Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

मुलांऐवजी पालकांसाठी संस्कार शिबिर घ्या! — डॉ. संजय कळमकर यांचा घणाघाती टोला; बालकुमार साहित्य संमेलनात रंगली वैचारिक चर्चा

28/09/2026

संगमनेर एम.डी. ड्रग्ज रॅकेटचे धागेदोर कोणापर्यंत? जिल्हा न्यायालयात नेमकं काय घडलं… आता एक नव्हे तर चार आरोपी

28/09/2026

१०० वे पुण्यात, तर १०१ वे साहित्य संमेलन संगमनेरमध्ये, दुर्गाताई तांबे यांची मोठी घोषणा!

28/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » निळवंडेच्या डाव्या कालव्यातून पाणी सुटले; लगेचच या मंत्र्यांनी केलं जलपूजन!
आंदोलन

निळवंडेच्या डाव्या कालव्यातून पाणी सुटले; लगेचच या मंत्र्यांनी केलं जलपूजन!

पाझर तलाव, विहिरी, ओढे भरून शेतपिकांना मिळणार जल संजीवनी ! शेतकऱ्यांचा पुन्हा एकदा जल्लोष
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar14/10/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज

निळवंडे – निळवंडे धरणाच्या डाव्या कालव्यातून शनिवारी (14 ऑक्टोंबर) महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते जलपूजन करून पाणी सोडण्यात आले. डाव्या कालव्याची ३१ मे २०२३ रोजी चाचणी यशस्वी झाल्यानंतर लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांची अनेक दिवसांपासून पाणी सोडण्याची मागणी होती.

डाव्या कालव्यातून एक टीएमसी पाणी सोडले जाणार आहे. यामुळे लाभक्षेत्रातील कोरडे पडलेले पाझर तलाव, विहिरी, ओढे व जलस्रोतांना पाणी मिळून शेतपिकांना जल संजीवनी मिळणार आहे. यामुळे शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा जल्लोष केला.

डाव्या कालव्यातून पाणी सोडण्यासाठी महसूलमंत्र्यांचे निळवंडे येथे आगमन झाल्यावर त्यांनी स्थानिक शेतकऱ्यांशी थेट जमीनीवर बसून चर्चा केली. कॉम्रेड अजित नवले यांच्या नेतृत्वाखाली आलेल्या शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने शेतकऱ्यांचे प्रश्न मांडले.

यावर महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री विखे पाटील म्हणाले, उच्चस्तरीय कालव्यांची चाचणी करून ३० ऑक्टोंबरपर्यंत पाणी सोडण्यात येईल. उच्चस्तरीय कालव्यांतील वरच्या भागात वंचित राहिलेल्या १७०० हेक्टर क्षेत्रास पाणी देण्याच्या दृष्टीने दसऱ्यापूर्वी लोणी येथे शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाशी चर्चा करून राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जलसंपदामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक आयोजित करण्यात येईल.‌ प्रकल्पग्रस्तांना मुद्यावर स्वतंत्रपणे बैठक आयोजित करण्यात येऊन त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी शासन कटीबद्ध आहे. अशा शब्दात महसूलमंत्र्यांनी शेतकऱ्यांना आश्वस्त केले.

डाव्या कालव्याच्या चाचणी वेळी पाणी गळतीमुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेतपीकांचे नुकसान झाले. अशा शेतकऱ्यांच्या शेतजमिनीचे स्वतंत्र पंचनामे करून नियामक मंडळाकडे भरपाईचा प्रस्ताव पाठविण्यात येईल. कालव्यांसाठी अतिरिक्त भूसंपादन केलेल्या शेतजमिनी पडून आहेत. अशा शेतजमिनी मूळ शेतकऱ्यांना वर्ग करण्यासाठी शासन पातळीवर पाठपुरावा करण्यात येईल. असेही महसूलमंत्री विखे-पाटील यांनी सांगितले. पाणी सोडल्यानंतर महसूलमंत्र्यांनी सावरगाव पावसा येथे उजवा कालवा साईट पाहणी करून प्रलंबित कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांना सूचना केल्या.

यावेळी‌ माजी आमदार वैभव पिचड, निळवंडे प्रकल्पाचे अधीक्षक अभियंता बाळासाहेब शेटे, कार्यकारी अभियंता कैलास ठाकरे, उप विभागीय अभियंता जी. व्ही.मगदूम, संगमनेर प्रांताधिकारी शैलेश हिंगे, अकोले तहसीलदार सतीश थिटे व स्थानिक शेतकरी उपस्थित होते.

दरम्यान, डाव्या कालव्यातून पाणी सोडण्यात आल्याने निळवंडे पाटपाणी कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी संगमनेर येथे जल्लोष केला.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,082
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

प्रशासनाच्या नाकर्तेपणाविरोधात संगमनेर पेटले! संतप्त शेतकरी प्रांताधिकारी कार्यालयात घुसले आमदारांचे फ्लेक्स लावायला तुम्ही त्यांचे गुलाम आहात का? – माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचा थेट सवाल यशवंतराव चव्हाण प्रशासकीय भवनाच्या पायऱ्यांवर ठिय्या आंदोलन; अखेर प्रांताधिकारी अरुण उंडे नमले, निवेदन स्वीकारले

22/09/2026

विजेचा खेळखंडोबा अन् पाणी पळवण्याचा डाव; संगमनेरमध्ये उद्या महाआक्रोश मोर्चा!

21/09/2026

वीज प्रश्नावर संगमनेर काँग्रेसचा ‘जनआक्रोश मोर्चा’; बाळासाहेब थोरातांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात जोरदार तयारी

19/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
महाराष्ट्र संवाद विशेष

मुलांऐवजी पालकांसाठी संस्कार शिबिर घ्या! — डॉ. संजय कळमकर यांचा घणाघाती टोला; बालकुमार साहित्य संमेलनात रंगली वैचारिक चर्चा

By Annant Ppangarkar28/09/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- “सध्याच्या डिजिटल युगात अन्न, वस्त्र आणि निवारा यासोबत ‘मोबाईल डेटा’ ही…

संगमनेर एम.डी. ड्रग्ज रॅकेटचे धागेदोर कोणापर्यंत? जिल्हा न्यायालयात नेमकं काय घडलं… आता एक नव्हे तर चार आरोपी

28/09/2026

१०० वे पुण्यात, तर १०१ वे साहित्य संमेलन संगमनेरमध्ये, दुर्गाताई तांबे यांची मोठी घोषणा!

28/09/2026

कांदा व्यापाऱ्यावर कोयत्याने वार करणारा फरार आरोपी अखेर दोन वर्षानंतर एलसीबीच्या जाळ्यात

28/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.