Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

धार्मिक कार्यानंतर नदीत पोहण्यासाठी गेलेल्या दोघांचा बुडून मृत्यू

June 10, 2026

आज बुधवार, १० जून २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

June 10, 2026

संगमनेरमधील भेसळखोरांना कोणाचे अभय? तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईनंतरही संगमनेरचे अन्न व औषध प्रशासन सुस्तच! शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपजिल्हाप्रमुख अमर कतारी यांचा प्रशासनाला सवाल; आंदोलनाचा इशारा

June 9, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » छत्रपती शिवाजी महाराजांबरोबरच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे भव्य स्मारक उभारणार पालकमंत्री विखे पाटलांची संगमनेरात घोषणा!
सामाजिक

छत्रपती शिवाजी महाराजांबरोबरच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे भव्य स्मारक उभारणार पालकमंत्री विखे पाटलांची संगमनेरात घोषणा!

अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरDecember 6, 2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज – दि. ६ डिसेंबर

संगमनेर मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याबरोबरच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पूर्णाकृती स्मारक उभारले जाईल अशी घोषणा जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे महसूल, दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी संगमनेर येथे डॉ. आंबेडकर प्रतिष्ठानने आयोजित केलेल्या अभिवादन सभेत महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज भेट दिली. या भेटीत त्यांनी संगमनेरात छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पूर्णाकृती स्मारक उभारले जाईल, अशी घोषणा केली.

मागील महिन्यात विखे पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा संगमनेरात उभारला जाईल, अशी घोषणा केली होती. या घोषणेचे संगमनेर तालुक्यातील जनतेने स्वागत केले. मात्र बहुजन पालक छत्रपती शिवरायांसोबत बहुजन उद्धारक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा संगमनेरात झाला पाहिजे, अशी मागणी डॉ. आंबेडकर प्रतिष्ठानचे कार्यकारी सदस्य प्रा. शशिकांत माघाडे, पत्रकार गौतम गायकवाड, विधिज्ञ अमित सोनवणे यांनी केली होती.

माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांची भेट घेऊन या प्रश्नात लक्ष घालण्याची विनंती केली. थोरात यांनी याबाबत सकारात्मक भूमिका दर्शविली होती. यामुळे पालकमंत्र्यांच्या भूमिकेकडे लक्ष लागले होते. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी पक्ष आणि विरोधक यांच्यात संगमनेरातील पूर्णाकृती स्मारके हा विषय राजकारणाच्या केंद्रस्थानी येऊ शकतो. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री विखे यांनी तातडीने बुधवारी संगमनेरला येत डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेतली.

प्रतिष्ठानच्या वतीने कुसुमताई माघाडे आणि गौतम गायकवाड यांनी पूर्णाकृती स्मारका संदर्भात पालकमंत्र्यांना लेखी निवेदन दिले आणि आपली भूमिका मांडली. दोन्ही महापुरुषांच्या स्मारकांसंदर्भात आपण सकारात्मक असून संगमनेर शहराच्या वैभवात भर घालणारे यथोचित स्मारक शासन उभारेल, अशी घोषणा यावेळी विखे पाटील यांनी केली. याच वेळी उपस्थित शासकीय अधिकाऱ्यांना स्मारकासाठी संगमनेरात जागा शोधण्याचे आदेश दिले. यामुळे संगमनेरातील बहुजन आणि आंबेडकर चळवळीतील कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला असून पालकमंत्र्यांच्या घोषणेचे स्वागत केले आहे.

यावेळी डॉ. आंबेडकर प्रतिष्ठानचे सचिव अण्णासाहेब अडांगळे, के. एस. गायकवाड, ए. पी. बनसोडे, विनय घोसाळे, विलासराव दारोळे, ऍड. अमित सोनवणे, असिफ शेख, विनोद गायकवाड व इतर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 702
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

यशोधन कार्यालयात ‘एसटी स्मार्ट कार्ड’ सुविधेचा शुभारंभ; ज्येष्ठ नागरिक व महिलांना प्रवासात मिळणार मोठी सवलत

June 9, 2026

पेमगिरीच्या ‘हेरिटेज वॉक’मधून उलगडला ऐतिहासिक वैभव; शहागड आणि महाकाय वटवृक्षाला अभ्यासकांची भेट

June 8, 2026

गगनगिरी महाराज अखंड हरिनाम सप्ताहाची तयारी अंतिम टप्प्यात; गुंजाळवाडीत भक्ती अन् प्रबोधनाची महापर्वणी

June 7, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
महाराष्ट्र संवाद विशेष

धार्मिक कार्यानंतर नदीत पोहण्यासाठी गेलेल्या दोघांचा बुडून मृत्यू

By अनंत पांगारकरJune 10, 20260

महाराष्ट्र संवाद न्यूज | अहिल्यानगर अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील जुने भालगाव येथे नदीच्या पाण्यात बुडून…

आज बुधवार, १० जून २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

June 10, 2026

संगमनेरमधील भेसळखोरांना कोणाचे अभय? तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईनंतरही संगमनेरचे अन्न व औषध प्रशासन सुस्तच! शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपजिल्हाप्रमुख अमर कतारी यांचा प्रशासनाला सवाल; आंदोलनाचा इशारा

June 9, 2026

यशोधन कार्यालयात ‘एसटी स्मार्ट कार्ड’ सुविधेचा शुभारंभ; ज्येष्ठ नागरिक व महिलांना प्रवासात मिळणार मोठी सवलत

June 9, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.