Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेरमध्ये दरोडा टाकणाऱ्या संघटित टोळीवर ‘भारतीय न्याय संहिता’ कलम १११ अन्वये मोठी कारवाई; अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांचे आदेश

June 6, 2026

अपघातात निमगाव टेंभी येथील १८ वर्षीय तरुणाचा मृत्यू

June 6, 2026

संगमनेरमध्ये वृद्ध शेतकऱ्याला भरदुपारी लुटले; पावणेदोन लाखांच्या रोकडसह धनादेश लंपास

June 6, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » दूध उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान देण्याऐवजी दुग्धविकास मंत्री विखे पाटलांकडून राज्यातील दूध उत्पादकांची सुरू आहे बदनामी! काँग्रेसच्या या नेत्याचा गंभीर आरोप
राजकारण

दूध उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान देण्याऐवजी दुग्धविकास मंत्री विखे पाटलांकडून राज्यातील दूध उत्पादकांची सुरू आहे बदनामी! काँग्रेसच्या या नेत्याचा गंभीर आरोप

अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरDecember 8, 2023No Comments3 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज

नागपूर, दि. ८ – दुधाचे भाव २५ रुपयांपर्यंत खाली आले आहेत. यावरून राज्यभर मोर्चे, आंदोलने सुरू सुरू असताना सरकार यावर तोडगा काढायला तयार नाही, उलट दुग्धविकास मंत्री राज्यातील दुधात भेसळ आहे असे सांगून दूध उत्पादकांची बदनामी करत आहे. त्यामुळे राज्यातील दुधाकडे संशयित नजरेने पाहिले जात असून खाजगी दूध संस्थांची चंगळ सुरू असल्याचा गंभीर आरोप माजी मंत्री काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी केला.

दुधाच्या प्रश्नावर असलेल्या स्थगन प्रस्तावावर सभागृहात सत्ताधाऱ्यांनी चर्चा नाकारल्यानंतर सभागृहाच्या पायऱ्यांवर थोरात यांनी दुधाच्या प्रश्नावरून सरकारला घेरल्याचे दिसून आले.

थोरात म्हणाले, दूध दरावरून राज्यभर आंदोलने सुरू आहे. शेतकऱ्यांना २४ ते २५ रुपये दराने दूध विकावे लागत आहे. दुधा पाठीमागची मेहनत लक्षात घेता २५ रुपयांनी दूध विकणे शेतकऱ्यांना परवडणारे नाही. दुधाला किमान ३५ रुपयांचा भाव मिळायला हवा. सरकारने दुधाचे भाव जाहीर करण्याचे केवळ नौटंकी केली आहे. अंमलबजावणीसाठी सरकार कोणतीही मदत करायला तयार नाही.

दुधाच्या व्यवसायावर मोठ्या प्रमाणात अर्थव्यवस्था अवलंबून असून ग्रामीण भागात शेतकरी जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय करतात. अनेक बेरोजगार तरुणही या व्यवसायात आले आहेत. अशावेळी या व्यवसायाची काळजी घेणे आणि तो सांभाळणे ही सरकारची जबाबदारी आहे. यापूर्वी ज्या ज्या वेळी हा व्यवसाय अडचणीत सापडला त्या त्यावेळी सरकारने दूध उत्पादकांच्या पाठीशी उभे राहण्याची भूमिका घेतली.

कोरोना काळात देखील सरकारने दूध घेतले. दूध संस्थांना पावडर बनविण्यासाठी प्रोत्साहन दिले. आजही कर्नाटक, राजस्थान, आंध्रप्रदेशसारख्या राज्यात दुधाला पाच रुपयांपर्यंत अनुदान दिले जाते. राज्य सरकारने देखील याकडे सहानुभूतीने बघावे आणि दूध उत्पादकांना किंवा संस्थांना दूध पावडर बनविण्यासाठी अनुदान द्यावे.

अशा परिस्थितीत सरकार अथवा दुग्धविकास मंत्री या प्रश्नावर सकारात्मक तोडगा काढायला तयार नाही. उलट दुग्धविकास मंत्री राज्यातील दुधात भेसळ असल्याची टिमकी वाजवत फिरतात. यावरून या प्रश्नाचे किती गंभीर आहेत याचा प्रत्यय येतो. एकीकडे दूध दरासाठी स्पर्धा करावी लागते, राज्यातील दूध संस्थांकडून जे उपपदार्थ तयार केले जातात त्यांना देखील विक्रीसाठी संघर्ष करावा लागतो. तर दुसरीकडे मंत्र्यांकडूनच दूध भेसळीचा आरोप करीत बदनामीची मोहीम सुरू आहे. मंत्र्यांना जर असे भेसळीचे प्रकार आढळत असतील तर त्यांनी त्यावर कारवाई करावी, मात्र नाहक सरसकट राज्यातील दूध उत्पादक शेतकरी आणि दूध संस्थांना बदनाम करू नये, असे देखील थोरात यांनी विखे पाटलांना खडेबोल सुनावले आहे.

परराज्यातील दूध संस्थांकडून देखील शेतकऱ्यांची पिळवणूक…

पर राज्यातील दूध संस्था महाराष्ट्रातल्या सहकारी दूध संस्थांना मोडीत काढण्याचे काम करत आहे. जेव्हा शेतकऱ्यांना भावाची गरज असते तेव्हा या संस्था शेतकऱ्यांना कमी भाव देतात. जेव्हा दूध दर स्थिर असतात त्यावेळी परराज्यातील या संस्था विनाकारण स्पर्धा तयार करून सहकारी संस्थांना उध्वस्त करत असतात. आणि ज्यावेळी त्यांची मक्तेदारी तयार होते त्यावेळी ते शेतकऱ्यांची मिरवणूक करण्याचे काम सुरू करतात असा देखील आरोप थोरात यांनी केला आहे.

मुख्यमंत्री दुग्ध विकास मंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन तोडगा काढणार! उपमुख्यमंत्री पवार

दरम्यान यासंदर्भात बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत बैठक लावून या प्रश्नावर तोडगा काढला जाणार असल्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.

Live : #शेतकरी विरोधी सरकार https://t.co/UbomUEy5cT

— Balasaheb Thorat (@bb_thorat) December 8, 2023

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 738
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

घुलेवाडी सरपंच व तीन सदस्यांच्या अपात्रतेला अप्पर विभागीय आयुक्तांची स्थगिती; जिल्हाधिकार्‍यांच्या निर्णयाविरोधात दिलासा

June 4, 2026

विधानपरिषद निवडणूक : भाजपकडून दिडशे कोटींची सौदेबाजी.. मविआच्या सर्व उमेदवारांची माघार! खा. संजय राऊत यांचा गंभीर आरोप

June 4, 2026

विधान परिषद निवडणूक बिनविरोध करण्यासाठी भाजपाकडून कोट्यवधींच्या ऑफर्स; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा घणाघाती आरोप

June 4, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

संगमनेरमध्ये दरोडा टाकणाऱ्या संघटित टोळीवर ‘भारतीय न्याय संहिता’ कलम १११ अन्वये मोठी कारवाई; अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांचे आदेश

By अनंत पांगारकरJune 6, 20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन | संगमनेर: संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत नाशिक-पुणे हायवेवर शस्त्रांचा धाक…

अपघातात निमगाव टेंभी येथील १८ वर्षीय तरुणाचा मृत्यू

June 6, 2026

संगमनेरमध्ये वृद्ध शेतकऱ्याला भरदुपारी लुटले; पावणेदोन लाखांच्या रोकडसह धनादेश लंपास

June 6, 2026

वीज चोरी पकडणाऱ्या कंत्राटी वायरमनने मागितली ५० हजारांची लाच! गुन्हा दाखल, वायरमन अटकेत; सोमवारपर्यंत पोलीस कोठडी

June 6, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.