Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

माहिती अधिकाराचे प्रणेते अण्णा हजारे यांची मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांनी घेतली सदिच्छा भेट; प्रकृतीची केली विचारपूस

03/09/2026

अहिल्यानगरमध्ये ४० नशेची इंजेक्शन्स जप्त; व्यायामपटूंकडून वापराचा संशय, तिघांना अटक

03/09/2026

अहिल्यानगर जिल्ह्यात अवैध गुटखा विक्रीवर स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; ५.३० लाखांचा मुद्देमाल जप्त, ११ जणांवर गुन्हे दाखल

03/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » पालकत्व कसे निभवायचे आम्हांला कळते, काही गोष्टी आमच्याकडून शिका; महसूल मंत्री विखे पाटलांचा थोरातांना सल्ला
राजकारण

पालकत्व कसे निभवायचे आम्हांला कळते, काही गोष्टी आमच्याकडून शिका; महसूल मंत्री विखे पाटलांचा थोरातांना सल्ला

संगमनेरला 'शासन आपल्या दारी' कार्यक्रम
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar20/09/2023No Comments3 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज 

संगमनेर – जिल्ह्यातील जनतेला न्याय देण्यासाठी शासन कटीबध्द आहे. अनेक वर्षे सता असूनही ज्यांना तालुक्याला पाणी देता आले नाही त्यांनी आम्हाला सल्ले देण्याच्या भानगडीत पडू नये. पालकत्व कसे निभावयाचे ते आम्हांला चांगले कळते. तुम्हीच आमच्याकडून काही शिका, अशी खोचक टिका महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी माझी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्यावर केली.

संगमनेर येथील शासन आपल्या दारी’ या अभियानात शासकीय योजनांच्या लाभांचे लाभार्थ्यांना महसूलमंत्र्यांच्या हस्ते वितरण करण्यात आले. यावेळी महसूलमंत्री बोलत होते. याप्रसंगी जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, शिर्डीचे अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी लांगोरे, संगमनेरचे उपविभागीय अधिकारी शैलेश हिंगे, तहसीलदार धीरज मांजरे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराडे, गटविकास अधिकारी‌ अनिल नागणे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव लंघे, नितीन दिनकर, सतिष कानवडे, श्रीराम गणपुले, अमोल खताळ, वसंतराव देशमुख, आबासाहेब थोरात, कपिल पवार, सोमनाथ कानकाटे, भिमराज चतर आदी यावेळी उपस्थित होते.

‘शासन आपल्या दारी’ अभियानात संगमनेर तालुक्यातील एक हजार लाभार्थ्यांना योजनांचा लाभ देण्यात येत आहे‌. महिलांना देशपातळीवर आरक्षण देऊन देशाच्या विकासाच्या प्रवाहात आणण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. शासन आपल्या दारी योजनेत जिल्ह्यात जवळपास २४ लाख लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला आहे. एक रूपयात पीक विमा सारखी सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी योजना आणली. यामुळे जिल्ह्यात ११ लाख ८० हजार शेतकऱ्यांनी पीक विमा काढला‌. राज्यात ‘शासन आपल्या दारी’ योजनेत दीड कोटी लाभार्थ्यांना‌ लाभ मिळाला आहे.

शासनाच्या प्रत्येक योजनेत तरूण सहभागी झाला पाहिजे यासाठी ‘युवा ही दुवा’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. राज्यातील प्रत्येक महाविद्यालयात सेतू सुविधा केंद्र सुरू करण्यात येतील. ऑनलाईन दाखल्यांसाठी फी आकारणी करणाऱ्या सेतू सुविधा केंद्राच्या तक्रारी आल्यास त्यांची मान्यता रद्द करण्यात येईल. अवैध वाळू वाहतूकीला लगाम बसला आहे. जलजीवन मिशन मधील अवैध कामांना आळा घालण्यासाठी काम करण्यात येईल. लोकांच्या मनातील सरकार आहे. शासनाने घरोघरी आनंदाचा शिधा वाटप केला. कोणीही शासकीय योजनांच्या लाभापासून वंचित राहणार नाही. अशा शब्दांत त्यांनी उपस्थितांना आश्वस्त केले.

राज्यात ट्रिपल इंजिन सरकार काम करीत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आशीर्वाद सरकारच्या पाठीशी आहे. जनतेत जावून काम करणारे हे सरकार आहे. मागच्या सरकारच्या काळात कोणताही न्याय जनतेला मिळाला नाही. आता जनतेच्या मनातील सरकार असल्याने निर्णय होत आहेत. महीलांना ३३टक्के आरक्षण देण्याच्या निर्णयाबद्दल पंतप्रधान मोदींचे त्यांनी अभिनंदन केले.

तालुक्यात कोणत्याही कामाला चिठ्ठीची गरज भासणार नाही दलालांच्या ताब्यात गेलेला तालुका आता सामान्य लोकांच्या हातात द्यायचा असल्याने सरकार जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून सरकारची सर्वाना न्याय देण्याची भूमिका आहे.

निळवंडे धरणातून कलव्याकरीता ३० सप्टेंबर रोजी पाणी सोडण्यात येणार असल्याचे स्पष्ट करून डाव्या कालव्यांची काम प्रगतीपथावर आहेत. काही भागात ठेकेदारांनी काम जाणीवपुर्वक रखवडली असून त्यांच्याबाबत कठोर निर्णय घेणार असल्याचा इशारा विखे पाटील यांनी दिला.

जिल्हाधिकारी‌ सालीमठ म्हणाले, शासन आपल्या दारी उपक्रमांत आपण वेगवेगळ्या विभागांना २५ लाख विद्यार्थ्यांना लाभ देण्यात आला. आज संगमनेरमधील ११०० पेक्षा जास्त लाभार्थ्यांना लाभ दिला आहे.

यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते लाभार्थ्यांना कृषी यांत्रिकीकरणात २३ टॅकर व नगरपालिकेला ४ घंटागाड्याचे वाटप करण्यात आले. ‘मेरी माटी मेरा देश’ अभियानातील अमृत कलक्ष यात्रा व्हॅनचे यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते ५० पेक्षा लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात लाभ प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. प्रास्ताविक अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर यांनी केले.‌

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 967
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

आमदार अमोल खताळ यांच्या सूचनेनंतर लोहारे-कासारे पाझर तलावातून पाण्याचा विसर्ग सुरू

30/08/2026

संगमनेर पालिकेचा अनोखा उपक्रम! १ ते २५ सप्टेंबरदरम्यान होणार प्रभागनिहाय बैठका; नगराध्यक्ष डॉ. मैथिली तांबे यांच्या पुढाकाराने नागरिकांच्या प्रश्नांना थेट व्यासपीठ

29/08/2026

संगमनेरकरांच्या अभिप्रेत असलेलेच छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य-दिव्य स्मारक उभारणार! “दीड वर्षे खाती हातात असूनही वाढीव जागेचा प्रश्न सोडवला नाही; आता स्मारकाच्या कामात खोडा घालून संगमनेरकरांची दिशाभूल करू नका”

28/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
महाराष्ट्र संवाद विशेष

माहिती अधिकाराचे प्रणेते अण्णा हजारे यांची मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांनी घेतली सदिच्छा भेट; प्रकृतीची केली विचारपूस

By Annant Ppangarkar03/09/20260

Annant Ppangarkar मुंबई: माहिती अधिकाराचे प्रणेते आणि ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे हे सध्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे…

अहिल्यानगरमध्ये ४० नशेची इंजेक्शन्स जप्त; व्यायामपटूंकडून वापराचा संशय, तिघांना अटक

03/09/2026

अहिल्यानगर जिल्ह्यात अवैध गुटखा विक्रीवर स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; ५.३० लाखांचा मुद्देमाल जप्त, ११ जणांवर गुन्हे दाखल

03/09/2026

अवैध वाळू वाहतूक करणारा हायवा जप्त, २५.६० लाखांचा मुद्देमाल हस्तगत

03/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.