Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

आंदोलनाची हवा काढण्यासाठीच मुख्यमंत्र्यांची भेट? : अमोल शेलकर यांचा घणाघात, पालकमंत्री व लोकप्रतिनिधींवर संगमनेरच्या हक्काची रेल्वे हिरावल्याचा थेट आरोप; कागदपत्रे सार्वजनिक करण्याचे आव्हान

09/09/2026

गणेश विसर्जनासाठी प्रवरा नदीपात्रात तातडीने पाणी सोडण्यासंदर्भात नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

09/09/2026

संगमनेर शहरात गणेशोत्सवाची जोरदार तयारी: खड्डेमुक्त रस्ते आणि मंडळांच्या समस्या सोडवण्यावर नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे यांचा भर

09/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » २०१० सालचा राज ठाकरेंवरील तडीपारीचा गुन्हा मुंबई उच्च न्यायालयाने केला रद्द! १५ ऑक्टोंबरला खंडपीठाने निकाल ठेवला होता राखून
न्यायालय

२०१० सालचा राज ठाकरेंवरील तडीपारीचा गुन्हा मुंबई उच्च न्यायालयाने केला रद्द! १५ ऑक्टोंबरला खंडपीठाने निकाल ठेवला होता राखून

Annant PpangarkarBy Annant Ppangarkar11/11/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज

मुंबई – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावरील तडीपारीचा गुन्हा मुंबई उच्च न्यायालयाकडून रद्द करण्यात आला आहे. यामुळे ऐन दीपावलीत ठाकरे यांना दिलासा मिळाला.

कल्याण पोलिसांनी २०१० साधी बजावलेल्या तडीपारीच्या नोटीसवर ठाकरे यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. राज ठाकरे यांनी आपल्यावरील गुन्हे रद्द करण्यासाठी आणि त्याबाबतची न्यायालयात सुरू असलेली कारवाई रद्द करण्यासाठी दाखल केलेल्या याचिकेवर यापूर्वी सुनावणी झाली.

ठाकरे यांच्या याचिकेवरील कामकाज पूर्ण झाल्यानंतर १५ ऑक्टोबर रोजी न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती शर्मिला देशमुख यांच्या खंडपीठाने यासंबंधीचा निकाल राखून ठेवला होता. त्यानंतर शुक्रवारी (१० नोव्हेंबर) या संबंधीचा निकाल न्यायालयाने देत ठाकरे यांच्यावरील गुन्हा रद्द केला आहे.

काय आहे प्रकरण?

२०१० साली कल्याण-डोंबिवली महानगरपालिका निवडणुकी दरम्यानचे हे प्रकरण आहे. राज ठाकरे यांना कल्याण डोंबिवली महानगर पालिकेच्या हद्दीत तडीपारीची नोटीस बजावण्यात आली होती. राज ठाकरे यांनी ती नोटीस स्वीकारली नसल्यामुळे त्यांच्या कार्यालयावर ही नोटीस लावण्यात आली होती. ठाकरे यांनी पक्षाचे कार्यालय, निवासस्थान, हॉटेल, लॉज आणि गेस्ट हाऊसला भेट देऊ नये, असे त्या तडीपारीच्या नोटिशीत म्हटले होते. तसेच आदेशाचे उल्लंघन केल्यास लोकप्रतिनिधी कायद्याच्या कलम १२६ नुसार खटला दाखल करण्याचे नमूद करण्यात आले होते. 

तरीही, ठाकरे यांनी कल्याणमध्ये जाऊन तडीपारीच्या आदेशाचे उल्लंघन केल्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी २०११ मध्ये कल्याण येथील न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. त्यानंतर ठाकरे यांना न्यायालयात हजर राहण्यास न्यायदंडाधिकार्‍यांकडून सांगण्यात आले होते. न्यायालयात हजर होत ठाकरे यांनी जामीन मिळवला होता. 

त्यानंतर त्यांनी हा गुन्हा रद्द करण्यासाठी २०१४ मध्ये मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. त्यानंतर उच्च न्यायालयाने दंडाधिकारी न्यायालयाच्या कारवाईला स्थगिती दिली होती. ठाकरे यांच्या वतीने सयाजी नांगरे यांनी काम बघितले. न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती शर्मिला देशमुख यांच्या खंडपीठासमोर या खटल्याचा सुनावणी झाली. 

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 444
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

फायनान्सचा चेक बाऊन्स: अकोले तालुक्यातील कर्जदाराला ६ महिने कारावास आणि दुप्पट दंडाची शिक्षा

04/09/2026

संगमनेर सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल: प्राणघातक हल्ल्याप्रकरणी तिघा आरोपींची २ वर्षांची सक्तमजुरी कायम

02/09/2026

दारूच्या नशेत झालेल्या वादातून मारहाण करून हत्या करणाऱ्या आरोपीस जन्मठेप; संगमनेर न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

01/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

आंदोलनाची हवा काढण्यासाठीच मुख्यमंत्र्यांची भेट? : अमोल शेलकर यांचा घणाघात, पालकमंत्री व लोकप्रतिनिधींवर संगमनेरच्या हक्काची रेल्वे हिरावल्याचा थेट आरोप; कागदपत्रे सार्वजनिक करण्याचे आव्हान

By Annant Ppangarkar09/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – संगमनेर मार्गे जाणारा पुणे–नाशिक सेमीस्पीड रेल्वे प्रकल्प GMRT…

गणेश विसर्जनासाठी प्रवरा नदीपात्रात तातडीने पाणी सोडण्यासंदर्भात नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

09/09/2026

संगमनेर शहरात गणेशोत्सवाची जोरदार तयारी: खड्डेमुक्त रस्ते आणि मंडळांच्या समस्या सोडवण्यावर नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे यांचा भर

09/09/2026

सोशल मीडिया रिल्सच्या प्रभावापासून दूर राहून तरुणांनी ‘गुंतवणूक भान’ जपावे : सुनील कडलग

09/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.