Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

तरुणांच्या प्रश्नांवर उत्तरदायित्व मागण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचा उपक्रम; ‘जय भीम Gen-Z’ टाउनहॉल मालिकेचा टीझर प्रदर्शित

10/09/2026

अवैध मावा तयार करणाऱ्या कारखान्यावर एलसीबीचा छापा; १९ वर्षांच्या तरुणासह १ लाख ५ हजारांचा मुद्देमाल जप्त

10/09/2026

‘सध्याच्या राजकीय स्थितीमुळे लोकशाहीच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह’ : प्रा. डॉ. शरद बाविस्कर

10/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेर फेस्टिव्हल; सदाबहार गीतांनी संगमनेरकर मंत्रमुग्ध! पार्श्‍वगायक कुलकर्णीने प्रेक्षकांना डोलायला लावले
सामाजिक

संगमनेर फेस्टिव्हल; सदाबहार गीतांनी संगमनेरकर मंत्रमुग्ध! पार्श्‍वगायक कुलकर्णीने प्रेक्षकांना डोलायला लावले

संगमनेर फेस्टिवल दुसरा दिवस
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar22/09/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज 

संगमनेर – मनामनात दरवळणारी गाणी.. सुमधूर आवाजातून सादर होणार्‍या एकामागून एक सुरेल रचना.. हिंदी, चित्रपटगीतांपासून ते अलिकडच्या काळात तरुणाईत प्रचंड गाजलेली सुफी गाणी व रिमिक्स.. निवेदकाचे समयोचित निवेदन आणि बहारदार संगीताने संगमनेर फेस्टिव्हलचा दुसरा दिवस गाजला. विविध दूरचित्र वाहिन्यांवरील कार्यक्रमाच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेल्या कलाकारांच्या सुमधूर आवाजातील गाण्यांनी सजलेल्या मैफीलीने संगमनेरकर रसिकांना मंत्रमुग्ध केले.

गणेश आरतीचा यांना मिळाला मान: राजस्थान युवक मंडळ आणि मालपाणी उद्योग समूहाने आयोजित केलेल्या संगमनेर फेस्टिव्हलच्या दुसर्‍या दिवशी फेस्टिव्हलचे अध्यक्ष मनिष मालपाणी, सीए कैलास सोमाणी, राणीप्रसाद मुंदडा, सोनु राजपाल, नवनीत कोठारी, सत्यम वारे, राजकुमार गांधी, अजित भोत आदींच्या हस्ते गणरायांची आरती करण्यात आली.

प्रेक्षकांना खिळवून ठेवले: चित्रपट सृष्टीतील पार्श्‍वगायनात अल्पावधीतच उंची गाठणार्‍या चैतन्य कुलकर्णी याच्यासह गौरी गोसावी, रवींद्र खोमने व श्रावणी महाजन यांनी झी, सोनी आणि स्टार या वाहिन्यांवरील विविध कार्यक्रमांतून आपली प्रतिभा ठळकपणे उमटविली आहे. या तरुण गायकांच्या सुमधूर आवाजातील नव्या-जून्या हिंदी चित्रपट गीतांवर आधारित असलेला ‘द बेस्ट ऑफ बॉलीवूड लाईव्ह’ हा बहारदार कार्यक्रम ऐकण्याची व पाहण्याची संधी संगमनेरकरांना मिळाली. तुडूंब भरलेल्या प्रेक्षागारासह रिझीम कोसळणार्‍या पावसाच्या साक्षीने सुरु झालेल्या या कार्यक्रमाने एकामागून एक गाजलेली गाणी सादर करीत उपस्थितांना शेवटपर्यंत खिळवून ठेवले.

तीन तासाहून अधिक काळ कार्यक्रम: कार्यक्रमाच्या सुरुवातीला गायक रवींद्र खोमने यांनी गणेश वंदना सादर केली. त्यानंतर पार्श्‍वगायीका गौरी गोसावी यांनी सादर केलेल्या सुफी गीताने उपस्थितांमध्ये टाळ्या आणि शिट्ट्यांचा अक्षरशः पाऊस पाडला. सूत्रसंचालकाच्या बहारदार निवेदनातून सादर होणार्‍या प्रत्येक गीताचा इतिहास उलगडला. चैतन्य कुलकर्णी याने सादर केलेल्या सुफी-हिंदी-पंजाबी रिमिक्स गीताच्या तालावर तर अक्षरशः उपस्थितांना जागेवरच उभे राहून डोलायलाही लावले. जवळपास तीन तासांहून अधिक वेळ रंगलेल्या या संगीत मैफलीचा शेवट वंदे मातरमने करण्यात आला.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 995
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

तरुणांच्या प्रश्नांवर उत्तरदायित्व मागण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचा उपक्रम; ‘जय भीम Gen-Z’ टाउनहॉल मालिकेचा टीझर प्रदर्शित

10/09/2026

संगमनेर शहरात वाढणार सीसीटीव्हीची नजर; विविध विकासकामांचे सोमवारी बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते होणार लोकार्पण

05/09/2026

सत्याचा आवाज, लेखणीचा पहारेकरी – ज्येष्ठ पत्रकार अनंत पांगारकर यांचा आंबेडकरी चळवळीच्यावतीने हृद्य सत्कार

02/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
सामाजिक

तरुणांच्या प्रश्नांवर उत्तरदायित्व मागण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचा उपक्रम; ‘जय भीम Gen-Z’ टाउनहॉल मालिकेचा टीझर प्रदर्शित

By Annant Ppangarkar10/09/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – फुले-शाहू-आंबेडकर विचारधारेशी जोडलेल्या तरुणांशी थेट संवाद साधण्याच्या आणि त्यांच्या आशा-आकांक्षा…

अवैध मावा तयार करणाऱ्या कारखान्यावर एलसीबीचा छापा; १९ वर्षांच्या तरुणासह १ लाख ५ हजारांचा मुद्देमाल जप्त

10/09/2026

‘सध्याच्या राजकीय स्थितीमुळे लोकशाहीच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह’ : प्रा. डॉ. शरद बाविस्कर

10/09/2026

आज गुरुवार, १० सप्टेंबर जाणून घ्या आजच्या दिवसाचे राशिभविष्य

10/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.