Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

पोलिसाच्या शेतातील बाजरीच्या कणसांवर जादूटोणा; संगमनेर तालुक्यात एकावर गुन्हा दाखल

03/10/2026

आज शनिवार ३ ऑक्टोबर — तुमचा आजचा दिवस कसा असेल जाणून घेऊया

03/10/2026

पुस्तकापुरते मर्यादित न राहता ऑडिओ आणि रील्सच्या माध्यमातून विचार पोहोचवा : बाळासाहेब थोरात

02/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » मुंबईच्या मराठा मंदिर साहित्य शाखेचा पुरस्कार संदीप वाकचौरे यांच्या ‘सृजनाची वाट’ला!
शिक्षण

मुंबईच्या मराठा मंदिर साहित्य शाखेचा पुरस्कार संदीप वाकचौरे यांच्या ‘सृजनाची वाट’ला!

मुंबईत शनिवारी पुरस्कार वितरण समारंभ
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar28/11/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज

मुंबई येथील मराठा मंदिर साहित्य शाखेच्यावतीने देण्यात येणाऱ्या साहित्य पारितोषिक 2022 ची घोषणा करण्यात आली आहे. वैचारिक साहित्य प्रकारांमध्ये संगमनेरमधील लेखक संदीप वाकचौरे यांच्या ‘सृजनाची वाट’ या पुस्तकाला पारितोषिक जाहीर करण्यात आल्याची माहिती शाखेचे कार्याध्यक्ष प्रदीप विचारे यांनी दिली.

वाकचौरे यांच्या सृजनाची वाट या पुस्तकाला वैचारिक साहित्य प्रकारातून द्वितीय क्रमांकाचे पारितोषक जाहीर करण्यात आले आहेत. सनय प्रकाशनाच्यावतीने प्रकाशित करण्यात आलेले ‘सृजनाची वाट’ हे शिक्षण विषयावरचे पुस्तक आहे. मराठा मंदिर साहित्य शाखेच्यावतीने कादंबरी, कथा, काव्य, प्रवास, समीक्षा, संशोधन, चरित्र, बाल वांड:मय, ललित वांड:मय, वैचारिक साहित्य अशा विविध साहित्य प्रकारांमध्ये साहित्य पारितोषिकांची घोषणा करण्यात आली आहे.

वाकचौरे यांनी सृजनाची वाट,पाटी पेन्सिल, शिक्षणाचे पसायदान, शिक्षणाचे दिवास्वप्न, ऐसपैस शिक्षण, शिक्षण दशा आणि दिशा, शिक्षणवेध आदी पुस्तकांचे लेखन केले आहे. चपराक प्रकाशाच्यावतीने विनोबांची शिक्षण छाया, परिवर्तनाची वाट ही पुस्तके लवकरच प्रकाशित करण्यात येणार आहे. वाकचौरे सातत्याने महाराष्ट्रातील विविध वृत्तपत्रांमध्ये शिक्षण विषयक सदर व प्रासंगिक लेखन करत आहेत. शिक्षण विषयक स्तंभलेखक म्हणून त्यांना ओळखले जाते. सुजनाची वाट या पुस्तकाला डॉ. संजय मालपाणी यांची प्रस्तावना लाभली.

वाकचौरे यांचे सनय प्रकाशाचे शिवाजीराव शिंदे, डॉ. सुधीर तांबे, डॉ. संजय मालपाणी, चपराकचे घनश्याम पाटील, डॉ. सोमनाथ मुटकुळे, माजी शिक्षण संचालक दिनकर टेमकर, शिवाजीराव तांबे, डॉ. शकुंतला काळे, डॉ. दिनकर पाटील, परशराम पावसे, उमेश डोंगरे, शिक्षणाधिकारी भास्कर पाटील, गटविकास अधिकारी अनिल नागणे, गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब गुंड, विस्ताराधिकारी त्रिभुवन दीपक आदींनी अभिनंदन केले.

शनिवारी (9 डिसेंबर) मुंबईत मान्यवरांच्या उपस्थितीत पारितोषिक वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू, जेष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. नरेंद्र जाधव यांना देखील सन्मानित करण्यात येणार असून त्यांचे ‘मी, मराठी साहित्य व भारतीय अर्थव्यवस्था’ या विषयावरती व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. 

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 983
Puraskar Sandeep Wakchaure
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

नियमांचे उल्लंघन; राजापूर जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापकांवर कारवाई होणार का? पालकांचा सवाल

17/09/2026

संगमनेर तालुक्यातील तीन जिल्हा परिषद शाळांसाठी ६२ लाखांचा निधी मंजूर; नवीन वर्गखोल्यांचे होणार बांधकाम

12/09/2026

मुलींचे शिक्षण ही समाजाची ताकद; पालिका शाळेच्या विकासासाठी शिवसेना कटिबद्ध – नगरसेविका साक्षी सूर्यवंशी

12/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

पोलिसाच्या शेतातील बाजरीच्या कणसांवर जादूटोणा; संगमनेर तालुक्यात एकावर गुन्हा दाखल

By Annant Ppangarkar03/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर तालुक्यातील शेळकेवाडी येथे मुंबई पोलिसाच्या शेतात वाळत घातलेल्या बाजरीच्या कणसांवर…

आज शनिवार ३ ऑक्टोबर — तुमचा आजचा दिवस कसा असेल जाणून घेऊया

03/10/2026

पुस्तकापुरते मर्यादित न राहता ऑडिओ आणि रील्सच्या माध्यमातून विचार पोहोचवा : बाळासाहेब थोरात

02/10/2026

संगमनेरात महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांची जयंती उत्साहात; १५७ बालगांधींच्या प्रभात फेरीने शहर दुमदुमले, गांधीजींच्या विचारांमुळे जगात भारताची मोठी ओळख: मा. आमदार डॉ. सुधीर तांबे

02/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.