Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

युरियाचा काळाबाजार: संगमनेरमध्ये कृषी विभागाची धडक कारवाई; विनाबिल खतविक्री अन् अनधिकृत साठा जप्त

19/08/2026

अवैध धंद्यांवर एलसीबीचा दणका; एकाच दिवसात ११ छापे, गुन्हे दाखल

19/08/2026

बुधवार, १९ ऑगस्ट २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

19/08/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » रविवार विशेष लेख… माजी खासदार वाकचौरे स्वगृही परतले, पक्षांतर्गत मनोमिलन झाले… जनतेच्या नाराजीचे आणि शिवसैनिकांवरील न्यायालयीन खटल्याचे पुढे काय?
विश्लेषण

रविवार विशेष लेख… माजी खासदार वाकचौरे स्वगृही परतले, पक्षांतर्गत मनोमिलन झाले… जनतेच्या नाराजीचे आणि शिवसैनिकांवरील न्यायालयीन खटल्याचे पुढे काय?

लेखक 'महाराष्ट्र संवाद न्यूज'चे संपादक आहे
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar07/01/2024Updated:07/01/2024No Comments3 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

अनंत पांगारकर @ ७५८८६००९५०

लोकसभा मतदारसंघाची पुनर्रचना झाल्यानंतर शिर्डी लोकसभा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव झाला. २००९ साली झालेल्या निवडणुकीत सध्याचे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचा पराभव करत या मतदारसंघातून शिर्डीच्या साई संस्थांचे तत्कालीन कार्यकारी अधिकारी भाऊसाहेब वाकचौरे शिवसेनेच्या तिकिटावर खासदार झाले. रामदास आठवलेसारख्या बलाढ्य उमेदवाराचा पराभव करणारे वाकचौरे या मतदार संघात जायंट किलर ठरले. त्यामुळे देशभर या मतदारसंघाची चर्चा झाली. या मतदारसंघातून म्हणजेच पूर्वीच्या कोपरगावमधून शिवसेनेच्या तिकिटावर तत्कालीन खासदार बाळासाहेब विखे पाटील यांच्या पाठोपाठ वाकचौरे दुसरे खासदार ठरले. शिवसेनेकडून मिळालेली खासदारकी गमविल्यानंतर काँग्रेस, भाजप असा प्रवास करत वाकचौरे दीर्घकाळाच्या विश्रांतीनंतर पुन्हा स्वगृही म्हणजे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत परतले आहे. सध्याच्या राजकारणात काहीही साध्य असल्याचे हे एक बोलके उदाहरण.

संसदेच्या सर्वोच्च सभागृहात २००९ मध्ये खासदार म्हणून गेलेल्या वाकचौरे यांनी खासदार म्हणून गावागावात सभा मंडपासह अन्य कामांसाठी आपल्या खासदार निधीतून निधी उपलब्ध करून दिला. संसदेच्या सभागृहात त्यांनी काय केले यापेक्षा गावागावात दिलेल्या निधीमुळे ते मतदार संघात “आपला माणूस हक्काचा माणूस” म्हणूनही चर्चेत राहिले. याच आपल्या माणसावर पुन्हा विश्वास दर्शवित शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत उमेदवारी दिली. मात्र ऐन निवडणुकीदरम्यान वाकचौरे यांनी शिवसेनेचे मिळालेली उमेदवारी नाकारत धनुष्यबाण खाली ठेवत काँग्रेसच्या हातात हात देत काँग्रेसची उमेदवारी मिळविली. ऐनवेळी शिवसेनेला या मतदारसंघात पुन्हा नव्याने उमेदवार शोधावा लागला. पूर्वाश्रमीचे भाजपचे माजी आमदार असलेल्या सदाशिव लोखंडे यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडली आणि शिवसेनेशी गद्दारी करत काँग्रेसच्या वाकचौरे यांचा लोखंडे यांनी अवघ्या १७ दिवसांच्या प्रचारादरम्यान दणदणीत पराभव करत शिवसेनेची जागा कायम राखली.

या निवडणुकीत वाकचौरे यांना ‘गद्दार’ म्हणून हिणवले गेले. मतदार संघात ठिकठिकाणी त्यांना शिवसेनेच्या कार्यकर्त्यांच्या रोषालादेखील सामोरे जावे लागले. संगमनेरात तर प्रकरण थेट मारहाणीपर्यंत जाऊन पोहोचले. साईबाबांच्या शिर्डीतील लोकप्रतिनिधीवरील हल्ल्याचे प्रकरण देशभर चर्चिले गेल्याने तत्कालीन शिवसेना शहर प्रमुख अमर कतारी, भाऊसाहेब हासे आदींना तुरुंगात जावे लागले. त्या वेळेपासून अद्याप पर्यंत हे शिवसेनेचे पदाधिकारी न्यायालयात चकरा मारत आहे. या खटल्याची सुनावणी सध्या शेवटच्या टप्प्यात आहे.

खासदारकीच्या निवडणुकीत शिवसेनेच्या लोखंडे यांच्याकडून मोठा पराभव पचविल्यानंतर वाकचौरे यांनी काँग्रेसचा हात सोडून देत भाजपचे कमळ हाती घेतले आणि लगेचच भाजपकडून २०१४ ची विधानसभेची निवडणूक श्रीरामपूरमधून लढविली तेथेही त्यांच्या पदरी निराशा आली. त्यामुळे शिवसेना, काँग्रेस, भाजप आणि पुन्हा माफी मागत शिवसेना असा वाकचौरे यांचा प्रवास राहिला आहे. आता २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी त्यांच्याकडे शिवसेनेचे संभाव्य उमेदवार म्हणून बघितले जाते. वाकचौरे यांच्या पुन्हा शिवसेना प्रवेशाबद्दल शिवसेनेतील कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले होते.

या पार्श्वभूमीवर वाकचौरे यांच्या शिवसेना प्रवेशाला टोकाचा विरोध झाला. यात कतारी, हासे यांच्यासह शिर्डी लोकसभा मतदारसंघातील काही प्रमुख पदाधिकाऱ्यांचा समावेश होता. त्यातच नव्याने निवडले गेलेल्या पदाधिकाऱ्यांच्या निवडीत वाकचौरे यांचा वरचष्मा दिसून आला. नव्या निवडीमध्ये वाकचौरे यांच्यासह पक्षातील काहींनी जुन्या पदाधिकाऱ्यांची गच्छंती करत नव्याने दुसऱ्या पदाधिकाऱ्यांना संधी दिली. त्यातच गेल्या काही काळापासून शिवसेनेपासून दुरावलेल्यांना पदे देण्यात आल्याने पक्षात पुन्हा असंतोषाचे वातावरण निर्माण झाले होते. संगमनेरमध्ये शिर्डी लोकसभा मतदारसंघातील नाराज पदाधिकाऱ्यांची बैठक देखील होऊ घातली होती. मात्र पक्षातील नाराजी थांबविण्यात वाकचौरे आणि पक्षश्रेष्ठी यशस्वी झाले.

गेल्या आठवड्यात माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे, जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे, संगमनेरचे माजी शहरप्रमुख अमर कतारी, माजी तालुकाप्रमुख भाऊसाहेब हासे यांच्यासह आणखी काही कार्यकर्त्यांचे मनोमिलन झाले. निष्ठावंत शिवसैनिक मातोश्रीचा आदेश अंतिम मानून पक्ष देईल त्याला निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे कतारी यांनी म्हटले आहे. या पार्श्वभूमीवर पक्षातील नाराजांची नाराजी दूर करण्यात वाकचौरे यशस्वी ठरले असले तरी कतारी, हासे आदींवर त्यांनी दाखल केलेल्या केसमध्ये न्यायालयीन खटल्याचे काय? वाकचौरेंसह शिवसेनेतील पक्षश्रेष्ठी या संदर्भात काय भूमिका घेतात, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे.

एकीकडे शिवसेनेने वाकचौरे यांना पुन्हा आपल्या घरात घेत उमेदवारी देण्याची तयारी दर्शविली असली तरी शिर्डी लोकसभा मतदारसंघातील मतदार सातत्याने पक्ष बदलणाऱ्या वाकचौरे यांना स्वीकारणार का असाही प्रश्न या मतदारसंघात निर्माण झाला आहे. मतदारांच्या नाराजीचा फटका वाकचौरे यांना बसू शकतो तसेच महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील या मतदारसंघात काय भूमिका घेतात यावर वाकचौरेंसह भाजप प्रणित उमेदवाराचे भवितव्य अवलंबून असेल.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 625
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

रविवार विशेष लेख — शास्त्रज्ञांविरोधी कट हनीट्रॅपिंगचा

16/08/2026

रविवार विशेष लेख — रामाचं सोंग आणि धर्माचं ढोंग!

09/08/2026

रविवार विशेष लेख ऑगस्ट क्रांती दिन : स्वातंत्र्याच्या मशालीपासून लोकशाहीच्या रक्षणापर्यंत

09/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

युरियाचा काळाबाजार: संगमनेरमध्ये कृषी विभागाची धडक कारवाई; विनाबिल खतविक्री अन् अनधिकृत साठा जप्त

By Annant Ppangarkar19/08/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर: रासायनिक खतांचा काळाबाजार रोखण्यासाठी कृषी विभागाने आक्रमक पावले उचलली असून,…

अवैध धंद्यांवर एलसीबीचा दणका; एकाच दिवसात ११ छापे, गुन्हे दाखल

19/08/2026

बुधवार, १९ ऑगस्ट २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

19/08/2026

संगमनेर तालुक्यात मुलींच्या स्वसंरक्षणासाठी ‘मुक्कामार’ अभियान सुरू; अभिनेत्री इशिता शर्मा व डॉ. जयश्रीताई थोरात यांचा स्तुत्य पुढाकार

18/08/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.