Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेर एम.डी. ड्रग्ज रॅकेटचे धागेदोर कोणापर्यंत? जिल्हा न्यायालयात नेमकं काय घडलं… आता एक नव्हे तर चार आरोपी

28/09/2026

१०० वे पुण्यात, तर १०१ वे साहित्य संमेलन संगमनेरमध्ये, दुर्गाताई तांबे यांची मोठी घोषणा!

28/09/2026

कांदा व्यापाऱ्यावर कोयत्याने वार करणारा फरार आरोपी अखेर दोन वर्षानंतर एलसीबीच्या जाळ्यात

28/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » रविवार विशेष… दाढीवाल्या भिकाऱ्याच गिफ्ट!
सामाजिक

रविवार विशेष… दाढीवाल्या भिकाऱ्याच गिफ्ट!

Annant PpangarkarBy Annant Ppangarkar27/08/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज

उन्हं उतरायला लागली होती. मी आणि माझी मैत्रीण घरी परतत होते. मी रोज तिला वाटेत तिच्या बस स्टाॅपवर सोडते. आणि मग पुढे जाते. बसस्टाॅपच्या आधी गाडी थांबवून आम्ही जरा वेळ शिळोप्याच्या गप्पा मारतो, आणि मग आपापल्या दिशेने जातो.

गेले काही दिवस त्या स्टाॅपच्या आधाराने एक कुटूंब रहायला आलंय. भिकारीच असावेत. तिथेच फुटपाथवर चूल मांडलीय. नवरा, बायको, दोन तीन लहान मुलं. एक कुत्र्याचं पिल्लू. कधीच कसली भांडाभांडी न करता अगदी मजेत रहाताना दिसतात ते. रोज बघून बघून मी आता त्यांना ओळखायला लागले.

त्यातलं सगळ्यात छोटं मूल एकदमच गोड हालचाली करत फिरत असतं. असेल जेमतेम दोन अडीच वर्षाचं. बसस्टाॅपच्या दांड्यावर खेळत रहातं. फूटपाथच्या खाली कधी उतरलंच तर माझा जीव खालीवर होतो, पण ते बरोबर जीवाला सांभाळून खेळतं.

मी आणि माझी मैत्रिण गाडीत A/C लावून गप्पा मारत असतो. कधी काहीतरी issue वरून धुसफूसत असतो. तरी माझं लक्ष मात्र त्या मुलांकडे असतं. कुतूहलाने, इतक्या उकाड्यात सुद्धा उघडी वाघडी ती मुलं मजेत असतात. हसत असतात. कधीतरी त्या मुलांना खाऊ आणून द्यायला पाहिजे असं मधेमधे वाटतं. पण रोज विसरायलाच होतं.

त्या दिवशी समोरून एक पोतं घेतलेला माणूस चालत आला. रस्यात पडलेल्या काही काही गोष्टी उचलून तो पोत्यात गोळा करत होता. कळकट मळकट. स्वतःच्या तंद्रीत असलेला तो फाटका माणूस त्या बस स्टाॅपपाशी रेंगाळला. मी आपोआपच त्याचं निरीक्षण चालू केलं. पोतंवाला असावा. कचऱ्यातले कागद गोळा करणारा. त्या छोट्या मुलाच्या गमती बघत तो दोन तीन मिनीटं थबकला. त्याच्या हातात एक केळं होतं. ते त्याने सहज त्या छोट्याला देऊन टाकलं. मी थक्क.

त्याच्या स्वतःकडे कदाचित तेवढी एकच गोष्ट असेल मालकीची. पण ती देताना एक क्षणसुद्धा लागला नाही. त्या छोट्या मुलाने हसत केळं खायला सुरूवात केली. ते बघून तो पोतंवाला पुढे चालू पडला.

स्वतःकडे इतकं कमी असताना समोरच्याला आनंद देणं हे इतकं सोपं असू शकत? देताना कसलंही प्लॅनिंग नाही. कसलाच दिखाऊपणा नाही. दिल्याचा दंभ नाही. कसलीच अपेक्षा नाही, आभाराची सुद्धा. हारतुरे तर लांबच, स्वानंद म्हणून दान. सहज. त्याच्या पोत्यात त्याने पुण्य भरलं होतं बहुतेक, असंच गोळा करून.

मी अवाक्…

त्या पोतंवाल्याची ती सहज हालचाल मला ओशाळं करून गेली. तो पोतंवाला तसाच चालत माझ्या गाडीजवळ आला. मी काच खाली करून त्याला एक नोट दिली. काहीतरी द्यायची तीव्र इच्छा होऊन, बक्षीस दिल्यासारखे! खरं तर गुरूदक्षिणा होती ती. स्वतःकडे इतक कमी असतांना समोरच्याला आनंद देण इतकं सोप नाही, त्या देण्यात जो आनंद आहे त्याच मोल अनमोल असतं!

लेखक: अज्ञात (साभार- सोशल मीडिया)

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 609
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेर ड्रग्ज प्रकरणातील सत्य जनतेसमोर आणा; सोशल मीडियावरील ‘मीडिया ट्रायल’ त्वरित थांबवा! — काँग्रेस कार्याध्यक्ष अमोल शेलकर यांचे पोलीस प्रशासनाला आवाहन; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन पारदर्शक चौकशीचे पुरावे मांडण्याची मागणी

24/09/2026

संगमनेर शहरात वाहतूक कोंडीचा बोजवारा: बेशिस्त रिक्षाचालक, फुटपाथवरील अतिक्रमणे अन् अवैध पार्किंगमुळे नागरिक त्रस्त; पोलीस प्रशासन ढिम्म

24/09/2026

‘संगमनेर फेस्टिव्हल’ हा संगमनेरकरांचा सांस्कृतिक मानबिंदू : मनीष मालपाणी १८ व्या संगमनेर फेस्टिव्हलचा सांगता सोहळा उत्साहात; विनोदी नाटकाने प्रेक्षकांना हसवले मनमुराद

22/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
न्यायालय

संगमनेर एम.डी. ड्रग्ज रॅकेटचे धागेदोर कोणापर्यंत? जिल्हा न्यायालयात नेमकं काय घडलं… आता एक नव्हे तर चार आरोपी

By Annant Ppangarkar28/09/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर शहरातील बहुचर्चित एम.डी. (M.D.) ड्रग्ज तस्करीत दररोज नवनवीन आणि धक्कादायक…

१०० वे पुण्यात, तर १०१ वे साहित्य संमेलन संगमनेरमध्ये, दुर्गाताई तांबे यांची मोठी घोषणा!

28/09/2026

कांदा व्यापाऱ्यावर कोयत्याने वार करणारा फरार आरोपी अखेर दोन वर्षानंतर एलसीबीच्या जाळ्यात

28/09/2026

संगमनेरमधील एका निष्ठावान शिवसैनिकाचा अनुभव व्हायरल; तत्कालीन मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यावरील शाईफेकीने चर्चेत आलेले ठाकरे गटाचे तत्कालीन पदाधिकारी भाऊसाहेब हासे यांनी केलेले वक्तव्य चर्चेत! बाळासाहेब थोरात यांना… ते तर…!

28/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.