Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

पोलिसाच्या शेतातील बाजरीच्या कणसांवर जादूटोणा; संगमनेर तालुक्यात एकावर गुन्हा दाखल

03/10/2026

आज शनिवार ३ ऑक्टोबर — तुमचा आजचा दिवस कसा असेल जाणून घेऊया

03/10/2026

पुस्तकापुरते मर्यादित न राहता ऑडिओ आणि रील्सच्या माध्यमातून विचार पोहोचवा : बाळासाहेब थोरात

02/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » अहमदनगर जिल्ह्यात आढळल्या कुणबीच्या ८५ हजार नोंदी; ४६ लाख कागदपत्रांची झाली तपासणी
प्रशासन

अहमदनगर जिल्ह्यात आढळल्या कुणबीच्या ८५ हजार नोंदी; ४६ लाख कागदपत्रांची झाली तपासणी

Annant PpangarkarBy Annant Ppangarkar11/11/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज

अहमदनगर – मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडविण्यासाठी सरकारने प्रयत्न सुरू केले असून आरक्षणासंदर्भात न्यायमूर्ती शिंदे आयोगाने दिलेल्या सूचनेनंतर जिल्हा प्रशासनाकडून विविध विभागांकडे उपलब्ध असलेल्या कागदपत्रांमध्ये कुणबी नोंदींची तपासणी सुरू झाली आहे. आत्तापर्यंत ४६ लाख कागदपत्रांची तपासणी करण्यात आली असून त्यामध्ये ८५ हजार नोंदी सापडल्या.

मराठा समाजाच्या आरक्षण मागणीच्या आंदोलनानंतर कुणबी जातीच्या शोधासाठी जिल्हा पातळीवर जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्या नेतृत्वाखाली व अतिरिक्त जिल्हाधिकारी सुहास मापारी यांच्या नियंत्रणाखाली विविध विभागांच्या प्रमुखांचा समावेश असलेला कक्ष स्थापन करण्यात आला आहे. या कक्षाचे उपजिल्हाधिकारी अतुल चोरमारे यांनी ही माहिती दिली.

तपासणी करण्यात आलेल्या कागदपत्रात १९६७ पूर्वीच्या कुणबी नोंदी आढळून आल्या आहे. सर्वात जुनी १८१५ मधील मोडी लिपीतील नोंद नगर शहराजवळील बायजाबाई जेऊर (ता. नगर) येथील शाळेत आढळून आली. अद्यापही जिल्ह्यात सर्वत्र कागदपत्रांची तपासणी सुरू आहे. या कागदपत्रांच्या आधारे कुणबी नोंदींचा शोध घेतला जात आहे.

महसूल विभागाकडे असलेल्या कागदपत्रांसोबतच शालेय शिक्षण, महापालिका, नगरपालिका, ग्रामपंचायतीसह अन्य विभागातील कागदपत्रांची पडताळणी केली जात आहे. जन्म-मृत्यूच्या नोंदी, जमीन खरेदी-विक्रीचे दस्तऐवज, शाळामधील कागदपत्रे आदी कागदपत्रांमध्ये या नोंदी आढळून येत आहेत. याशिवाय इतरही विविध विभागांकडून तपासणी सुरू आहे.

महसूल विभागाच्या गावनमुना १४ मध्ये प्रामुख्याने या नोंदी आढळून येत आहेत. नगर शहराजवळील बायजाबाई जेऊर येथे जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा आहे. ही शाळा ब्रिटिशकालापासून अस्तित्वात आहे. त्याकाळी ती कॉलंट्री शाळा म्हणून ओळखली जात असे. या शाळेच्या दप्तरात जनरल रजिस्टरमध्ये कुणबी जातीची नोंद आढळून आली आहे.

जनरल रजिस्टरमध्ये शाळेत विद्यार्थी प्रवेश घेताना त्याची जात, जन्मतारीख व आई-वडिलांचे नाव आदी नोंदी केल्या जात. त्यामध्ये मोडी भाषेत ‘कुणबी’ नोंद आढळून आल्याची माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात आली.

विविध विभागांच्या तपासणीत आवळलेल्या नोंदी जिल्हा कक्षाकडे पाठविल्या जात असून जिल्हा कक्षाकडून त्याचे स्कॅनिंग करून प्रमाणीकरण केले जाणार आहे. त्यानंतर त्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केल्या जातील.

उपविभागीय अधिकारी कुणबी प्रमाणपत्राचे वितरण करत असतात. गत पाच वर्षात एक लाखाहून अधिक प्रमाणपत्रे वितरित केल्याचा अंदाज महसूल विभागाने व्यक्त केला असून याव्यतिरिक्त याव्यतिरिक्त जिल्हा जात पडताळणी समितीकडून नोव्हेंबर २०१६ ते आक्टोंबर २०२३ अखेर ५२,६७७ कुणबी दाखले वैध ठरविले गेले असल्याची माहिती विभागाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 947
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

५० लाखांची कथित खंडणी अन् प्रशासकीय अनागोंदी: मुख्याधिकारी सक्तीच्या रजेवर, जिल्हाधिकाऱ्यांची कठोर कारवाई; नायब तहसीलदार मोहसीन शेख यांच्याकडे अतिरिक्त पदभार

24/09/2026

अन्न व औषध प्रशासनाची संगमनेरमध्ये कारवाई: २.६० लाखांचे संशयास्पद ‘काऊ घी’ जप्त, तर भेसळप्रकरणी दुग्ध केंद्राचा परवाना निलंबित

22/09/2026

अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; सुमारे चार कोटी रुपयांचे संशयास्पद बटर जप्त

11/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

पोलिसाच्या शेतातील बाजरीच्या कणसांवर जादूटोणा; संगमनेर तालुक्यात एकावर गुन्हा दाखल

By Annant Ppangarkar03/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर तालुक्यातील शेळकेवाडी येथे मुंबई पोलिसाच्या शेतात वाळत घातलेल्या बाजरीच्या कणसांवर…

आज शनिवार ३ ऑक्टोबर — तुमचा आजचा दिवस कसा असेल जाणून घेऊया

03/10/2026

पुस्तकापुरते मर्यादित न राहता ऑडिओ आणि रील्सच्या माध्यमातून विचार पोहोचवा : बाळासाहेब थोरात

02/10/2026

संगमनेरात महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांची जयंती उत्साहात; १५७ बालगांधींच्या प्रभात फेरीने शहर दुमदुमले, गांधीजींच्या विचारांमुळे जगात भारताची मोठी ओळख: मा. आमदार डॉ. सुधीर तांबे

02/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.