Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

आंदोलनाची हवा काढण्यासाठीच मुख्यमंत्र्यांची भेट? : अमोल शेलकर यांचा घणाघात, पालकमंत्री व लोकप्रतिनिधींवर संगमनेरच्या हक्काची रेल्वे हिरावल्याचा थेट आरोप; कागदपत्रे सार्वजनिक करण्याचे आव्हान

09/09/2026

गणेश विसर्जनासाठी प्रवरा नदीपात्रात तातडीने पाणी सोडण्यासंदर्भात नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

09/09/2026

संगमनेर शहरात गणेशोत्सवाची जोरदार तयारी: खड्डेमुक्त रस्ते आणि मंडळांच्या समस्या सोडवण्यावर नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे यांचा भर

09/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » दूधगंगा पतसंस्था स्कॅम… मुख्य आरोपी चेअरमन भाऊसाहेब कुटे अद्यापही सापडेना, मात्र कुटुंब पोहोचले ‘येथे’! काय होणार?
न्यायालय

दूधगंगा पतसंस्था स्कॅम… मुख्य आरोपी चेअरमन भाऊसाहेब कुटे अद्यापही सापडेना, मात्र कुटुंब पोहोचले ‘येथे’! काय होणार?

कदम यांच्या जामीन अर्जावर जिल्हा न्यायालयाचा निर्णय बाकी
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar09/11/2023No Comments3 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज

संगमनेर : दूधगंगा नागरी सहकारी पतसंस्था अपहार प्रकरणी गुन्हा दाखल होऊन तब्बल चार महिन्यांचा कालावधी उलटण्याच्या मार्गावर आहे. मात्र अद्यापही या अपहार प्रकरणातील मुख्य मुख्य आरोपी भाऊसाहेब कुटे कुठे दडून बसला याचा शोध लागत नसताना त्याचे कुटुंब मात्र अटकपूर्व जामीनासाठी हायकोर्टापर्यंत पोहोचले आहे.

भाऊसाहेब कुटे याच्यासह त्याच्या कुटुंबियांना संगमनेरच्या जिल्हा अतिरिक्त सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन नाकारल्यानंतर आता त्याचे कुटुंब औरंगाबाद हायकोर्टात अटकपूर्व जामीनासाठी पोहोचले आहे. गेल्या आठवड्यात शकुंतला भाऊसाहेब कुटे, विमल भाऊसाहेब कुटे, संदीप भाऊसाहेब कुटे, दादासाहेब भाऊसाहेब कुटे, अमोल भाऊसाहेब कुटे व सोनाली दादासाहेब कुटे यांचा यात समावेश आहे. यांच्या जामीन अर्जावर काय निर्णय होतो यानंतर मुख्य आरोपी आपल्या जामीन अर्जाबाबत निर्णय घेण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

दूधगंगा नागरी सहकारी पतसंस्थेतील सुमारे 81 कोटी रुपयांच्या अपहार प्रकरणी जिल्हा विशेष लेखापरीक्षक राजेंद्र निकम यांच्या फिर्यादीवरून संगमनेर शहर पोलीस ठाण्यात तब्बल 21 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात 17 जणांचा मुख्य आरोपींमध्ये समावेश असून सहा जणांनी त्यांना सहाय्य केले असल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.

सतरा मुख्य आरोपींमध्ये पतसंस्थेचा चेअरमन भाऊसाहेब दामोदर कुटे याच्यासह व्यवस्थापक भाऊसाहेब विठ्ठल गुंजाळ, चीफ अकाउंटंट भाऊसाहेब संतू गायकवाड, चेतन नागराज बाबा कपाटे उर्फ सुदर्शन महाराज (छत्रपती संभाजीनगर) यांच्यासह दादासाहेब भाऊसाहेब कुटे, संदीप भाऊसाहेब कुटे, अमोल भाऊसाहेब कुटे, विमल भाऊसाहेब कुटे, शकुंतला भाऊसाहेब कुटे, अमोल कृषी सेवा केंद्र प्रोप्रायटर सोनाली दादासाहेब कुटे, अमोल ट्रेडिंग कंपनी प्रोप्रायटर दादासाहेब भाऊसाहेब कुटे, श्री डेव्हलपर्स संदीप भाऊसाहेब कुटे (सर्व संगमनेर), यांच्यासह कृष्णराव श्रीपतराव कदम, श्रीमती प्रमिला कृष्णराव कदम, अजित कृष्णराव कदम, सुजित कृष्णराव कदम (सर्व रा. देवळाली प्रवरा, ता. राहुरी) व संदीप दगडू जरे (रा. अहमदनगर) यांचा प्रमुख 17 आरोपींमध्ये समावेश आहे.

तर लहानु गणपत कुटे, उत्तम शंकर लांडगे, उल्हास रावसाहेब थोरात, सोमनाथ कारभारी सातपुते, अरुण के. बुरड सनदी लेखापाल (नाशिक) अमोल क्षीरसागर सनदी लेखापाल (नाशिक) यांच्यावर वरील आरोपींना सहाय्य केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.

या गुन्ह्याचा तपास नगरच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला असून तपास वर्ग होण्यापूर्वी संगमनेर शहर पोलिसांनी मुख्य आरोपींपैकी व्यवस्थापक भाऊसाहेब विठ्ठल गुंजाळ याच्यासह सहाय्य करणाऱ्या चार आरोपींना अटक केली होती. तर कॅशियर उत्तम लांडगे हा आर्थिक गुन्हे शाखेसमोर हजर झाला होता. मुख्य आरोपी भाऊसाहेब कुटेसह त्याच्या कुटुंबीयांचा जामीन अर्ज जिल्हा व सत्र न्यायालयाने फेटाळला असून अन्य काही आरोपींचा जामीन मंजूर केला आहे.

अटकपूर्व जामीन मिळविण्यासाठी आरोपी भाऊसाहेब कुटेसह त्याचे कुटुंबीय औरंगाबाद हायकोर्टात जाण्याची चिन्हे होती. मात्र कुटे याच्या कुटुंबीयांनी अटकपूर्व जामीन मिळविण्यासाठी औरंगाबाद हायकोर्टात जामीन अर्ज दाखल केला आहे. न्यायमूर्ती आर. एम. जोशी यांच्यासमोर या अर्जाचे सुनावणी होत आहे. तर कुटे याचा अर्ज अद्यापही न्यायालयात दाखल झाला नसल्याचे दिसते.

दरम्यान संगमनेरच्या जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयात कृष्णराव श्रीपतराव कदम व श्रीमती प्रमिला कृष्णराव कदम यांनी अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला असून या अर्जावर अद्याप निर्णय बाकी आहे. तर हायकोर्टात कुटे कुटुंबीयांच्या जामीन अर्जासंदर्भात कुटुंबीयांनी कर्ज भरले असल्याचे न्यायालयाला सांगितले. त्यामुळे याची पडताळणी केल्यानंतर यावर न्यायालयाचा निर्णय समोर येणार आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,905
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

फायनान्सचा चेक बाऊन्स: अकोले तालुक्यातील कर्जदाराला ६ महिने कारावास आणि दुप्पट दंडाची शिक्षा

04/09/2026

संगमनेर सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल: प्राणघातक हल्ल्याप्रकरणी तिघा आरोपींची २ वर्षांची सक्तमजुरी कायम

02/09/2026

दारूच्या नशेत झालेल्या वादातून मारहाण करून हत्या करणाऱ्या आरोपीस जन्मठेप; संगमनेर न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

01/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

आंदोलनाची हवा काढण्यासाठीच मुख्यमंत्र्यांची भेट? : अमोल शेलकर यांचा घणाघात, पालकमंत्री व लोकप्रतिनिधींवर संगमनेरच्या हक्काची रेल्वे हिरावल्याचा थेट आरोप; कागदपत्रे सार्वजनिक करण्याचे आव्हान

By Annant Ppangarkar09/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – संगमनेर मार्गे जाणारा पुणे–नाशिक सेमीस्पीड रेल्वे प्रकल्प GMRT…

गणेश विसर्जनासाठी प्रवरा नदीपात्रात तातडीने पाणी सोडण्यासंदर्भात नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

09/09/2026

संगमनेर शहरात गणेशोत्सवाची जोरदार तयारी: खड्डेमुक्त रस्ते आणि मंडळांच्या समस्या सोडवण्यावर नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे यांचा भर

09/09/2026

सोशल मीडिया रिल्सच्या प्रभावापासून दूर राहून तरुणांनी ‘गुंतवणूक भान’ जपावे : सुनील कडलग

09/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.