Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

समृद्धी महामार्गावर चाकूचा धाक दाखवून दरोडा टाकणाऱ्या सराईत टोळीचा पर्दाफाश; स्थानिक गुन्हे शाखेकडून चार आरोपींना अटक, एक लाख दोन हजारांचा मुद्देमाल जप्त

12/09/2026

चार अवैध कत्तलखान्यांवर एलसीबीचे छापे, १०५० किलो गोमांसासह ९ जनावरांची सुटका

12/09/2026

बेकायदेशीर भंगार दुकानांवर पोलिसांचा छापा; विनापरवाना वाहने तोडणाऱ्या दोघांना अटक, लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त

12/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » अमृतवाहिनी बँकेला राष्ट्रीय स्तरावरील बँकोचा ब्ल्यू रिबन पुरस्कार
शेती व सहकार

अमृतवाहिनी बँकेला राष्ट्रीय स्तरावरील बँकोचा ब्ल्यू रिबन पुरस्कार

दुसऱ्यांदा मिळाला पुरस्कार
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar19/08/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज
संगमनेर – काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्यांची आर्थिक कामधेनु असलेल्या सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात अमृतवाहिनी सहकारी बँकेस राष्ट्रीय स्तरावरील बँको या संस्थेचा ब्ल्यू रिबन पुरस्कार – 2023 जाहीर झाला असल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष सुधाकर जोशी व उपाध्यक्ष ॲड. नानासाहेब शिंदे यांनी दिली आहे.
वाटचाल: सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या आदर्श शिस्त व विचारांवर बँकेची वाटचाल सुरू असून काँग्रेसचे वरिष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली बँकेने सातत्याने ऑडिटचा अ दर्जा मिळून शेतकरी व सर्वसामान्य मदत केली आहे. अमृतवाहिनी बँकेने नुकताच दुग्धविकास कर्ज योजनेअंतर्गत सर्वसामान्यांच्या जीवनामध्ये आनंद पुरवण्याचे काम सुरू केले असून छोटे शेतकरी व व्यावसायिक यांच्यासाठी ही विविध योजना लागू केल्या आहेत. 500 दूध उत्पादकांना बिगर तारण दीड लाखापर्यंतचे कर्ज उपलब्ध करून दिले जात आहे. तसेच कारखान्याच्या ऊस तोडणी कामगार व ऊस वाहतुकीसाठी 30 कोटी रुपयांचे कर्ज बँकेने प्रथमच उपलब्ध करून दिले आहे.
विस्तार: याचबरोबर नव्याने आश्वी बुद्रुक व संगमनेर खुर्द येथील शेतकी संघ पेट्रोल पंपाजवळ बँकेची शाखा सुरू केली जाणार आहे. काळानुरूप केलेले बदल बँकेला लोकाभिमुख करण्याचा प्रयत्न यासह या बँकेचे संगणकीय कामकाज, एटीएम, नवीन अद्यावत सुविधांसह असलेली अमृतनगर येथील मुख्य शाखा व संगमनेर मार्केट यार्ड, नेहरू चौक, तळेगाव, घारगाव, साकुर या ठिकाणीही विविध शाखा कार्यरत आहेत.
या सर्व शाखांचे नूतनीकरण व आधुनिकीकरणाचे काम करण्यात आले असून नव्याने कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्रीताई थोरात यांच्या हस्ते मुख्य शाखेत अत्याधुनिक लॉकरची सुविधा व्यवस्था कार्यान्वित झाली आहे. तसेच संगमनेर शहरातील पेटीट विद्यालयाजवळ असलेली शाखा मेन रोड येथे हलवण्यात येणार आहे.
500 कोटींच्या ठेवी: सभासद, शेतकरी व नागरिकांचा मोठा विश्वास या बँकेने संपादन केला आहे. ग्रामीण भागात असूनही पाचशे कोटींची ठेव असलेल्या या बँकेने केलेल्या उल्लेखनीय कामाबद्दल बँको या राष्ट्रीय स्तरीय संस्थेने सन 2022- 23 चा ब्ल्यू रिबन पुरस्काराने सन्मानित केले आहे. यापूर्वीही अमृतवाहिनी बँकेला 2022 मध्ये हा पुरस्कार मिळाला होता. 4 ते 6 ऑक्टोबर 2023 दरम्यान दमन येथील शानदार कार्यक्रमात या पुरस्काराने बँकेला सन्मानित करण्यात येणार आहे.
यांनी केले अभिनंदन: पुरस्काराबद्दल आमदार बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे, बाजीराव खेमनर, माधवराव कानवडे, दुर्गाताई तांबे, कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्रीताई थोरात, रणजीतसिंह देशमुख, बाबा ओहोळ, शंकर खेमनर, इंद्रजीत थोरात, संपतराव डोंगरे, लक्ष्मणराव कुटे, रामहरी कातोरे, हौशीराम सोनवणे, मिलिंद कानवडे, सोमेश्वर दिवटे, आदींसह विविध पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले.

हा पुरस्कार सांघिक कामाचा असून यामध्ये बँकेचे सर्व कर्मचारी, अधिकारी ,सभासद, बँकेचे ठेवीदार व कर्जदार यांचा मोठा वाटा आहे. आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली सर्वसामान्य जनतेला तत्पर सेवा देण्याच्या कामाला अधिक बळकटी मिळणार आहे.
सुधाकर जोशी, चेअरमन.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 447
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेर तालुक्यात ७५ टक्के पेरण्या पूर्ण; पाऊस लांबल्याने शेतकरी चिंतेत, दुबार पेरणीचे संकट

18/07/2026

युरियाचा बफर स्टॉक तातडीने खुला करा, अन्यथा तीव्र आंदोलन; संगमनेर तालुका काँग्रेसचा प्रशासनाला इशारा

15/07/2026

सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना: ३१ जुलैपर्यंत सहभागी होण्याचे कृषी विभागाचे आवाहन

13/07/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

समृद्धी महामार्गावर चाकूचा धाक दाखवून दरोडा टाकणाऱ्या सराईत टोळीचा पर्दाफाश; स्थानिक गुन्हे शाखेकडून चार आरोपींना अटक, एक लाख दोन हजारांचा मुद्देमाल जप्त

By Annant Ppangarkar12/09/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – समृद्धी महामार्गावर गाडी दुरुस्त करणाऱ्या मॅकेनिकला चाकूचा धाक दाखवून मारहाण…

चार अवैध कत्तलखान्यांवर एलसीबीचे छापे, १०५० किलो गोमांसासह ९ जनावरांची सुटका

12/09/2026

बेकायदेशीर भंगार दुकानांवर पोलिसांचा छापा; विनापरवाना वाहने तोडणाऱ्या दोघांना अटक, लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त

12/09/2026

आज शनिवार १२ सप्टेंबर रोजीचे राशी भविष्य

12/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.