Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

कचरा वेचण्याच्या बहाण्याने ‘रेकी’; बंद घरे गाठून घरफोडी करणाऱ्या दोन महिला जेरबंद

July 25, 2026

आज, शनिवार २५ जुलै २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

July 25, 2026

संगमनेर शहर पोलिस स्टेशनमध्ये उद्या तक्रार निवारण दिनाचे आयोजन

July 24, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » थोरात कारखान्याचा शुक्रवारी बॉयलर अग्नी प्रदीपन
शेती व सहकार

थोरात कारखान्याचा शुक्रवारी बॉयलर अग्नी प्रदीपन

कारखान्याचे संचालक सपत्नीक करणार बॉयलरची पूजा
अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरOctober 16, 2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज 

संगमनेर : सहकारासाठी दिशादर्शक असलेल्या सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या सन 2023 – 24 गळीत हंगामाचा बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ शुक्रवारी (ता. 20 ऑक्टोंबर) सकाळी 10 वाजता काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते तथा माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात व सौ. कांचनताई थोरात यांच्या हस्ते व माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे, माधवराव कानवडे यांच्या उपस्थितीत आणि कारखान्याचे चेअरमन प्रतापराव ओहोळ यांच्या अध्यक्षतेखाली होणार असल्याची माहिती उपाध्यक्ष संतोष हासे यांनी दिली आहे.

काँग्रेस पक्ष वरिष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली थोरात सहकारी साखर कारखान्याने मागील गळीत हंगामात 10 लाख मॅट्रिक टनांपेक्षा जास्त गाळप केले आहे. शेतकरी,सभासद, कार्यक्षेत्र बाहेरील ऊस उत्पादक या सर्वांचा थोरात कारखान्यावर मोठा विश्वास असून या कारखान्याने यावर्षी कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादकांना सर्वाधिक 2835 रुपये भाव दिला आहे.

हे वर्ष अमृत उद्योग समूहाचे संस्थापक थोर स्वातंत्र्य सेनानी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांचे जन्मशताब्दी वर्ष म्हणून साजरे होत असून यानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजनही केले आहे.

शुक्रवारी कारखान्याचे संचालक मिनानाथ गोपीनाथ वर्पे व त्यांच्या पत्नी सौ. हिराताई, डॉ. तुषार दिनकर दिघे व त्यांच्या पत्नी सौ. सुरेखाताई, माणिकराव दाजीबा यादव व त्यांच्या पत्नी सौ. लताताई, संभाजी दगडू वाकचौरे व त्यांच्या पत्नी सौ. सिंधुताई, संचालिका सौ. मंदाताई व शेखर तुकाराम वाघ यांच्या हस्ते बॉयलर अग्निप्रदीपन पूजा होणार आहे.

कार्यक्रमासाठी संगमनेर तालुक्यातील अमृत उद्योग समूहातील विविध संस्थांचे पदाधिकारी व मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तरी या कार्यक्रमाला सर्व शेतकरी, ऊस उत्पादक व सभासद यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांनी केले आहे.

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 445
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

संगमनेर तालुक्यात ७५ टक्के पेरण्या पूर्ण; पाऊस लांबल्याने शेतकरी चिंतेत, दुबार पेरणीचे संकट

July 18, 2026

युरियाचा बफर स्टॉक तातडीने खुला करा, अन्यथा तीव्र आंदोलन; संगमनेर तालुका काँग्रेसचा प्रशासनाला इशारा

July 15, 2026

सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना: ३१ जुलैपर्यंत सहभागी होण्याचे कृषी विभागाचे आवाहन

July 13, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

कचरा वेचण्याच्या बहाण्याने ‘रेकी’; बंद घरे गाठून घरफोडी करणाऱ्या दोन महिला जेरबंद

By अनंत पांगारकरJuly 25, 20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, आळेफाटा: हातात प्लास्टिकच्या रिकाम्या बाटल्या आणि पोती धरून कचरा गोळा करण्याचा…

आज, शनिवार २५ जुलै २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

July 25, 2026

संगमनेर शहर पोलिस स्टेशनमध्ये उद्या तक्रार निवारण दिनाचे आयोजन

July 24, 2026

संघटित गुन्हेगारीविरोधात मोठे पाऊल; गोवंश तस्करीप्रकरणी ‘बीएनएस’ कलम १११ अन्वये दोघांवर पहिली मोठी कारवाई संगमनेरात

July 24, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.