Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

१०० वे पुण्यात, तर १०१ वे साहित्य संमेलन संगमनेरमध्ये, दुर्गाताई तांबे यांची मोठी घोषणा!

28/09/2026

कांदा व्यापाऱ्यावर कोयत्याने वार करणारा फरार आरोपी अखेर दोन वर्षानंतर एलसीबीच्या जाळ्यात

28/09/2026

संगमनेरमधील एका निष्ठावान शिवसैनिकाचा अनुभव व्हायरल; तत्कालीन मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यावरील शाईफेकीने चर्चेत आलेले ठाकरे गटाचे तत्कालीन पदाधिकारी भाऊसाहेब हासे यांनी केलेले वक्तव्य चर्चेत! बाळासाहेब थोरात यांना… ते तर…!

28/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्रीताई थोरात यांना राष्ट्रीय एकता पुरस्कार जाहीर; G-20 अंतर्गत दिल्लीतील कार्यक्रमात गौरविण्यात येणार
सामाजिक

कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्रीताई थोरात यांना राष्ट्रीय एकता पुरस्कार जाहीर; G-20 अंतर्गत दिल्लीतील कार्यक्रमात गौरविण्यात येणार

Annant PpangarkarBy Annant Ppangarkar10/08/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज

संगमनेर – एकविरा फाउंडेशनच्या माध्यमातून महिला सबलीकरण व महिलांच्या आरोग्याबाबत केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल दिल्लीतील केजरीवाल सरकारच्या ओबीसी आयोगाकडून G-20 अंतर्गत कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्रीताई बाळासाहेब थोरात यांना राष्ट्रीय एकता पुरस्कार जाहीर झाला. रविवारी दिल्ली येथे शानदार कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे.

विविध क्षेत्रातील मान्यवरांचा होणार गौरव: भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त दिल्ली सरकारच्या ओबीसी आयोगाकडून G20 अंतर्गत समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना राष्ट्रीय एकता पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.

थोरात यांची निवड: डॉ. जयश्रीताई थोरात या मुंबई येथील टाटा मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटलमधील ब्लड कॅन्सर विभागात कार्यरत असून अत्यंत दुर्दम्य असणाऱ्या ब्लड कॅन्सर या आजारातील रुग्णांना त्यांनी आजार मुक्त केले आहे. तसेच कोविडच्या संकट काळात त्यांनी मुंबई येथील हॉस्पिटलमध्ये रात्रंदिवस काम करून त्यांनी उत्कृष्ट सेवा बजावली आहे.

याचबरोबर सातत्याने महिलांच्या आरोग्याबाबत तळमळ असणाऱ्या थोरात यांनी एकविरा फाउंडेशनच्या माध्यमातून संगमनेर तालुक्यातील ग्रामीण महिलांचे आरोग्य, महिला सबलीकरण यांसह महिलांमध्ये आरोग्याबाबत मोठी जनजागृती केली आहे. सातत्याने सामाजिक क्षेत्रातही योगदान देताना त्यांनी दंडकारण्य अभियानाच्या माध्यमातून पर्यावरण संतुलनासाठी ही पुढाकार घेतला आहे.

दिल्लीत होणार गौरव: त्यांच्या या कामाची दखल घेऊन दिल्ली सरकारच्या ओबीसी आयोगाकडून त्यांना राष्ट्रीय एकात्मता पुरस्काराने रविवारी (दि. 13 ऑगस्ट) दुपारी चार वाजता दिल्ली येथील कॉन्स्टिट्यूशन क्लबमध्ये शानदार कार्यक्रमात पुरस्कार वितरित केला जाणार आहे.

यांच्या हस्ते होणार सन्मान: आयोगाचे अध्यक्ष जगदीश यादव, सचिव रंजीत सिंह, कर्नल पूनम सिंग, जीएसटी कमिशनर सारांश महाजन, प्रसिद्ध गायक पंडित बलदेवराज वर्मा, निवृत्त न्यायाधीश पिंकी महाजन, अनुप चावला यांच्या हस्ते पुरस्कारार्थींना सन्मानित करण्यात येणार आहे.

यांनी केले अभिनंदन: थोरात यांना मिळालेल्या राष्ट्रीय एकता पुरस्काराबद्दल काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे, दुर्गाताई तांबे, बाजीराव खेमनर, माधवराव कानवडे, रणजीतसिंह देशमुख, बाबासाहेब ओहोळ, इंद्रजीत थोरात, सुधाकर जोशी, शंकर खेमनर, टाटा कॅन्सर हॉस्पिटलचे ब्लड कॅन्सर विभागप्रमुख प्रा. डॉ. हसमुख जैन, संपतराव डोंगरे, रामहरी कातोरे, हौशीराम सोनवणे, लक्ष्मण कुटे, राजेंद्र कडलग, मिलिंद कानवडे, सोमेश्वर दिवटे, यांच्यासह तालुका युवक काँग्रेस, एकविरा फाउंडेशनच्या सदस्यांनी अभिनंदन केले आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 565
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेर ड्रग्ज प्रकरणातील सत्य जनतेसमोर आणा; सोशल मीडियावरील ‘मीडिया ट्रायल’ त्वरित थांबवा! — काँग्रेस कार्याध्यक्ष अमोल शेलकर यांचे पोलीस प्रशासनाला आवाहन; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन पारदर्शक चौकशीचे पुरावे मांडण्याची मागणी

24/09/2026

संगमनेर शहरात वाहतूक कोंडीचा बोजवारा: बेशिस्त रिक्षाचालक, फुटपाथवरील अतिक्रमणे अन् अवैध पार्किंगमुळे नागरिक त्रस्त; पोलीस प्रशासन ढिम्म

24/09/2026

‘संगमनेर फेस्टिव्हल’ हा संगमनेरकरांचा सांस्कृतिक मानबिंदू : मनीष मालपाणी १८ व्या संगमनेर फेस्टिव्हलचा सांगता सोहळा उत्साहात; विनोदी नाटकाने प्रेक्षकांना हसवले मनमुराद

22/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
महाराष्ट्र संवाद विशेष

१०० वे पुण्यात, तर १०१ वे साहित्य संमेलन संगमनेरमध्ये, दुर्गाताई तांबे यांची मोठी घोषणा!

By Annant Ppangarkar28/09/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- महाराष्ट्राची सांस्कृतिक आणि वैचारिक परंपरा समृद्ध असणाऱ्या संगमनेर शहरात लवकरच अखिल…

कांदा व्यापाऱ्यावर कोयत्याने वार करणारा फरार आरोपी अखेर दोन वर्षानंतर एलसीबीच्या जाळ्यात

28/09/2026

संगमनेरमधील एका निष्ठावान शिवसैनिकाचा अनुभव व्हायरल; तत्कालीन मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यावरील शाईफेकीने चर्चेत आलेले ठाकरे गटाचे तत्कालीन पदाधिकारी भाऊसाहेब हासे यांनी केलेले वक्तव्य चर्चेत! बाळासाहेब थोरात यांना… ते तर…!

28/09/2026

सोमवार २८ सप्टेंबर — जाणून घ्या आजच्या दिवसाचे राशिभविष्य

28/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.