Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

तरुणांच्या प्रश्नांवर उत्तरदायित्व मागण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचा उपक्रम; ‘जय भीम Gen-Z’ टाउनहॉल मालिकेचा टीझर प्रदर्शित

10/09/2026

अवैध मावा तयार करणाऱ्या कारखान्यावर एलसीबीचा छापा; १९ वर्षांच्या तरुणासह १ लाख ५ हजारांचा मुद्देमाल जप्त

10/09/2026

‘सध्याच्या राजकीय स्थितीमुळे लोकशाहीच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह’ : प्रा. डॉ. शरद बाविस्कर

10/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » विसर्जन मार्गाच्या रस्त्याने नो एन्ट्री, एक पूल खचलेला, नेमकं म्हाळुंगीला पाणी आल्याने दुसरा पूल बंद… बाप्पाच्या विसर्जनासाठी एकच मार्ग सुरू! मुख्याधिकाऱ्यांनी केले हे आवाहन…
सामाजिक

विसर्जन मार्गाच्या रस्त्याने नो एन्ट्री, एक पूल खचलेला, नेमकं म्हाळुंगीला पाणी आल्याने दुसरा पूल बंद… बाप्पाच्या विसर्जनासाठी एकच मार्ग सुरू! मुख्याधिकाऱ्यांनी केले हे आवाहन…

बाप्पाच्या परतीच्या मार्गात विघ्न
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar28/09/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज

संगमनेर – अन्य सर्व मार्ग बंद झाल्याने गणेश विसर्जनासाठी प्रवरा नदीवर जाण्यासाठी केवळ अकोले रोड कडून मालपाणी हेल्थ क्लब मार्गे गंगामाई घाटाकडे जाणारा एकमेव रस्ता सुरू असल्याने गणेश भक्तांचे मोठे हाल झाल्याचे बघावयास मिळाले.

मुख्य मानाच्या गणेश विसर्जन मार्गावरील प्रवरा नदीकडे जाणाऱ्या परदेशपुऱ्यातील मठाजवळील रस्ता रस्त्यावर इतर गणेश भक्तांना परवानगी नसल्याने बंद असतो. त्यामुळे स्वामी समर्थ मंदिराजवळील पुलावरून प्रवरा नदीवरील गंगामाई घाटाकडे जाणारा, अकोले रोड मार्गे मालपाणी हेल्थ क्लबच्या बाजूने गंगामाई घाटाकडे जाणारा रस्ता गणेश विसर्जनाकरिता खुला असतो. या दोन मार्गाने विसर्जन केले जाते. मात्र गेल्या वर्षभरापासून स्वामी समर्थ मंदिर ते साई मंदिरा दरम्यानचा पूल खचल्यामुळे वाहतुकीसाठी बंद आहे. त्याला तात्पुरता पर्याय रस्ता म्हणून साईनगर जवळील म्हाळुंगी नदीवर तात्पुरत्या स्वरूपात पूल बांधण्यात आला मात्र गुरुवारी म्हाळुंगी नदीला पाणी आल्याने हा पूल देखील वाहतुकीसाठी तातडीने बंद करण्यात आला. त्यामुळे अकोले रोड कडून प्रवरा नदीकडे जाणारा एकमेव रस्ता विसर्जनासाठी आज खुला होता.

या दूरच्या मार्गाने आज संगमनेरकर गणेश भक्तांना बाप्पाच्या विसर्जनाची मोठी कसरत करावी लागली. संगमनेरकर नागरिकांनी शहरातील गणेश मंडळे आपल्या बाप्पाच्या विसर्जनासाठी स्वामी समर्थ मंदिरापाशी आल्यानंतर त्यांना मोठा वळसा घालून म्हाळुंगी नदीच्या कडेने राज पॅलेस कडून अकोले रोडला जावे लागत होते.

मुख्याधिकारी राहुल वाघ यांनी केले हे आवाहन…

म्हाळुंगी नदीला भोजापुर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू झाल्याने सुरक्षिततेच्या दृष्टीने साईनगर कडे जाणारा तात्पुरता पूल बंद करण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांनी गंगामाई घाटाकडे जाण्यासाठी पर्यायी रस्त्याचा अवलंब करावा. तसेच श्री गणेश मूर्ती व निर्मल्य संकलनासाठी शहरातील विविध भागात संकलन केंद्र सुरू आहे गणेश भक्तांनी याची नोंद घेऊन नगर परिषदेस सहकार्य करण्याचे आवाहन संगमनेर नगरपालिकेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक राहुल वाघ यांनी केले आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 983
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

तरुणांच्या प्रश्नांवर उत्तरदायित्व मागण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचा उपक्रम; ‘जय भीम Gen-Z’ टाउनहॉल मालिकेचा टीझर प्रदर्शित

10/09/2026

संगमनेर शहरात वाढणार सीसीटीव्हीची नजर; विविध विकासकामांचे सोमवारी बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते होणार लोकार्पण

05/09/2026

सत्याचा आवाज, लेखणीचा पहारेकरी – ज्येष्ठ पत्रकार अनंत पांगारकर यांचा आंबेडकरी चळवळीच्यावतीने हृद्य सत्कार

02/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
सामाजिक

तरुणांच्या प्रश्नांवर उत्तरदायित्व मागण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचा उपक्रम; ‘जय भीम Gen-Z’ टाउनहॉल मालिकेचा टीझर प्रदर्शित

By Annant Ppangarkar10/09/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – फुले-शाहू-आंबेडकर विचारधारेशी जोडलेल्या तरुणांशी थेट संवाद साधण्याच्या आणि त्यांच्या आशा-आकांक्षा…

अवैध मावा तयार करणाऱ्या कारखान्यावर एलसीबीचा छापा; १९ वर्षांच्या तरुणासह १ लाख ५ हजारांचा मुद्देमाल जप्त

10/09/2026

‘सध्याच्या राजकीय स्थितीमुळे लोकशाहीच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह’ : प्रा. डॉ. शरद बाविस्कर

10/09/2026

आज गुरुवार, १० सप्टेंबर जाणून घ्या आजच्या दिवसाचे राशिभविष्य

10/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.