Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

जवळेकडलगच्या दुर्देवी घटनेनंतर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची पवार कुटुंबाला सांत्वन भेट; बिबट्यांच्या दहशतीवर प्रशासनाने ठोस उपाययोजना करण्याची मागणी

02/09/2026

संगमनेर सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल: प्राणघातक हल्ल्याप्रकरणी तिघा आरोपींची २ वर्षांची सक्तमजुरी कायम

02/09/2026

पोलिसांचा वाळू माफियांना मोठा धक्का; या दोन तालुक्यातून २० लाखांचा मुद्देमाल जप्त

02/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » राजकारण्यांच्या विनाकारण नादी लागू नका, सरकारनं तुम्हाला वेडं केलं आणि रस्त्यावर आणलं. या लोकांना तुमची फक्त मतं…. राज ठाकरे
राजकारण

राजकारण्यांच्या विनाकारण नादी लागू नका, सरकारनं तुम्हाला वेडं केलं आणि रस्त्यावर आणलं. या लोकांना तुमची फक्त मतं…. राज ठाकरे

लाठीचार्जचा आदेश देणाऱ्या नेत्यांना मराठवाड्यात पाय ठेवू देऊ नका
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar04/09/2023Updated:04/09/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज

जालना – राजकारण्यांच्या विनाकारण नादी लागू नका. सरकारनं तुम्हाला वेडं केलं आणि रस्त्यावर आणलं. या लोकांना फक्त तुमची मतं पाहिजेत. तुमच्यासाठी काही करायचं नाही. आंदोलकांवर लाठीचार्ज करणाऱ्या नेत्यांना मराठवाड्यात येऊ देऊ नका, अशा शब्दात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सरकारवर हल्ला चढवत आंदोलकांना पाठिंबा दिला यामुळे मराठा आरक्षणाचा मुद्दा आणखी पेटण्याची चिन्हे निर्माण झाली आहे.

का आले होते: जालन्यामध्ये एक सप्टेंबरला मराठा आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला यामध्ये आंदोलकांसह आणि पोलीसही जखमी झाले या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोमवारी (4 सप्टेंबर) जालना येथे मराठा आंदोलकांची भेट घेतली.

राजकारण पेटलं: जालन्यातील घटनेनंतर मराठा आरक्षणाचा मुद्दा तीव्रपणे चर्चेत आला आहे. या प्रश्नावरून राजकारण ही पेटलं आहे. जालन्यामध्ये आंदोलकांना भेटण्यासाठी राजकीय नेत्यांची रीघ लागली.

नेत्यांची रीघ: शनिवारी (2 सप्टेंबर) शरद पवार यांनी लाठीचार्ज दरम्यान जखमी झालेल्या आंदोलकांची भेट घेतली. घडलेला हा प्रकार अत्यंत गंभीर असून, पोलिसांना लाठीचार्जची ऑर्डर मुंबईवरून देण्यात आली होती, असा आरोप शरद पवार यांनी केला. त्यापाठोपाठ उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी मराठा आंदोलकांची जालना येथे जाऊन भेट घेतली होती. लाठीचार्ज करण्यासाठी मंत्रालयातून आलेला तो अदृश्य फोन कॉल कोणाचा होता? असा सवाल संजय राऊत यांनी राज्य सरकारला विचारला होता. तसेच छत्रपती संभाजीराजे आणि खासदार उदयनराजे भोसले यांनीही जालना येथे येऊन मराठा आंदोलकांची भेट घेतली. सरकारचे संकटमोचक असलेले गिरीश महाजन यांनी देखील आंदोलकांचे समजूत काढण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांना अपयश आले.

ठाकरेंचा ताफा अडविला: दरम्यान ठाकरे जालन्याकडे येत असताना रस्त्यात मराठा आंदोलकांनी त्यांच्या वाहनांचा ताफा आडवत ठाकरे यांच्यासमोर जोरदार घोषणाबाजी केली. आंदोलकांनी ठाकरे यांना यावेळी निवेदन दिले. ठाकरे यांनी यावेळी बोलताना राज्य सरकारवर टीका केली.

ठाकरेंनी यापूर्वीच केली होती भूमिका स्पष्ट: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी यापूर्वीच मराठा आंदोलनासंदर्भात एका ट्विटद्वारे आपली भूमिका स्पष्ट केली होती. त्यानंतर रविवारी मराठा आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला. ठाकरे यांनी फोनवरून आंदोलकांशी संवाद साधला. आमचा या आंदोलनाला पाठिंबा आहे, असं राज ठाकरे यावेळी म्हणाले. मनसे नेते बाळा नांदगावकर यांनीही रविवारी आंदोलकांची भेट घेऊन त्यांना पाठिंबा जाहीर केला. त्यानंतर आज राज ठाकरे यांनी जालन्यात मराठा आंदोलकांची भेट घेतली.

जालना येथील 'मराठा आरक्षण' आंदोलकांशी चर्चा केल्यानंतर उपस्थितांशी संवाद साधला. #मराठाआरक्षण #MarathaReservation #JalnaMarathaProtest pic.twitter.com/42ipPogHsL

— Raj Thackeray (@RajThackeray) September 4, 2023

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 553
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

आमदार अमोल खताळ यांच्या सूचनेनंतर लोहारे-कासारे पाझर तलावातून पाण्याचा विसर्ग सुरू

30/08/2026

संगमनेर पालिकेचा अनोखा उपक्रम! १ ते २५ सप्टेंबरदरम्यान होणार प्रभागनिहाय बैठका; नगराध्यक्ष डॉ. मैथिली तांबे यांच्या पुढाकाराने नागरिकांच्या प्रश्नांना थेट व्यासपीठ

29/08/2026

संगमनेरकरांच्या अभिप्रेत असलेलेच छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य-दिव्य स्मारक उभारणार! “दीड वर्षे खाती हातात असूनही वाढीव जागेचा प्रश्न सोडवला नाही; आता स्मारकाच्या कामात खोडा घालून संगमनेरकरांची दिशाभूल करू नका”

28/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
सांत्वन

जवळेकडलगच्या दुर्देवी घटनेनंतर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची पवार कुटुंबाला सांत्वन भेट; बिबट्यांच्या दहशतीवर प्रशासनाने ठोस उपाययोजना करण्याची मागणी

By Annant Ppangarkar02/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन: जवळेकडलग येथील अकरा वर्षीय बालक कृष्णा वसंत पवार याचा…

संगमनेर सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल: प्राणघातक हल्ल्याप्रकरणी तिघा आरोपींची २ वर्षांची सक्तमजुरी कायम

02/09/2026

पोलिसांचा वाळू माफियांना मोठा धक्का; या दोन तालुक्यातून २० लाखांचा मुद्देमाल जप्त

02/09/2026

सत्याचा आवाज, लेखणीचा पहारेकरी – ज्येष्ठ पत्रकार अनंत पांगारकर यांचा आंबेडकरी चळवळीच्यावतीने हृद्य सत्कार

02/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.