Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

अहिल्यानगर जिल्हा बँकेसाठी संगमनेर तालुक्यातून शिवसेनेचे तीन उमेदवार मैदानात — यांनी केले अर्ज दाखल

05/10/2026

मोठी घडामोड: संगमनेर तालुका दूध उत्पादक संघाच्या चेअरमनपदाचा देशमुख यांचा राजीनामा, नवे चेअरमन कोण? तर विधानपरिषद सभापती राम शिंदे जिल्हा बँकेची निवडणूक लढविणार नाही

05/10/2026

अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या रणधुमाळीत मोठा ट्विस्ट: संगमनेरमधून यांची उमेदवारी फायनल; बाळासाहेब थोरातांच्या भूमिकेकडे जिल्ह्याचे सर्वांचे लक्ष!

05/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » १ जानेवारीपासून राज्यस्तरीय सहकार महर्षी क्रिकेट स्पर्धेचा थरार संगमनेरात रंगणार! संघाच्या सहभागासाठी २१ डिसेंबरपर्यंत संधी
क्रिडा व कला

१ जानेवारीपासून राज्यस्तरीय सहकार महर्षी क्रिकेट स्पर्धेचा थरार संगमनेरात रंगणार! संघाच्या सहभागासाठी २१ डिसेंबरपर्यंत संधी

Annant PpangarkarBy Annant Ppangarkar15/12/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज

संगमनेर (दि. १५ डिसेंबर) -राज्यातील प्रतिष्ठेची व नावाजलेली, क्रिकेट प्रेमींना उत्सुकता लागून असलेली सहकार महर्षी चषक लेदर बॉल क्रिकेट स्पर्धा नववर्षाच्या पहिल्याच दिवशी १ जानेवारीपासून सुरू होत असल्याची माहिती नाशिक पदवीधर मतदार संघाचे युवा आमदार सत्यजीत तांबे यांनी दिली आहे.

स्वातंत्र्य सेनानी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त जयहिंद लोक चळवळ आणि क्रिकेट असोसिएशन ऑफ संगमनेर यांच्यावतीने या स्पर्धांचे आयोजन केले जाते. सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात क्रीडा संकुलात १ ते १७ जानेवारी दरम्यान या स्पर्धा पार पडतील. यंदाचे वर्ष भाऊसाहेब थोरात यांच्या जन्मशताब्दी वर्ष असल्याने या स्पर्धेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. राज्यभरातील निवडक ३२ संघांना या स्पर्धेत प्रवेश दिला जाणार असून सहभागासाठी २१ डिसेंबरपर्यंत संधी आहे.

तांबे म्हणाले, यंदाचे स्पर्धेचे हे पंचविसावे वर्ष आहे. उत्तम दर्जाच्या संघाचा सहभाग, आंतरराष्ट्रीय दर्जाचे नियोजन, आयपीएल व राज्य पातळीवरील क्रिकेटपटूंचा सहभाग, प्रचंड उत्साही प्रेक्षक ही या स्पर्धेची ठळक वैशिष्ट्ये आहेत. थोरात यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त राज्यात व तालुक्यामध्ये विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. संगमनेरच्या थोरात क्रीडा संकुलात राज्यस्तरीय सहकार महर्षी टी २० क्रिकेट स्पर्धा होत आहे.

स्पर्धेचे उद्घाटन काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते कथा माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात, आमदार सत्यजित तांबे, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे यांच्यासह विविध मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे. संगमनेरात पार पडलेल्या या सामन्यांसाठी आतापर्यंत बीसीसीआयचे उपाध्यक्ष खासदार राजू शुक्ला महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अजय शिर्के, सिने अभिनेत्री महिमा चौधरी, अमृता खानविलकर, प्रणव धनवडे आदीसह दिग्गजांची उपस्थिती लाभली आहे. यावेळीदेखील सिने कलावंतांसह दिग्गज क्रिकेटपटूंची उपस्थिती लाभणार आहे.

भारतीय क्रिकेट संघातील सलील अंकोला, अजित आगरकर, झहीर खान, अजिंक्य रहाणे यांच्यासह अनेक रणजी, आयपीएल खेळाडूंनी आपला खेळ संगमनेरकरांना दाखविला आहे. स्पर्धेतील प्रथम विजेत्या संघास २,०१,००० रुपये, उपविजेता संघास १,३१,००० रुपये, तृतीय क्रमांक ७१,००० रुपये, चौथ्या विजेत्या संघास ३१,००० हजार रुपयांच्या पारितोषिकांसह अनेक वैयक्तिक बक्षिसांचा समावेश आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 686
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

जयहिंद कला महोत्सव: १२ हजार विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग; कौशल्यपूर्ण शिक्षणासाठी उपक्रम राज्यासाठी दिशादर्शक – माजी मंत्री बाळासाहेब थोरात

08/09/2026

संगमनेरात बालकला महोत्सवाचे उत्साहात उद्घाटन; बालगोपाळांच्या कलागुणांना मिळाले हक्काचे व्यासपीठ!

07/09/2026

संगमनेरात जयहिंद लोकचळवळीच्या वतीने उद्या आणि परवा बालकला महोत्सवाचे आयोजन; विविध उपक्रमांसह रंगभरण स्पर्धेची पर्वणी

05/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
निवडणूक

अहिल्यानगर जिल्हा बँकेसाठी संगमनेर तालुक्यातून शिवसेनेचे तीन उमेदवार मैदानात — यांनी केले अर्ज दाखल

By Annant Ppangarkar05/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- महायुती व महाविकास आघाडीने शिवसेनेला विश्वासात न घेता निवडणूक बिनविरोध करण्याचे…

मोठी घडामोड: संगमनेर तालुका दूध उत्पादक संघाच्या चेअरमनपदाचा देशमुख यांचा राजीनामा, नवे चेअरमन कोण? तर विधानपरिषद सभापती राम शिंदे जिल्हा बँकेची निवडणूक लढविणार नाही

05/10/2026

अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या रणधुमाळीत मोठा ट्विस्ट: संगमनेरमधून यांची उमेदवारी फायनल; बाळासाहेब थोरातांच्या भूमिकेकडे जिल्ह्याचे सर्वांचे लक्ष!

05/10/2026

संगमनेरमध्ये पालकमंत्री विखे पाटलांचा अधिकाऱ्यांना इशारा: दुष्काळात कामात हलगर्जीपणा चालणार नाही; पशुसंवर्धन विभागाला नोटीस

05/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.