महाराष्ट्र संवाद न्यूज
संगमनेर – भारतीय जनता पार्टी, किसान मोर्चा महाराष्ट्र प्रदेश सदस्य व स्व. संभाजीराजे थोरात प्रतिष्ठानचे अध्यक्ष रविंद्र संभाजीराव थोरात यांना तमिळनाडू सरकार व चेन्नईच्या एशिया इंटरनॅशनल कल्चर अॅण्ड रिसर्च विद्यापीठातर्फे “डॉक्टरेट आणि लोकहित सेवारत्न” पुरस्काराने नुकतेच गौरविण्यात आले.
राबविले वेगवेगळे उपक्रम: थोरात गेल्या अनेक वर्षांपासून विविध सामाजिक संस्था आणि संघटना यांच्या माध्यमातून वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबवत आहेत. अहमदनगर, पुणे आणि मुंबई या ठिकाणी स्व. संभाजीराजे थोरात प्रतिष्ठानच्या माध्यमातून त्यांचे विशेष सामाजिक योगदान राहिलेले आहे.
यांच्या उपस्थितीत झाला सन्मान: त्यांच्या कार्याची दखल घेऊन चेन्नई विद्यापीठाने त्यांना एका दिमाखदार सोहळ्यात विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एम. जिनूरामा शर्मा, सिने अभिनेते शिवा राजकुमार, चियान विक्रम, रंगराज सुबैय्या (सत्यराज), दक्षिण कोईम्बतूरचे आमदार वनथी श्रीनिवासन, आमदार अर्जुनन पी, नैमार नागेंद्रन, कोईम्बतूरचे खासदार पी. रामास्वामी नटराजन, विलुप्पुरमचे खासदार डी. रविकुमार व इतर राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक व उद्योग क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

