Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

तरुणांच्या प्रश्नांवर उत्तरदायित्व मागण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचा उपक्रम; ‘जय भीम Gen-Z’ टाउनहॉल मालिकेचा टीझर प्रदर्शित

10/09/2026

अवैध मावा तयार करणाऱ्या कारखान्यावर एलसीबीचा छापा; १९ वर्षांच्या तरुणासह १ लाख ५ हजारांचा मुद्देमाल जप्त

10/09/2026

‘सध्याच्या राजकीय स्थितीमुळे लोकशाहीच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह’ : प्रा. डॉ. शरद बाविस्कर

10/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेर फेस्टिव्हल: मुंबईच्या संघांनी पटकाविले राज्यस्तरीय नृत्यस्पर्धेचे अजिंक्यपद!
सामाजिक

संगमनेर फेस्टिव्हल: मुंबईच्या संघांनी पटकाविले राज्यस्तरीय नृत्यस्पर्धेचे अजिंक्यपद!

प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक वैभव घुगे यांची उपस्थिती
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar23/09/2023No Comments3 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज

संगमनेर – क्षणाक्षणाला पडणार्‍या टाळ्या.. त्याला मिळणारी शिट्ट्यांची साथ.. उपस्थितांतून होणारा जल्लोष आणि गणपती बाप्पांचा जयजयकार आणि सोबतीला मुसळधार पाऊस अशा जल्लोशपूर्ण वातावरणात संगमनेर फेस्टिव्हलचा तिसरा दिवस गाजला.

विजेता: मुंबईच्या आरडी वॉरिअर्स नृत्य संघाने सादर केलेल्या महाभारतावर आधारित हिपहॉप नृत्याने मालपाणी लॉन्सचा परिसर अक्षरशः भारावून गेला. हे नृत्य इतके बहारदार होते की त्याच्या सादरीकरणातच या संघाने पहिले पारितोषिक पटकाविल्याचे आडाखे बांधले गेले. कनिष्ठ गटातही मुंबईच्याच इंडियन आर्मी नृत्य संघाने सर्जीकल स्ट्राईकच्या पार्श्‍वभूमीवर अप्रतिम नृत्य सादर करीत उपस्थितांना देशभक्तीत चिंब केले.

राज्यस्तरीय समूह नृत्य स्पर्धा: राजस्थान युवक मंडळ व मालपाणी उद्योग समूहाने आयोजित केलेल्या संगमनेर फेस्टिव्हलच्या आजच्या तिसर्‍या दिवशी राज्याच्या विविध भागातील नृत्य संघांचा समावेश असलेली राज्यस्तरिय समूहनृत्य स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. संगमनेरातील विविध संघांसह राज्यभरातील जवळपास चाळीस संघांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला.

विजेते: स्पर्धेच्या वरीष्ठ गटात मुंबईच्या आरडी वॉरिअर्स नृत्य संघाने रंगमंचावर नृत्यातून सादर केलेल्या महाभारतातील कुरुक्षेत्रावरील प्रसंगाने अक्षरशः रोमांच निर्माण केला. उत्कृष्ट वेशभूषा, साजेशी रंगछटा, परस्परांशी समन्वय, जलद आणि अचुक हालचाली, उत्कृष्ट पदलालीत्य अशा सर्व क्षेत्रात बाजी मारीत या संघाने सादरीकरणातच या स्पर्धेचे अजिंक्यपद पटकाविले. 21 हजार रुपये रोख आणि स्मृतीचिन्ह देऊन त्यांना गौरविण्यात आले. मुंबईच्याच रेज रि-युनायटेड संघाला 15 हजार रुपयांचे पहिले, नारायणगावच्या द रि-युनियन क्रू समूहाला 11 हजार रुपयांचे दुसरे, संगमनेरच्या संस्कार बालभवनने सादर केलेल्या शास्त्रीय नृत्यासह श्रीरामपूरच्या नक्षत्र नृत्य समूहाच्या गणेश वंदनेला विभागून तिसरे पारितोषिक देण्यात आले. पुण्याच्या गोल्डन स्टार्स, नाशिकच्या द टॅरेंटस् आणि संगमनेरच्या ध्रुव ग्लोबल स्कूलच्या संघांना उत्तेजनार्थ बक्षिसे देण्यात आली.

कनिष्ठ गटातील विजेते: कनिष्ठ गटात सादर झालेल्या विविध नृत्यप्रकारांनी उपस्थितांना खिळवून ठेवले होते. या गटात मुंबईच्या इंडियन आर्मी नृत्य संघाने उरी चित्रपटावर आधारित प्रसंगांना नृत्याचा साज चढवून देशभक्ती जागवली. त्याच्या अफलातून अविष्काराने या नृत्यस्पर्धेतील कनिष्ठ गटाचे अजिंक्यपद मिळवले. परभणीच्या आयुष नृत्य समूहाने काठी न् घोंगडं.. या रिमीक्स गीतावर सुंद लोकनृत्य सादर करतांना 11 हजारांच्या रोख रकमेसह पहिला क्रमांक पटकाविला. अकोले येथील पीव्हीआर संघाने खंडोबाचा गोंधळ घालीत सात हजारांचे दुसरे, शास्त्रीय नृत्य सादर करणार्‍या संगमनेरच्या ध्रुव ग्लोबल स्कूलसह नवी मुंबईच्या जेएचके 21 क्रू समूहाला विभागून तिसरा क्रमांक देण्यात आला. जीएनडी क्रू, नीत्य डान्स अकादमी (पारनेर) व संगमनेरच्या बीटऊस नृत्य संघाला उत्तेजनार्थ बक्षिसे देवून गौरविण्यात आले.

परीक्षक आणि उपस्थिती: रचना मालपाणी, मिलींद पलोड व केवल गुजराथी यांनी परिक्षकाची भूमिका बजावली. आजच्या कार्यक्रमासाठी विशेष उपस्थित असलेले नृत्य दिग्दर्शक वैभव घुगे, संगमनेर फेस्टिव्हलचे अध्यक्ष मनिष मालपाणी, गिरीश मालपाणी, राजस्थान मंडळाचे कार्याध्यक्ष सम्राट भंडारी, उपाध्यक्ष सुदर्शन नावंदर, सचिव ओम इंदाणी, खजिनदार व्यंकटेश लाहोटी आदींच्या हस्ते विजेत्या संघांना पारितोषिके देण्यात आली. सचिन पलोड व प्रशांत करपे यांनी आजच्या कार्यक्रमाचे बहारदार निवेदन करीत संगमनेरकरांची मने जिंकली.

मुलांना पराभव शिकवा..

या कार्यक्रमाला विशेष उपस्थित असलेले हिंदी-मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज नृत्य दिग्दर्शक वैभव घुगे यांनी यावेळी बोलतांना कोटा (राजस्थान) येथील विद्यार्थ्यांच्या एकामागून एक आत्महत्येच्या घटनांचा उल्लेख करीत पालकांशी संवाद साधला. आपल्या मुलांमधील कलागुण ओळखा व त्यांना त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात रमू द्या, इतर मुलांशी त्यांची तुलना करु नका, आपल्या मुलांना जिंकायला नव्हेतर हरायला शिकवा म्हणजे त्यांच्यावर दबावही येणार नाही आणि त्यांना जिंकण्याचे महत्त्वही सहज समजेल असा मोलाचा सल्ला त्यांनी दिला. केवळ डॉक्टर, इंजिनिअर होणं म्हणजेच प्रगती ठरु शकत नाही, कोणत्याही क्षेत्रात उत्तुंग काम घडले की पैसा आणि प्रतिष्ठा आपोआप येते. मुलांना त्यांचे जीवन जगू द्या असे आवाहनही त्यांनी केले.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 528
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

तरुणांच्या प्रश्नांवर उत्तरदायित्व मागण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचा उपक्रम; ‘जय भीम Gen-Z’ टाउनहॉल मालिकेचा टीझर प्रदर्शित

10/09/2026

संगमनेर शहरात वाढणार सीसीटीव्हीची नजर; विविध विकासकामांचे सोमवारी बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते होणार लोकार्पण

05/09/2026

सत्याचा आवाज, लेखणीचा पहारेकरी – ज्येष्ठ पत्रकार अनंत पांगारकर यांचा आंबेडकरी चळवळीच्यावतीने हृद्य सत्कार

02/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
सामाजिक

तरुणांच्या प्रश्नांवर उत्तरदायित्व मागण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचा उपक्रम; ‘जय भीम Gen-Z’ टाउनहॉल मालिकेचा टीझर प्रदर्शित

By Annant Ppangarkar10/09/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – फुले-शाहू-आंबेडकर विचारधारेशी जोडलेल्या तरुणांशी थेट संवाद साधण्याच्या आणि त्यांच्या आशा-आकांक्षा…

अवैध मावा तयार करणाऱ्या कारखान्यावर एलसीबीचा छापा; १९ वर्षांच्या तरुणासह १ लाख ५ हजारांचा मुद्देमाल जप्त

10/09/2026

‘सध्याच्या राजकीय स्थितीमुळे लोकशाहीच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह’ : प्रा. डॉ. शरद बाविस्कर

10/09/2026

आज गुरुवार, १० सप्टेंबर जाणून घ्या आजच्या दिवसाचे राशिभविष्य

10/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.