Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

पोलिसाच्या शेतातील बाजरीच्या कणसांवर जादूटोणा; संगमनेर तालुक्यात एकावर गुन्हा दाखल

03/10/2026

आज शनिवार ३ ऑक्टोबर — तुमचा आजचा दिवस कसा असेल जाणून घेऊया

03/10/2026

पुस्तकापुरते मर्यादित न राहता ऑडिओ आणि रील्सच्या माध्यमातून विचार पोहोचवा : बाळासाहेब थोरात

02/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » तुम्ही कारखाना व्यवस्थित चालवला असता तर ऊस इतरत्र गेलाच नसता; थोरात कोल्हेंवर टीका करून तुमचे पाप झाकता येणार नाही : गणेशचे उपाध्यक्ष विजयराव दंडवते यांचा हल्लाबोल
शेती व सहकार

तुम्ही कारखाना व्यवस्थित चालवला असता तर ऊस इतरत्र गेलाच नसता; थोरात कोल्हेंवर टीका करून तुमचे पाप झाकता येणार नाही : गणेशचे उपाध्यक्ष विजयराव दंडवते यांचा हल्लाबोल

Annant PpangarkarBy Annant Ppangarkar21/11/2023No Comments3 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

तेव्हा तोडणीसाठी जादा पैसे, उसालाही कमी भाव; आता नुकसान भरपाई देणार का?

महाराष्ट्र संवाद न्यूज 

राहाता : गणेश अडचणीत आला होता की प्रवरेच्या नेतृत्वाने जाणीवपूर्वक अडचणीत आणला होता, हे राहाता तालुक्याला पक्के माहित आहे. दडपशाही करून आणि जेलचा धाक दाखवून तुम्ही कारखाना चालवायला घेतला होता. कारखाना चांगला चालवणे तुमची जबाबदारी होती. गणेशवर सूड उगवण्याच्या नादात प्रवरेच्या नेतृत्वाने गणेश परिसराच्या अन्नात माती कालवली, त्याची नुकसान भरपाई तुम्ही आता करणार का? असा सवाल गणेश चे उपाध्यक्ष विजयराव दंडवते यांनी उपस्थित केला.

प्रसिद्धी पत्रकात दंडवते म्हणाले, प्रवरा साखर कारखान्याने गणेश कारखाना कराराने चालवण्यासाठी घेतलेला होता, त्यामुळे गुंतवणूक करून कारखाना व्यवस्थित चालवणे ही त्यांची जबादारी होती. ऊस असतानाही तुम्हाला तो व्यवस्थित चालवता आला नाही, हे चालवायला घेतलेल्या नेत्यांचे अपयश आहे. प्रवरा कारखाना गणेशचा ऊस पळवून नेत होते, तोडणीसाठी अतिरिक्त पैसे द्यावे लागायचे, उसाला भावही कमी मिळत होता, उसाचे पेमेंट कधी मिळेल याची खात्री नव्हती.

गणेश परिसरातील ऊस प्रवरेत गाळला, त्याची रिकव्हरी कमी दाखवली. टनाला 200 ते 300 रुपये कमी भाव दिला. शेतकरी आणि कामगारांची देणी थकवली. कष्टाने पिकवलेल्या उसाला वेळेवर तोड मिळाली नाही, शेतकऱ्यांना एकरी दहा ते पंधरा हजार रुपये ऊस तोडणी कामगारांना अतिरिक्त द्यावे लागत होते, अनेक शेतकरी बांधवांना ऊस शेतात जाळावा लागला, ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी संचालक मंडळाला संपर्क केला तर ते सांगायचे आम्हाला काहीही माहित नाही. आमच्या हातात काहीच नाही. अशी सर्व परिस्थिती असताना आर्थिक व मानसिक नुकसान टाळण्यासाठी ऊस उत्पादक शेतकरी शेजारील कारखान्यांना संपर्क करून त्यांचा ऊस नेण्यासाठी विंनती करीत होते.

शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी शेजारील कारखान्यांनीही ऊसाला उचित दर देऊन शेतकऱ्यांचा उस नेला यात चुकीचं काय आहे? आपला गणेश यांनी व्यवस्थित चालवला असता तर शेतकऱ्यांनी कशाला दुसरीकडे ऊस दिला असता? हे प्रवरा कारखान्याचे, व्यवस्थापन मंडळाचे व त्यांच्या नेत्यांचे अपयश होते. उगाच आपल्या अपयशाच इतरांवर खापर फोडू नये.

इतर कारखाने व्यवस्थित चालू होते, ऊस उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्यावर विश्वास होता, भाव ज्यादा होता, ऊस तोड वेळेत होती त्यामुळे त्यांनी त्याकाळात ऊस दिला. शेतकऱ्यांनी ऊस फक्त संगमनेर व संजीवनीलाच दिला नव्हता. कोळपेवाडी, अशोक व प्रवरेनेही ऊस नेलेला आहे. गणेश चालवायला घेणाऱ्यांनी मागील आठ वर्षे इतर कारखान्यापेक्षा टनामागे 200-300 कमी दिले ते शेतकऱ्यांना देणार का? गणेश व्यवस्थित चालत नसल्याने व ऊस तोड वेळेत न आल्याने काही शेतकऱ्यांच्या उसाच्या खोडक्या झाल्या, काहींनी आपला ऊस पेटवून दिला त्यांना नुकसान भरपाई देणार का? याचा अर्थ तुम्ही त्या काळात नीट कारभार केला नाही. तुम्ही शेतकऱ्यांची काळजी घेतली असती, गणेश परिसराच्या उसाला योग्य भाव दिला असता तर आज गणेश परिसराचे नंदनवन झाले असते.

आज गणेश कारखाना चालवत असताना अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून प्रवरेच्या प्रशासन आणि कारभाराची सच्चाई समोर आलेली आहे. प्रवरा कारखान्यातून जो अधिकारी वर्ग गणेश कारखान्यात आणून बसवला होता त्याने कधीच गणेशच्या हिताचा विचार केला नाही. शासकीय लेखा परीक्षण अहवालामध्ये तुमच्या आठ वर्षांच्या कारभाराचे अक्षरशः वाभाडे काढण्यात आलेले आहेत. अजूनही प्रवरेचे नेतृत्व पराभवाच्या धक्क्यातून सावरलेले नाही, गणेश कारखान्याच्या खोडी काढण्याचे उद्योग सतत सुरू आहेत. गणेश कारखान्यावर अवलंबून असणाऱ्या शेतकरी, सभासद आणि कामगारांच्या प्रपंचाला हातभार लावायचे सोडून ही नतदृष्ट मंडळी गणेश कारखान्यात राजकारण आणू पाहत आहे, जनतेला सभासदांना सर्व माहीत आहे, योग्य वेळ आल्यावर जनता तुमचा आणखी कठोर बंदोबस्त करेल, असा इशारा दंडवते यांनी दिला.

प्रवरेच्या नेत्यांनीच गणेश लुटला!

गणेश कारखान्याच्या तत्कालीन संचालक मंडळाच्या तोंडून प्रवरेचे नेतृत्व आपले पाप झाकण्याचे प्रयत्न करत आहेत, त्यातील अनेक संचालक खाजगीत प्रवरेच्या नेत्यांनी दिलेली वागणूक आम्हाला सांगतात, प्रवरेच्या नेत्यांनी गणेशची लूट केली हे देखील मान्य करतात, असेही दंडवते म्हणाले.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 838
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

सोशल मीडियावर खोटे पसरवणाऱ्यांचा बंदोबस्त करा: माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचा इशारा; संगमनेरची आर्थिक समृद्धी टिकवण्यासाठी संघर्षाचे आवाहन

21/09/2026

राज्यात सरसकट दुष्काळ जाहीर करा; माजी कृषिमंत्री बाळासाहेब थोरात यांची मागणी, रेल्वेप्रश्नी लोकप्रतिनिधीच्या बालिश वक्तव्यावरही केले भाष्य

19/09/2026

थोरात कारखान्याचे ११ लाख मेट्रिक टनाचे गाळप उद्दिष्ट; बॉयलर अग्नीप्रदीपन समारंभात बाळासाहेब थोरात यांचे आवाहन

19/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

पोलिसाच्या शेतातील बाजरीच्या कणसांवर जादूटोणा; संगमनेर तालुक्यात एकावर गुन्हा दाखल

By Annant Ppangarkar03/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर तालुक्यातील शेळकेवाडी येथे मुंबई पोलिसाच्या शेतात वाळत घातलेल्या बाजरीच्या कणसांवर…

आज शनिवार ३ ऑक्टोबर — तुमचा आजचा दिवस कसा असेल जाणून घेऊया

03/10/2026

पुस्तकापुरते मर्यादित न राहता ऑडिओ आणि रील्सच्या माध्यमातून विचार पोहोचवा : बाळासाहेब थोरात

02/10/2026

संगमनेरात महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांची जयंती उत्साहात; १५७ बालगांधींच्या प्रभात फेरीने शहर दुमदुमले, गांधीजींच्या विचारांमुळे जगात भारताची मोठी ओळख: मा. आमदार डॉ. सुधीर तांबे

02/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.