Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

पोलिसाच्या शेतातील बाजरीच्या कणसांवर जादूटोणा; संगमनेर तालुक्यात एकावर गुन्हा दाखल

03/10/2026

आज शनिवार ३ ऑक्टोबर — तुमचा आजचा दिवस कसा असेल जाणून घेऊया

03/10/2026

पुस्तकापुरते मर्यादित न राहता ऑडिओ आणि रील्सच्या माध्यमातून विचार पोहोचवा : बाळासाहेब थोरात

02/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » नदीपात्रातून शेडगावमध्ये अवैध वाळू उपसा! गावकऱ्यांकडून पर्दाफाश मंडळ अधिकारी, तलाठी यांच्या उपस्थितीत वाळू उपाशाचा पंचनामा
आंदोलन

नदीपात्रातून शेडगावमध्ये अवैध वाळू उपसा! गावकऱ्यांकडून पर्दाफाश मंडळ अधिकारी, तलाठी यांच्या उपस्थितीत वाळू उपाशाचा पंचनामा

Annant PpangarkarBy Annant Ppangarkar24/11/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज

संगमनेर:

अवैध वाळू तस्करी रोखण्यासाठी राज्याच्या महसूल मंत्र्यांनी नवे वाळू धोरण आणले असले तरी या वाळू धोरणाला सत्ताधारी पक्षाच्याच कार्यकर्त्यांकडून तिलांजली देण्याचे काम सुरू आहे. संगमनेर तालुक्यातील शेडगावमध्ये सत्ताधारी पक्षाच्या कार्यकर्त्याची वाळू तस्करी गावकऱ्यांनी समोर आणली आहे.

नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात अवैध गौण खनिज लूट सुरू आहे. या संदर्भात गावकऱ्यांनी एकत्रित येत ठेकेदार संदीप भाऊसाहेब घुगे (रा. मालुंजे) यांच्याविरुद्ध तक्रार केली असून या वाळू उत्खननाचा पंचनामादेखील करण्यात आला आहे.

मंडल अधिकारी व तलाठी यांच्या समक्ष वाळू उपशाचा पंचनामा केला आहे. यात २१ नोव्हेंबर २०२३ रोजी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास संदीप भाऊसाहेब घुगे यांनी गावातील लोकांना हाताशी धरून नदीपात्रातून बेकायदेशीररित्या स्वतःच्या मालकीच्या जेसीबी व डंपरच्या माध्यमातून अंदाजे दीडशे ते दोनशे डंपर वाळू उपसा केला.

यामुळे नदीपात्रात आठ मोठाले खड्डे पडले असून त्यापैकी पाच खड्डे बुजविले गेले आहेत. झालेल्या या अवैध वाळू उत्खननावर कोणाचेही नियंत्रण नाही. रात्रीच्या वेळेस व दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये हा वाळू उपसा झाला असल्याचे म्हटले आहे.

पंचनाम्यावेळी शेडगाव येथील तलाठी मंडळ अधिकारी यांच्याबरोबर सरपंच राजेंद्र चंद्रभान बर्डे, दत्तात्रय नागरे, राजेंद्र सोनवणे, नारायण दादा नागरे, शितल उगलमुगले, जनजीवन उगलमुगले, दिलीप सांगळे, कैलास आंधळे, राजेंद्र आंधळे आदींसह विविध नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

वाळू उत्खनन सत्ताधारी मंत्र्यांच्या आशीर्वादाने धाक दाखवून लोकांना दमदाटी करून मोठ्या प्रमाणात वाळू तस्करीच्या माध्यमातून पैसे कमविले जात वाळू तस्करी आणि दमदाटीची परिसरात भीती असल्याचे गावकऱ्यांनी म्हटले असून उपोषणाचा इशारा देण्यात आला आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 877
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

प्रशासनाच्या नाकर्तेपणाविरोधात संगमनेर पेटले! संतप्त शेतकरी प्रांताधिकारी कार्यालयात घुसले आमदारांचे फ्लेक्स लावायला तुम्ही त्यांचे गुलाम आहात का? – माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचा थेट सवाल यशवंतराव चव्हाण प्रशासकीय भवनाच्या पायऱ्यांवर ठिय्या आंदोलन; अखेर प्रांताधिकारी अरुण उंडे नमले, निवेदन स्वीकारले

22/09/2026

विजेचा खेळखंडोबा अन् पाणी पळवण्याचा डाव; संगमनेरमध्ये उद्या महाआक्रोश मोर्चा!

21/09/2026

वीज प्रश्नावर संगमनेर काँग्रेसचा ‘जनआक्रोश मोर्चा’; बाळासाहेब थोरातांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात जोरदार तयारी

19/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

पोलिसाच्या शेतातील बाजरीच्या कणसांवर जादूटोणा; संगमनेर तालुक्यात एकावर गुन्हा दाखल

By Annant Ppangarkar03/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर तालुक्यातील शेळकेवाडी येथे मुंबई पोलिसाच्या शेतात वाळत घातलेल्या बाजरीच्या कणसांवर…

आज शनिवार ३ ऑक्टोबर — तुमचा आजचा दिवस कसा असेल जाणून घेऊया

03/10/2026

पुस्तकापुरते मर्यादित न राहता ऑडिओ आणि रील्सच्या माध्यमातून विचार पोहोचवा : बाळासाहेब थोरात

02/10/2026

संगमनेरात महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांची जयंती उत्साहात; १५७ बालगांधींच्या प्रभात फेरीने शहर दुमदुमले, गांधीजींच्या विचारांमुळे जगात भारताची मोठी ओळख: मा. आमदार डॉ. सुधीर तांबे

02/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.