांच्या आमरण उपोषणाच्या भूमिकेनंतर आंदोलनात काय घडामोडी घडतात, याकडे संपूर्ण संगमनेरकरांचे लक्ष लागले आहे. रेल्वे…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर: संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या सुकेवाडी येथील आग्नेश्वर मळा येथे घरफोडीची मोठी घटना समोर आली आहे. शुक्रवारी (दि. ७ ऑगस्ट) दुपारी साडेतीन ते चार वाजण्याच्या सुमारास विठ्ठल भानुदास शिंदे (वय ५३) यांच्या बंद घराची कडी-कोयंडा तोडून अज्ञात चोरट्याने आत प्रवेश केला. घरात प्रवेश केल्यानंतर चोरट्याने घरातील ४ लाख ४० हजार रुपयांचा साडेतीन तोळ्यांचा राणीहार, १ लाख २० हजार रुपयांचा १ तोळ्याचा नेकलेस, १ लाख २० हजार रुपये किमतीच्या सोन्याच्या दोन साखळ्या, १ तोळ्याची आणखी एक सोन्याची साखळी, अर्धा तोळ्याचे कानातील जोड, सोन्याचे ओम पान, कानातील बाळी, नाकातील नथ, मोरणी आणि चांदीचे जोडवे व छल्ला…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर: उत्तर आणि पश्चिम महाराष्ट्राच्या विकासाचा कणा ठरणाऱ्या नाशिक-पुणे थेट रेल्वे मार्गासाठी क्रांतीदिनी हजारो नागरिक रस्त्यावर उतरणार असून नाशिक-पुणे महामार्ग आणि समृद्धी महामार्गावर सकाळी नऊ वाजता तीव्र चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे. संगमनेर, सिन्नर, अकोले, नारायणगाव, जुन्नर, मंचर, खेड आणि चाकण या संपूर्ण पट्ट्यातील जनतेच्या हक्काच्या या रेल्वेसाठी सर्वपक्षीय नागरिक, युवक आणि महिला या आंदोलनात पूर्ण ताकदीने सहभागी होणार आहेत. नाशिक-पुणे-मुंबई या गोल्डन ट्रँगलच्या विकासासाठी नाशिक-पुणे रेल्वे मार्ग अत्यंत महत्त्वाचा असून लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी १९९८ पासून या थेट रेल्वेसाठी सातत्याने पाठपुरावा केला आहे. तत्कालीन रेल्वेमंत्री ममता बॅनर्जी यांच्यापासून ते केंद्रीय रेल्वे मंत्रालय आणि महारेलपर्यंत केलेल्या…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर: राज्याचे गोदावरी व कृष्णा खोरे जलसंपदा मंत्री तथा नगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी नाशिक-पुणे रेल्वे मार्गासंदर्भात केलेल्या वक्तव्यामुळे संगमनेर तालुक्यासह संपूर्ण परिसरातील नागरिकांच्या भावना दुखावल्या असून, त्यांच्या या वक्तव्याचा नाशिक-पुणे रेल्वे कृती समितीने तीव्र शब्दांत निषेध नोंदवला आहे. समितीने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नाशिक-पुणे रेल्वे हा लाखो नागरिकांच्या विकासाशी थेट जोडलेला अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. अशा गंभीर आणि तांत्रिक प्रश्नावर वस्तुनिष्ठ भूमिका मांडण्याऐवजी पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी साईबाबांच्या नावाचा आधार घेत शिर्डी मार्गाला विरोध करणाऱ्यांवर अप्रत्यक्ष दडपण आणण्याचा प्रयत्न केला आहे. “शिर्डी रेल्वेला विरोध करणाऱ्यांवर साईबाबा कोपतील” अशा आशयाचे विधान करणे हे…
आजचे राशीभविष्य मेष- आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत ऊर्जावान आणि उत्साहाने भरलेला राहील. नवीन कार्याची सुरुवात करण्यासाठी किंवा बऱ्याच काळापासून प्रलंबित असलेली कामे पूर्ण करण्यासाठी उत्तम वेळ आहे. कामाच्या ठिकाणी तुमच्या सहकाऱ्यांचे सहकार्य लाभेल आणि वरिष्ठांकडून तुमच्या कामाचे कौतुक होईल. कौटुंबिक जीवनात आनंदाचे वातावरण राहील आणि जवळच्या नातेवाईकांशी संबंध अधिक दृढ होतील. आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे, विशेषतः आहाराकडे लक्ष द्या. आर्थिक बाबतीत विचारपूर्वक निर्णय घ्या. वृषभ- आजचा दिवस संयम आणि शांततेने घालवण्याचा आहे. मानसिक स्थिरतेसाठी योग आणि ध्यानाचा सहारा घ्या. आर्थिक व्यवहार करताना सावधगिरी बाळगा आणि घाईगडबडीत कोणताही मोठा निर्णय घेऊ नका. नोकरी आणि व्यवसायात काही आव्हाने येऊ शकतात, परंतु…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर (प्रतिनिधी): खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर संगमनेर तालुक्यातील शेतकऱ्यांना युरिया खताची टंचाई भासू नये, यासाठी आमदार अमोल खताळ यांच्या सूचनेनुसार कृषी विभागाने ३५७ मेट्रिक टन युरियाचा संरक्षित बफर स्टॉक विक्रीसाठी खुला केला आहे. कृषी विभागाच्या या नियोजनामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांना वेळेवर आणि पुरेसे खत उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आमदार खताळ यांच्या कार्यालयातून देण्यात आलेल्या माहितीनुसार, चालू खरीप हंगामासाठी तालुक्याला एकूण ७०० मेट्रिक टन युरियाचा साठा मंजूर करण्यात आला होता. त्यापैकी पहिल्या टप्प्यात ३४९ मेट्रिक टन युरिया त्वरित उपलब्ध करून देण्यात आला होता. मात्र, सध्या शेतीकामांचा वेग वाढल्याने युरियाची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. ही बाब लक्षात…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर: नाशिक-पुणे रेल्वेमार्गाचा प्रश्न तत्काळ मार्गी लावावा यासाठी नाशिक-पुणे रेल्वे कृती समिती संगमनेरच्या वतीने ९ ऑगस्ट रोजी पुकारण्यात आलेल्या चक्काजाम आंदोलनाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. जीएमआरटी हे रेल्वेपेक्षा अधिक महत्त्वाचे आहे, असे स्पष्ट मत मांडणाऱ्या डॉ. काकोडकर यांच्या समितीकडून रेल्वेच्या बाजूने सकारात्मक अभिप्रायाची अपेक्षा करणे म्हणजे आंदोलनाच्या तोंडावर जनतेच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार आहे, असा आरोप कृती समितीने केला आहे. त्यामुळे डॉ. काकोडकर यांना या समितीतून तत्काळ हटवावे, अन्यथा जनआंदोलन अधिक तीव्र केले जाईल, असा रोखठोक इशारा देण्यात आला आहे. जुन्नर तालुक्यातील खोडद येथील ‘जीएमआरटी’ (GMRT) प्रकल्पाच्या कारणास्तव रेल्वे प्रकल्पात अडथळे निर्माण होत असताना, यावर…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर: राज्यभरात एसटी बसेसची अत्यंत केविलवाणी अवस्था झालेली असताना आणि प्रवाशांच्या भरमसाठ तक्रारी असताना, नाशिक-पुणे मार्गावरील बसेसला संगमनेर येथे थांबा मिळवण्यात स्थानिक लोकप्रतिनिधी पूर्णपणे अपयशी ठरले आहेत. आता आगामी आंदोलनाच्या तोंडावर कमिट्या स्थापन करून केवळ देखावा केला जात असून, हा जनतेच्या आंदोलनाची धार बोथट करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप पुणे-नाशिक रेल्वे कृती समितीने केला आहे. परिवहन विभागातर्फे रेल्वेसंदर्भात समिती स्थापन करून जनतेची सरळ सरळ दिशाभूल केली जात आहे. जर राज्य सरकारला हा मार्ग खरोखरच करायचा होता, तर महारेलकडे वर्ग केलेले १ हजार कोटी रुपये माघारी का बोलावले, असा रोकडा सवाल कृती समितीने विचारला आहे. केंद्रीय रेल्वे मंत्री…
आजचे राशीभविष्य मेष – आजच्या दिवशी कामाचा ताण अधिक राहील, तरीही आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी केलेले प्रयत्न यशस्वी होण्याची शक्यता आहे. रागावर नियंत्रण ठेवणे अत्यंत आवश्यक आहे, अन्यथा नाहक वाद निर्माण होऊ शकतात. वृषभ – आजचा दिवस भाग्याचा आणि मनःशांती देणारा ठरेल. कामाच्या ठिकाणी आपल्या बुद्धिमत्तेचा आणि कौशल्याचा योग्य वापर कराल. हाती घेतलेल्या कामात यश मिळेल आणि मानसन्मान वाढेल. कौटुंबिक वातावरण अत्यंत प्रसन्न राहील. मिथुन – थांबलेली कामे पुन्हा वेगाने सुरू होतील. नवीन धाडसी निर्णय घेण्यासाठी आणि मनोरंजनासाठी दिवस चांगला आहे. आर्थिक बाबतीत मात्र उधळपट्टी टाळावी आणि आपल्या मौल्यवान वस्तूंची विशेष काळजी घ्यावी. कर्क – कामाच्या ठिकाणी…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर: पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाला गती मिळण्याची चिन्हे निर्माण झाली असून आमदार अमोल खताळ आणि खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची नवी दिल्लीत भेट घेऊन सकारात्मक चर्चा केली आहे. आमदार खताळ यांच्या कार्यालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, या बैठकीत पुणे, अहिल्यानगर आणि नाशिक जिल्ह्यांच्या आर्थिक व औद्योगिक विकासासाठी महत्त्वाच्या असणाऱ्या या प्रकल्पातील तांत्रिक अडचणींवर सविस्तर चर्चा करण्यात आली. प्रकल्पाच्या प्रस्तावित संरेखनामुळे (अलाईनमेंट) खोडद येथील ‘जायंट मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोप’ (GMRT) प्रकल्पावर होणाऱ्या संभाव्य परिणामांमुळे कामात विलंब होत असल्याचे रेल्वेमंत्र्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आले. या तांत्रिक समस्येवर योग्य तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डॉ.…
