Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

माहिती अधिकाराचे प्रणेते अण्णा हजारे यांची मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांनी घेतली सदिच्छा भेट; प्रकृतीची केली विचारपूस

03/09/2026

अहिल्यानगरमध्ये ४० नशेची इंजेक्शन्स जप्त; व्यायामपटूंकडून वापराचा संशय, तिघांना अटक

03/09/2026

अहिल्यानगर जिल्ह्यात अवैध गुटखा विक्रीवर स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; ५.३० लाखांचा मुद्देमाल जप्त, ११ जणांवर गुन्हे दाखल

03/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेरमध्ये आमदार बाळासाहेब थोरातच ‘सरकार’; सात पैकी पाच ग्रामपंचायत मध्ये निर्विवाद सत्ता, एक ग्रामपंचायत मंत्री विखे समर्थकांकडे तर एक ग्रामपंचायत आहेर गटाकडे
राजकारण

संगमनेरमध्ये आमदार बाळासाहेब थोरातच ‘सरकार’; सात पैकी पाच ग्रामपंचायत मध्ये निर्विवाद सत्ता, एक ग्रामपंचायत मंत्री विखे समर्थकांकडे तर एक ग्रामपंचायत आहेर गटाकडे

Annant PpangarkarBy Annant Ppangarkar06/11/2023Updated:06/11/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज

संगमनेर : ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये महसूल मंत्री विखे गटाकडून आव्हान देण्याचा प्रयत्न होऊन देखील आमदार बाळासाहेब थोरात यांचेच वर्चस्व कायम राहिले असल्याने ‘थोरातच सरकार’ असल्याचे संगमनेरकरांनी दाखवून दिले. संगमनेर तालुक्यात झालेल्या सात पैकी पाच ग्रामपंचायतींवर थोरात समर्थकांनी निर्विवाद विजय मिळविला. तर संगमनेर तालुक्यातील मात्र शिर्डी विधानसभा मतदार संघात येणाऱ्या आश्वी खुर्दची ग्रामपंचायत विखे समर्थकांकडे, पठार भागातील घारगावची ग्रामपंचायत शिवसेना (ठाकरे) गटाचे जनार्दन आहेर यांनी आपल्या गटाच्या ताब्यात ठेवली.

सुरुवातीलाच संगमनेर तालुक्यातील ढोलेवाडी आणि बोरबन या दोन ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या होत्या. या दोन्ही ग्रामपंचायतींवर माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या समर्थकांनी काँग्रेसचा झेंडा फडकविला. तर तालुक्यातील आश्वी खुर्द आणि आश्वी बुद्रुक, गुंजाळवाडी, पिंपळगाव कोंझिरा व घारगाव या ग्रामपंचायतीसाठी रविवारी मतदान झाले होते.

संगमनेर तहसील कार्यालयात सोमवारी सकाळी या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठीची मतमोजणी झाली. निवडणूक निकालानंतर आमदार बाळासाहेब थोरात यांच्या समर्थकांनी निर्विवाद वर्चस्व मिळविल्याचे समोर आले. महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी संगमनेर तालुक्यात आपल्या समर्थकांना बळ देत या निवडणुकीत काँग्रेसला आव्हान देण्याचा प्रयत्न केला. मात्र मंत्री विखे समर्थकांकडे असलेल्या आश्वी खुर्दच्या एकमेव ग्रामपंचायत व घारगावचा अपवाद वगळता मतदारांनी थोरात यांच्या नेतृत्वावर विश्वास दर्शविला.

ग्रामपंचायत निवडणुकीत निवडून आलेल्या सदस्य व सरपंचांचा थोरात यांच्या यशोधन संपर्क कार्यालयात आमदार बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. ढोलेवाडी व बोरबनच्या सरपंचपदी अनुक्रमे शालिनी ढोले व अरुणा गाडेकर यांची बिनविरोध निवड झाली तर गुंजाळवाडी ग्रामपंचायतमध्ये थोरात गटाचे अमोल उर्फ नरेंद्र गुंजाळ, आश्वी बुद्रुक ग्रामपंचायतमध्ये थोरात गटाचे नामदेव शिंदे उर्फ पाणीवाले बाबा, पिंपळगाव कोंझिरा ग्रामपंचायतमध्ये सोनाली कर्पे सरपंचपदी निवडून आले आहेत.

याशिवाय गुंजाळवाडी ग्रामपंचायतमध्ये सर्वच्या सर्व सतरा जागांवर, आश्वी बुद्रुक ग्रामपंचायतमध्ये दहा जागांवर, पिंपळगाव कोंझिरा ग्रामपंचायतमध्ये नऊ जागांवर काँग्रेस प्रणित उमेदवार निवडून आले आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,743
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

आमदार अमोल खताळ यांच्या सूचनेनंतर लोहारे-कासारे पाझर तलावातून पाण्याचा विसर्ग सुरू

30/08/2026

संगमनेर पालिकेचा अनोखा उपक्रम! १ ते २५ सप्टेंबरदरम्यान होणार प्रभागनिहाय बैठका; नगराध्यक्ष डॉ. मैथिली तांबे यांच्या पुढाकाराने नागरिकांच्या प्रश्नांना थेट व्यासपीठ

29/08/2026

संगमनेरकरांच्या अभिप्रेत असलेलेच छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य-दिव्य स्मारक उभारणार! “दीड वर्षे खाती हातात असूनही वाढीव जागेचा प्रश्न सोडवला नाही; आता स्मारकाच्या कामात खोडा घालून संगमनेरकरांची दिशाभूल करू नका”

28/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
महाराष्ट्र संवाद विशेष

माहिती अधिकाराचे प्रणेते अण्णा हजारे यांची मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांनी घेतली सदिच्छा भेट; प्रकृतीची केली विचारपूस

By Annant Ppangarkar03/09/20260

Annant Ppangarkar मुंबई: माहिती अधिकाराचे प्रणेते आणि ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे हे सध्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे…

अहिल्यानगरमध्ये ४० नशेची इंजेक्शन्स जप्त; व्यायामपटूंकडून वापराचा संशय, तिघांना अटक

03/09/2026

अहिल्यानगर जिल्ह्यात अवैध गुटखा विक्रीवर स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; ५.३० लाखांचा मुद्देमाल जप्त, ११ जणांवर गुन्हे दाखल

03/09/2026

अवैध वाळू वाहतूक करणारा हायवा जप्त, २५.६० लाखांचा मुद्देमाल हस्तगत

03/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.