Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

पोलिसाच्या शेतातील बाजरीच्या कणसांवर जादूटोणा; संगमनेर तालुक्यात एकावर गुन्हा दाखल

03/10/2026

आज शनिवार ३ ऑक्टोबर — तुमचा आजचा दिवस कसा असेल जाणून घेऊया

03/10/2026

पुस्तकापुरते मर्यादित न राहता ऑडिओ आणि रील्सच्या माध्यमातून विचार पोहोचवा : बाळासाहेब थोरात

02/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेरात बँक असोसिएशन आपल्या दारी; पार पडले इंटरनल ऑडिट विषयावर जिल्हास्तरीय चर्चासत्र!
शेती व सहकार

संगमनेरात बँक असोसिएशन आपल्या दारी; पार पडले इंटरनल ऑडिट विषयावर जिल्हास्तरीय चर्चासत्र!

सहकारी व नागरी बँका ठरल्या मध्यमवर्गीयांचा आर्थिक आधार: माजी आमदार डॉ. सुधीर तांबे
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar02/12/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

अमृतवाहिनी सहकारी बँकेची ऑनलाइन प्रणाली कौतुकास्पद

महाराष्ट्र संवाद न्यूज

बँकिंग हा विषय आज प्रत्येकाच्या जीवनात महत्त्वाचा झाला आहे. ग्रामीण भागातील नागरी व सहकारी बँकांनी सर्वसामान्य माणसाला मोठा आर्थिक आधार दिला. आता बदलत्या काळात नवीन तंत्रज्ञान आणि ऑनलाईन प्रणालीचा वापर अनिवार्य ठरला असून या क्षेत्रात अमृतवाहिनी सहकारी बँकेने केलेले काम कौतुकास्पद ठरल्याचे प्रतिपादन नाशिक पदवीधर मतदार संघाचे माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी केले.

अहमदनगर जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशन आणि सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात अमृतवाहिनी सहकारी बँकेच्यावतीने संगमनेरमध्ये ‘असोसिएशन आपल्या दारी’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी डॉ. तांबे बोलत होते. प्रशिक्षक लेखापरीक्षक अक्षय भाटे, उद्योजक राजेश मालपाणी, असोसिएशनचे अध्यक्ष गिरीश घैसास, अमृतवाहिनी बँकेचे अध्यक्ष सुधाकर जोशी आदींसह जिल्ह्यातून आलेले सहकारी बँकांचे अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक उपस्थित होते.

तांबे म्हणाले, ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या आदर्श तत्वांवर संगमनेरचा सहकार कामकाज करत आहे. काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेरचा ‘सहकार पॅटर्न’ सहकारी संस्थांसाठी दिशादर्शक ठरला आहे. अमृतवाहिनी बँकेने सर्वसामान्यांना नेहमीच मदत केली असून या संस्थेत होत असलेला ऑनलाइन प्रणालीचा वापर कौतुकास्पद आहे.

रिझर्व्ह बँकेचे नियम दिवसेंदिवस कठीण होत चालले आहेत. या पार्श्वभूमीवर इंटरनल ऑडिट अत्यंत महत्त्वाचे ठरते. या अनुषंगाने घेतलेले चर्चासत्र सर्व बँकांसाठी नक्कीच उपयोगी ठरेल, असा विश्वास तांबे यांनी यावेळी व्यक्त केला.

प्रशिक्षक भाटे म्हणाले, बँकिंग हा विषय दिवसेंदिवस अवघड होत चालला आहे मात्र नवीन तंत्रज्ञानाच्या सहाय्याने तो ग्राहकांना सोप्या भाषेत समजावून सांगणे गरजेचे आहे. बँकांच्या ऑडिट प्रमाणे प्रत्येक व्यक्तीने स्वतःच्या आर्थिक स्थितीचे ऑडिट केल्यास त्याच्या जीवनात समृद्धी निर्माण होईल.

राजेश मालपाणी गिरीश घैसास यांचीही यावेळी भाषणे झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुधाकर जोशी यांनी, अंबादास वाणी यांनी सूत्रसंचालन केले. श्रीकांत गिरी यांनी आभार मानले.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 572
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

सोशल मीडियावर खोटे पसरवणाऱ्यांचा बंदोबस्त करा: माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचा इशारा; संगमनेरची आर्थिक समृद्धी टिकवण्यासाठी संघर्षाचे आवाहन

21/09/2026

राज्यात सरसकट दुष्काळ जाहीर करा; माजी कृषिमंत्री बाळासाहेब थोरात यांची मागणी, रेल्वेप्रश्नी लोकप्रतिनिधीच्या बालिश वक्तव्यावरही केले भाष्य

19/09/2026

थोरात कारखान्याचे ११ लाख मेट्रिक टनाचे गाळप उद्दिष्ट; बॉयलर अग्नीप्रदीपन समारंभात बाळासाहेब थोरात यांचे आवाहन

19/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

पोलिसाच्या शेतातील बाजरीच्या कणसांवर जादूटोणा; संगमनेर तालुक्यात एकावर गुन्हा दाखल

By Annant Ppangarkar03/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर तालुक्यातील शेळकेवाडी येथे मुंबई पोलिसाच्या शेतात वाळत घातलेल्या बाजरीच्या कणसांवर…

आज शनिवार ३ ऑक्टोबर — तुमचा आजचा दिवस कसा असेल जाणून घेऊया

03/10/2026

पुस्तकापुरते मर्यादित न राहता ऑडिओ आणि रील्सच्या माध्यमातून विचार पोहोचवा : बाळासाहेब थोरात

02/10/2026

संगमनेरात महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांची जयंती उत्साहात; १५७ बालगांधींच्या प्रभात फेरीने शहर दुमदुमले, गांधीजींच्या विचारांमुळे जगात भारताची मोठी ओळख: मा. आमदार डॉ. सुधीर तांबे

02/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.