Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

पोलिसाच्या शेतातील बाजरीच्या कणसांवर जादूटोणा; संगमनेर तालुक्यात एकावर गुन्हा दाखल

03/10/2026

आज शनिवार ३ ऑक्टोबर — तुमचा आजचा दिवस कसा असेल जाणून घेऊया

03/10/2026

पुस्तकापुरते मर्यादित न राहता ऑडिओ आणि रील्सच्या माध्यमातून विचार पोहोचवा : बाळासाहेब थोरात

02/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » प्रांताधिकारी कार्यालयासमोर ‘यासाठी’ किसान सभेने दूध ओतून केले आंदोलन; शेतकरी नेते कॉम्रेड अजित नवलेसह अनेकांचा सहभाग
आंदोलन

प्रांताधिकारी कार्यालयासमोर ‘यासाठी’ किसान सभेने दूध ओतून केले आंदोलन; शेतकरी नेते कॉम्रेड अजित नवलेसह अनेकांचा सहभाग

तर मंत्रालयासमोर दूध ओतणार
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar05/12/2023No Comments3 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज

राज्यभर दुधाचे भाव कोसळल्यामुळे व पशुखाद्याच्या सातत्याने वाढत्या भावामुळे दुग्ध उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत. दुधाला किमान ३४ रुपये दर द्यावा, यासाठी सरकारने हस्तक्षेप करण्याच्या मागणीसाठी किसान सभा व दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीने मंगळवारी दुपारी संगमनेरमध्ये प्रांताधिकारी कार्यालयासमोर दूध ओतून आंदोलन केले.

शेतकरी नेते कॉम्रेड डॉ. अजित नवले यांच्यासह सतीश देशमुख, सदाशिव साबळे, ज्योतीराम जाधव, महेश नवले, डॉ. मनोज मोरे, नामदेव भांगरे, डॉ. संदीप कडलग, एकनाथ मेंगाळ, रामनाथ वदक, नंदू रोकडे, नंदू गवांदे, ताराचंद विघे, संगीता साळवे या प्रमुख नेत्यांसह शेकडो दूध उत्पादक शेतकरी आंदोलनात सहभागी झाले होते.

अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना मदत व्हावी यासाठी सरकारने दूध दर प्रश्नी हस्तक्षेप करावा या मागणीसाठी राज्यभर शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलने सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर संगमनेरमध्ये देखील अशाच प्रकारचे दूध ओतून आंदोलन करण्यात आले.

दुग्धोत्पादक शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने दुधाला किमान ३४ रुपये भाव द्यावा यासाठी शासन आदेश काढला. मात्र खासगी व सहकारी संस्थांनी शासनाचा हा आदेश धुडकावून लावला आहे. त्यामुळे या संदर्भात सरकारने तातडीने कारवाई करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी आंदोलकांनी मागणी केली.

दुधाला किमान ३४ रुपये दर द्यावा, पशुखाद्याचे भाव कमी करावेत, मिल्को मिटर व वजन काट्यांची नियमित तपासणी करावी, दुधात होणारी भेसळ रोखण्यासाठी कठोर उपाययोजना कराव्यात या मागण्या यावेळी करण्यात आल्या.

संगमनेर तालुक्यातील दुध उत्पादक आंदोलनात मोठ्या संखेने सामील झाले होते. संगमनेर येथील किसान सभेच्या कार्यालयात सुरूवातीला शेतकरी जमा झाले. त्यानंतर संगमनेर शहरातून मोठा मोर्चा काढत शेतकऱ्यांनी सकाळी ११.३० वाजता प्रांताधिकारी कार्यालयाकडे कूच केले. सरकारचा आणि दुध कंपन्यांचा निषेध करणाऱ्या घोषणा देत हा भव्य मोर्चा शहराच्या मुख्य रस्त्यावरून प्रांताधिकारी कार्यालयावर पोहोचला. प्रांत कार्यालयाच्या दारात दुध ओतून यावेळी आंदोलनाल करण्यात आले.

दुधातील दराच्या चढ उतारामुळे निर्माण होणारी अस्थिरता संपविण्यासाठी दुग्धविकास विभागाने दुधाचे खरेदी दर निश्चित करण्यासाठी समिती नेमली होती. खाजगी व सहकारी दुध संघांचे व दुध कंपन्यांचे प्रतिनिधी तसेच सरकारी अधिकारी यांचा समावेश असलेल्या समितीने दर तीन महिन्याने दुध खरेदीदर ठरवावेत व दुध संघांनी आणि कंपन्यांनी यानुसार दर द्यावेत असे दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखेपाटील यांनी जाहीर केले होते.

यानुसार दुधाला ३४ रुपये दर जाहीर करण्यात आला होता. मात्र या दरात रिव्हर्स दराची मेख मारून दुध कंपन्यांनी त्यावेळी दर पाडले. आता तर हा आदेशच धाब्यावर बसविण्यात आला आहे. ३४ रुपयाऐवजी बेस रेट २७ रुपयांपर्यंत खाली आणण्यात आला आहे. दुध संघ व दुध कंपन्या संगनमत करून हे दर पाडत असून या लुटमारीला लगाम लावण्यासाठी व पशुखाद्याचे दर नियंत्रित करण्यासाठी कायदा करण्याची आवश्यकता असल्याचे यावेळी डॉ. अजित नवले यांनी सांगितले.

सरकारने तरीही दाद दिली नाही तर मंत्रालयात दुध ओतावे लागेल, असा इशारा यावेळी किसान सभेचे राज्य सहसचिव सदाशिव साबळे यांनी दिला. मोर्चामध्ये दुध उत्पादकांच्या सोबतच बांधकाम कामगार व वन जमीन धारकही मोठ्या संख्येने सामील झाले होते. त्यांच्याही मागण्यांचे निवेदन यावेळी प्रांताधिकारी संगमनेर यांना देण्यात आले.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 856
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

प्रशासनाच्या नाकर्तेपणाविरोधात संगमनेर पेटले! संतप्त शेतकरी प्रांताधिकारी कार्यालयात घुसले आमदारांचे फ्लेक्स लावायला तुम्ही त्यांचे गुलाम आहात का? – माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचा थेट सवाल यशवंतराव चव्हाण प्रशासकीय भवनाच्या पायऱ्यांवर ठिय्या आंदोलन; अखेर प्रांताधिकारी अरुण उंडे नमले, निवेदन स्वीकारले

22/09/2026

विजेचा खेळखंडोबा अन् पाणी पळवण्याचा डाव; संगमनेरमध्ये उद्या महाआक्रोश मोर्चा!

21/09/2026

वीज प्रश्नावर संगमनेर काँग्रेसचा ‘जनआक्रोश मोर्चा’; बाळासाहेब थोरातांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात जोरदार तयारी

19/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

पोलिसाच्या शेतातील बाजरीच्या कणसांवर जादूटोणा; संगमनेर तालुक्यात एकावर गुन्हा दाखल

By Annant Ppangarkar03/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर तालुक्यातील शेळकेवाडी येथे मुंबई पोलिसाच्या शेतात वाळत घातलेल्या बाजरीच्या कणसांवर…

आज शनिवार ३ ऑक्टोबर — तुमचा आजचा दिवस कसा असेल जाणून घेऊया

03/10/2026

पुस्तकापुरते मर्यादित न राहता ऑडिओ आणि रील्सच्या माध्यमातून विचार पोहोचवा : बाळासाहेब थोरात

02/10/2026

संगमनेरात महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांची जयंती उत्साहात; १५७ बालगांधींच्या प्रभात फेरीने शहर दुमदुमले, गांधीजींच्या विचारांमुळे जगात भारताची मोठी ओळख: मा. आमदार डॉ. सुधीर तांबे

02/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.