Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

माहिती अधिकाराचे प्रणेते अण्णा हजारे यांची मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांनी घेतली सदिच्छा भेट; प्रकृतीची केली विचारपूस

03/09/2026

अहिल्यानगरमध्ये ४० नशेची इंजेक्शन्स जप्त; व्यायामपटूंकडून वापराचा संशय, तिघांना अटक

03/09/2026

अहिल्यानगर जिल्ह्यात अवैध गुटखा विक्रीवर स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; ५.३० लाखांचा मुद्देमाल जप्त, ११ जणांवर गुन्हे दाखल

03/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » पालकमंत्रीच राहा, मालक बनू नका; थोडं लक्ष राहाता तालुक्यातही घाला, तेथे आपली आधिक गरज… आ. बाळासाहेब थोरातांचा मंत्री विखे पाटलांना सल्ला
राजकारण

पालकमंत्रीच राहा, मालक बनू नका; थोडं लक्ष राहाता तालुक्यातही घाला, तेथे आपली आधिक गरज… आ. बाळासाहेब थोरातांचा मंत्री विखे पाटलांना सल्ला

थोरात विखे संघर्ष सुरूच...
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar20/09/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज

संगमनेर – संगमनेर तालुक्यातील अधिकारी आणि कर्मचार्‍यांवर दहशत करण्यापेक्षा दुष्काळाकडे गांभीर्याने बघा, दहशत करून किंवा धमक्या देऊन संगमनेरचा विकास तुम्ही रोखू शकत नाही. थोडे लक्ष राहाता तालुक्यातही घाला. तेथील जनतेला लोकप्रतिनिधी म्हणून आपली अधिक आवश्यकता आहे. पालकमंत्री म्हणून राहा, मालक असल्यासारखे वागू नका, असा सल्ला काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांनी पालकमंत्री विखे यांना दिला.

थोरात म्हणाले, पालकमंत्री पालकाची भूमिका विसरून मालकाच्या भूमिकेत आलेले दिसतात. संगमनेरमध्ये येऊन अधिकारी कर्मचार्‍यांसह विकास कामे पूर्णत्वाकडे नेणार्‍या कंत्राटदारांना धमक्या दिल्या जातात, त्यांच्यावर दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. संगमनेरचा विकास त्यांना बघवत नसल्याने, त्यांचा राग मी समजू शकतो. धाकदपटशा आणि दादागिरी करूनही संगमनेरची जनता वाकायला तयार नाही, त्यामुळे त्यांच्यात वैफल्यग्रस्त भावना तयार झाली आहे. दुसरीकडे तलाठी भरती, वाळू धोरण याचा पुरता बोजवारा उडाला, लंपी आजार थांबलेला नाही तो उलट वाढतो आहे. त्यामुळे आपला राग काढायला ते संगमनेरमध्ये येतात. मात्र येथे येऊन दहशतीची भाषा करणार असाल तर जनता सहन करणार नाही.

निळवंडे धरणातून जेव्हा चाचणी केली गेली त्या काळात अजून महिनाभर पाणी सुरू ठेवले असते तर काही बिघडले नसते. आज जाणवणारी दुष्काळाची दाहकता कमी झाली असती, मात्र त्यामुळे संगमनेर, राहता आणि कोपरगाव तालुक्यातील जनतेच्या जीवनात आनंद निर्माण झाला असता तोच न बघवल्याने तातडीने पाणी बंद करण्यात आले. गेली महिनाभरापासून आम्ही सातत्याने मागणी करतोय, आंदोलने करतोय की निळवंडे धरणातून कालव्यामध्ये पाणी सोडा. बरं ही मागणी फक्त संगमनेर तालुक्यातील जनतेचे आहे असे नाही, राहाता तालुक्यातील जनता मोठ्या प्रमाणावर पाणी सोडण्याच्या आग्रही मागणीसाठी संगमनेरमध्ये आली होती. आपल्याकडे मात्र त्यांचा टाहो ऐकायला वेळ नाही.

अजूनही वेळ गेलेली नाही निळवंडे धरणातून तातडीने पाणी सोडा आणि जनतेला धीर द्या आणि महत्त्वाचे म्हणजे पाणी सोडून झाल्यावर लगेच निघून जाऊ नका ते पाणी शेवटच्या ठिकाणापर्यंत पोहोचते की नाही यावरही लक्ष ठेवा.

टँकरच्या संख्येवरून दुष्काळाचे मोजमाप करणार्‍या पालकमंत्र्यांच्या बुद्धीची मला कीव करावीशी वाटते. दुष्काळाच्या दाहकतेने होरपळणार्‍या जनतेच्या वेदनांवर हे फुंकर घालायला आले होते की त्या वेदनेशी खेळायला ? याचा शोध घेण्याची वेळ आली आहे. दुष्काळ ही राजकारण करण्याची जागा नाही. मात्र दुर्दैवाने पालकमंत्री अशाप्रकारे वागताना दिसत असल्याची टीकाही थोरात यांनी केली आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,312
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

आमदार अमोल खताळ यांच्या सूचनेनंतर लोहारे-कासारे पाझर तलावातून पाण्याचा विसर्ग सुरू

30/08/2026

संगमनेर पालिकेचा अनोखा उपक्रम! १ ते २५ सप्टेंबरदरम्यान होणार प्रभागनिहाय बैठका; नगराध्यक्ष डॉ. मैथिली तांबे यांच्या पुढाकाराने नागरिकांच्या प्रश्नांना थेट व्यासपीठ

29/08/2026

संगमनेरकरांच्या अभिप्रेत असलेलेच छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य-दिव्य स्मारक उभारणार! “दीड वर्षे खाती हातात असूनही वाढीव जागेचा प्रश्न सोडवला नाही; आता स्मारकाच्या कामात खोडा घालून संगमनेरकरांची दिशाभूल करू नका”

28/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
महाराष्ट्र संवाद विशेष

माहिती अधिकाराचे प्रणेते अण्णा हजारे यांची मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांनी घेतली सदिच्छा भेट; प्रकृतीची केली विचारपूस

By Annant Ppangarkar03/09/20260

Annant Ppangarkar मुंबई: माहिती अधिकाराचे प्रणेते आणि ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे हे सध्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे…

अहिल्यानगरमध्ये ४० नशेची इंजेक्शन्स जप्त; व्यायामपटूंकडून वापराचा संशय, तिघांना अटक

03/09/2026

अहिल्यानगर जिल्ह्यात अवैध गुटखा विक्रीवर स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; ५.३० लाखांचा मुद्देमाल जप्त, ११ जणांवर गुन्हे दाखल

03/09/2026

अवैध वाळू वाहतूक करणारा हायवा जप्त, २५.६० लाखांचा मुद्देमाल हस्तगत

03/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.