Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेरमधील भेसळखोरांना कोणाचे अभय? तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईनंतरही संगमनेरचे अन्न व औषध प्रशासन सुस्तच! शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपजिल्हाप्रमुख अमर कतारी यांचा प्रशासनाला सवाल; आंदोलनाचा इशारा

June 9, 2026

यशोधन कार्यालयात ‘एसटी स्मार्ट कार्ड’ सुविधेचा शुभारंभ; ज्येष्ठ नागरिक व महिलांना प्रवासात मिळणार मोठी सवलत

June 9, 2026

…अन् थेट कोर्टातच झाली घोषणाबाजी!संगमनेरमधील ‘त्या’ प्रकाराने खळबळ, २० ते २५ जणांवर गुन्हा दाखल

June 9, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर मालेगाव न्यायालयाने दिला हा निर्णय… संविधानाने मला चोराला चोर अन् … खासदार राऊत
न्यायालय

उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर मालेगाव न्यायालयाने दिला हा निर्णय… संविधानाने मला चोराला चोर अन् … खासदार राऊत

अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरDecember 2, 2023Updated:December 2, 2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज

मंत्री दादा भुसे यांनी दाखल केलेल्या मानहानी खटल्याच्या सुनावणी प्रकरणी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शिवसेना नेते संजय राऊत शनिवारी (२ डिसेंबर) मालेगाव न्यायालयात उपस्थित झाले. त्यांनी दाखल केलेल्या जामीन अर्जावर सुनावणी घेतल्यानंतर न्यायालयाने राऊत यांचा जामीन अर्ज मंजूर केला.

आता या खटल्याची सुनावणी ३ फेब्रुवारीला होणार आहे. गिरणा सहकारी साखर कारखाना प्रकरणी बदनामी केल्याच्या कारणावरून मंत्री दादा भुसे यांनी मालेगाव न्यायालयात खासदार संजय राऊत यांच्याविरुद्ध मानहानीचा दावा दाखल केला आहे.

भुसे यांनी दाखल केलेल्या या दहाव्याच्या सुनावणीत खासदार राऊत आत्तापर्यंत दोनदा न्यायालयात गैरहजर राहिले होते. त्यामुळे न्यायालयाने त्यांना वॉरंट काढले होते. राऊत शनिवारी न्यायालयात हजर झाल्यानंतर त्यांच्या जामीन अर्जावर सुनावणी झाली. या सुनावणी वेळी न्यायालयाच्या आवारात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आल्याने न्यायालयाला पोलीस छावणीचे स्वरूप आले होते.

संविधानाने मला चोराला चोर अन्…

सुनावणीनंतर खासदार राऊत यांनी संविधानाने मला चोराला चोर म्हणण्याचा अधिकार दिला असे सांगत माध्यमांशी बोलताना मंत्री दादा भुसे यांच्यावर हल्लाबोल केला. गिरणा सहकारी साखर कारखाना बचावच्या नावाखाली दादा भुसेनी शेतकऱ्यांकडून १७८ कोटी रुपये गोळा केले आहेत. हे पैसे शेतकऱ्यांच्या असून त्याच्या पावत्याही आहेत. या पैशाचा हिशोब मागितला तर आम्ही गुन्हेगार झालो का? असे राऊत म्हणाले.

संविधानाने भ्रष्टाचाराविरोधात लढण्याचा अधिकार दिला. संविधान, नियम मलाही माहिती आहेत. खटला दाखल केल्याने मी न्यायालयात आलो. आम्ही काय घाबरतो का? काहीजण नोटीस आल्यावर दुसऱ्या पक्षात पळून गेले. मालेगावचा लढवय्या योद्धा अद्वय हिरे तुरुंगात आहे. अद्वय हिरेच आमदार होतील. असा विश्वास व्यक्त करत जोपर्यंत हे जेलमध्ये आहे तोपर्यंत मी मालेगावमध्ये येणारच. सरकारी सुधाचा बळी म्हणून त्यांना जेलमध्ये टाकले आहे. आज पोलीस तुमच्या आहे उद्या ते आमचे असतील. चोराला चोर म्हटल्याबद्दल आमच्यावर खटला दाखल झाला तुम्ही २०२४ पर्यंत थांबा असे सांगत राहू त्यांनी भुसे यांना आव्हान दिले.

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 1,142
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

संगमनेर येथील जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल: पोक्सो प्रकरणातील आरोपीची निर्दोष मुक्तता

June 6, 2026

राजेंद्र गडगे याला न्यायालयाचा दिलासा; गंभीर गुन्ह्यांत मिळाला नियमित जामीन

May 29, 2026

नसरापूर हत्याकांड: ६५ वर्षीय नराधमाभोवती कायद्याचा फास आवळला; कोर्टात रोज …

May 28, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
आंदोलन

संगमनेरमधील भेसळखोरांना कोणाचे अभय? तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईनंतरही संगमनेरचे अन्न व औषध प्रशासन सुस्तच! शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपजिल्हाप्रमुख अमर कतारी यांचा प्रशासनाला सवाल; आंदोलनाचा इशारा

By अनंत पांगारकरJune 9, 20260

महाराष्ट्र संवाद न्यूज | संगमनेर: एकीकडे अन्न व औषध प्रशासन विभागाचे (FDA) धडक आयुक्त तुकाराम…

यशोधन कार्यालयात ‘एसटी स्मार्ट कार्ड’ सुविधेचा शुभारंभ; ज्येष्ठ नागरिक व महिलांना प्रवासात मिळणार मोठी सवलत

June 9, 2026

…अन् थेट कोर्टातच झाली घोषणाबाजी!संगमनेरमधील ‘त्या’ प्रकाराने खळबळ, २० ते २५ जणांवर गुन्हा दाखल

June 9, 2026

उज्ज्वला योजनेतील लाभार्थ्यांना मोठा झटका; अनुदानित गॅस सिलिंडरची संख्या ९ वरून थेट ४ वर

June 9, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.