Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

तरुणांच्या प्रश्नांवर उत्तरदायित्व मागण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचा उपक्रम; ‘जय भीम Gen-Z’ टाउनहॉल मालिकेचा टीझर प्रदर्शित

10/09/2026

अवैध मावा तयार करणाऱ्या कारखान्यावर एलसीबीचा छापा; १९ वर्षांच्या तरुणासह १ लाख ५ हजारांचा मुद्देमाल जप्त

10/09/2026

‘सध्याच्या राजकीय स्थितीमुळे लोकशाहीच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह’ : प्रा. डॉ. शरद बाविस्कर

10/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » जुनी आठवण जागवत माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबेनी लिहिले अधिवेशनात व्यस्त असलेल्या आमदार सत्यजित तांबे यांना पत्र… वाचा काय आहे ती आठवण…
महाराष्ट्र संवाद विशेष

जुनी आठवण जागवत माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबेनी लिहिले अधिवेशनात व्यस्त असलेल्या आमदार सत्यजित तांबे यांना पत्र… वाचा काय आहे ती आठवण…

Annant PpangarkarBy Annant Ppangarkar19/12/2023Updated:19/12/2023No Comments3 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज

प्रिय ददू, 

अनेक आशीर्वाद !

या वर्षी तू आमदार झालास तेव्हापासून सतत कामानिमित्त दौऱ्यांवर किंवा फिरतीवर असतोस. या आधी तुला कधी पत्र लिहावं असं वाटलं नाही. पण नागपूरच्या हिवाळी अधिवेशनासाठी यंदा तू पहिल्यांदाच आमदार म्हणून गेलास आणि मनात अनेक आठवणी जाग्या झाल्या.

विधान परिषदेतली तुझी कामगिरी आम्ही बघत आहोत. लोकांच्या मनाला भिडणारे अनेक प्रश्न तू सभागृहात मांडत आहेस. तुझ्या अभ्यासपूर्ण मांडणीचं कौतुक वाटतं.

पण आजचं हे पत्र त्याबद्दल नाही. तू नागपूरला गेल्यापासून एक प्रसंग मला राहून राहून आठवतोय. कदाचित तुला आज त्याची आठवण नसेल. तू फक्त ६-७ वर्षांचा होतास. खूप वर्षं लोटली त्या गोष्टीला. ९० च्या विधानसभा निवडणूकीत आबा (श्री. बाळासाहेब थोरात) दुसऱ्यांदा आमदार झाले. नागपूरच्या अधिवेशनाला जाताना त्या वर्षी त्यांनी आम्हा सर्व भावंडांना आणि बच्चे कंपनीनाही सोबत घेतलं होतं. डिसेंबर महिन्यात नागपूरमध्ये थंडीचा कडाका खूप असतो. त्या वेळी तर थंडी जास्तच असायची. त्यामुळे आम्ही सगळे दुकानात स्वेटर खरेदी करायला गेलो. तूदेखील होतास. अगदी लहान! आपण सगळे गाडीनेच गेलो होतो. शांताराम मामा गाडी चालवत होते. आपण गाडी धरमपेठच्या एका चौकात उभी केली आणि दोन रस्ते ओलांडून एका दुकानात खरेदीसाठी गेलो होतो.

तुझी आजी म्हणजे माझी आई, आपण सगळेच तिला बाई म्हणायचो. तर, बाईने आम्हाला सूचना केलीच होती की, मुलांचं बोट सोडायचं नाही, त्यांना नीट सांभाळायचं. तुम्ही मुलांनी स्मिता मावशी आणि साधना मावशीचा हात धरला होता. स्वेटर बघायला म्हणून आम्ही दुकानाच्या तळघरात गेलो. तू एक पुतळा बघत उभा राहिलास आणि मावशीचा हात सुटला.

आम्ही वर आलो, तर एकटा हर्षल मावशीचा हात धरून उभा होता. तुझा पत्ताच नाही. मग झालं ! सगळी शोधाशोध सुरू झाली. इकडे-तिकडे दोन-तीन दुकानं शोधूनही तू मिळे ना म्हटल्यावर आम्ही सगळेच घाबरलो. त्या थंडीतही घाम फुटला होता आम्हाला. जवळपास अर्धा तास आम्ही येणाऱ्या-जाणाऱ्या प्रत्येकाला विचारत होतो, ‘लाल शर्ट आणि जिन्सची निळी हाफपँट घातलेला मुलगा पाहिला का?’ पण त्या शहराच्या गर्दीत कोणीच सांगत नव्हतं. आता मात्र आम्हाला दरदरून घाम फुटला होता. शेवटी आम्ही ठरवलं की, आता पोलीस स्टेशनमध्ये तक्रार द्यायची.

सगळेच जण कसेबसे चिंतातूर चेहऱ्याने गाडीजवळ आलो आणि बघतो तर काय, तिथे तू शांताराम मामाच्या कडेवर बसला होतास. त्या वेळी तुला बघून झालेला आनंद मी आजही विसरू शकत नाही. मला आठवतं, एकीकडे मी रडत होते आणि त्याच वेळी तुला बघून हसत होते. शांताराम मामाच्या कडेवरून तू माझ्याकडे उडी मारली. तू गाडीपर्यंत कसा पोहोचलास, हे तुला विचारलं आणि तू दिलेलं उत्तर ऐकून आम्ही सगळेच थक्क झालो होतो.

अजूनही तुझे शब्द आठवतात. तू म्हणालास, ‘तुम्ही कुठे गेलात, ते मला कळेना. मी घाबरून तुम्हाला इकडे तिकडे शोधत होतो. बाजूला बंगाली मिठाईचं दुकान होतं. त्यांना विचारलं की, आमची मम्मी-आबा कुठे आहेत. पण त्यांना मराठी समजेना. मग मी पुढल्या दुकानात गेलो. मी हिंदीतून विचारलं की, मेरे आबा आमदार है, हम अधिवेशन को आए है, वो कहाँ गए? त्यांना मी सांगितलं की, आमची गाडी दोन रस्ते सोडून लावली आहे. ते माझ्यासोबत गाडीपर्यंत आले. शांताराम मामा दिसल्यावर मला रडायलाच आलं.’

आज हे सगळं आठवताना मला पुन्हा एकदा भरून आलंय. त्या वेळी तू एवढा छोटा होतास आणि तरीही तोडक्या मोडक्या हिंदीत बोललास. गाडी कुठे पार्क केली होती, ते देखील त्यांना बरोबर दाखवलं होतंस. आम्हाला तुझ्या हुशारीचं कौतुक वाटलं होतं.

आता तू स्वत: आमदार म्हणून नागपूर हिवाळी अधिवेशनाला गेलास, फक्त हरवू नकोस म्हणजे झालं.

तुझी मम्मी, सौ. दुर्गा

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,091
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

गणेश विसर्जनासाठी प्रवरा नदीपात्रात तातडीने पाणी सोडण्यासंदर्भात नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

09/09/2026

वर्गणीवरून व्यापाऱ्याला मारहाण; गणेशोत्सवाच्या तोंडावर बाजारपेठेत खळबळ, पोलीस तक्रारीविना चर्चेला उधाण

05/09/2026

माहिती अधिकाराचे प्रणेते अण्णा हजारे यांची मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांनी घेतली सदिच्छा भेट; प्रकृतीची केली विचारपूस

03/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
सामाजिक

तरुणांच्या प्रश्नांवर उत्तरदायित्व मागण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचा उपक्रम; ‘जय भीम Gen-Z’ टाउनहॉल मालिकेचा टीझर प्रदर्शित

By Annant Ppangarkar10/09/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – फुले-शाहू-आंबेडकर विचारधारेशी जोडलेल्या तरुणांशी थेट संवाद साधण्याच्या आणि त्यांच्या आशा-आकांक्षा…

अवैध मावा तयार करणाऱ्या कारखान्यावर एलसीबीचा छापा; १९ वर्षांच्या तरुणासह १ लाख ५ हजारांचा मुद्देमाल जप्त

10/09/2026

‘सध्याच्या राजकीय स्थितीमुळे लोकशाहीच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह’ : प्रा. डॉ. शरद बाविस्कर

10/09/2026

आज गुरुवार, १० सप्टेंबर जाणून घ्या आजच्या दिवसाचे राशिभविष्य

10/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.