Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

युरियाचा काळाबाजार: संगमनेरमध्ये कृषी विभागाची धडक कारवाई; विनाबिल खतविक्री अन् अनधिकृत साठा जप्त

19/08/2026

अवैध धंद्यांवर एलसीबीचा दणका; एकाच दिवसात ११ छापे, गुन्हे दाखल

19/08/2026

बुधवार, १९ ऑगस्ट २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

19/08/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » एकीकडे भाजपसह हिंदुत्ववादी संघटनांचे आंदोलन सुरू असतानाच जितेंद्र आव्हाड संगमनेरात
आंदोलन

एकीकडे भाजपसह हिंदुत्ववादी संघटनांचे आंदोलन सुरू असतानाच जितेंद्र आव्हाड संगमनेरात

आंदोलनस्थळी एकही वरिष्ठ अधिकारी उपस्थित नाही
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar07/01/2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज

संगमनेर : माजी मंत्री आमदार जितेंद्र आव्हाड रविवारी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात आणि डॉ. अण्णासाहेब शिंदे स्मृती पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी संगमनेरात येत असताना भाजप आणि हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी त्यांना विरोध करीत बस स्थानक चौकात आंदोलन केले. आंदोलकांवरील उपस्थित पोलीस अधिकाऱ्यांचे नियंत्रण सुटल्याने आंदोलकांनी तेथून धाव घेत कार्यक्रमस्थळी जाण्याचा प्रयत्न केला. मात्र जाणता राजा मैदानाकडे जाणाऱ्या मार्गावर असलेल्या पोलिसांनी आंदोलकांना रोखले. त्यामुळे आंदोलकांनी तेथेच नाशिक-पुणे मार्गावर पुन्हा ठिय्या देत महामार्ग रोखला. त्यानंतर आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. यामुळे महामार्गावर बघ्यांची गर्दी जमली होती.

माजी मंत्री आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू श्रीरामाविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर त्यांचा भाजपसह विविध संघटनासह निषेध व्यक्त होत आहे. संगमनेरमध्येही त्यांना विरोध करण्यासाठी आंदोलन करण्यात आले.

हे आंदोलन सुरू असताना स्थानिक एकही वरिष्ठ पोलीस अधिकारी यावेळी उपस्थित नव्हते. दोन उपनिरीक्षकासह पोलीस ताफा असला तरी त्यांना आंदोलकांनी दाद दिली नाही. त्यामुळे आंदोलन बराच वेळ सुरू होते. पोलिसांनी आंदोलकांना रोखण्याचा वारंवार प्रयत्न केला मात्र आंदोलक ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. आंदोलकांनी नंतर संधी साधत आंदोलकांनी कार्यक्रमस्थळी जाण्याचा प्रयत्न केला. दोन्ही ठिकाणी आंदोलकांनी आव्हाड यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

आंदोलक तेथून पळत असताना त्यांना काही अंतरावर मैदानाकडे जाण्याच्या प्रयत्नात अडविण्यात आले. या मार्गावर पुन्हा आंदोलकांनी आंदोलन केले.मात्र त्यानंतर आंदोलकांना ताब्यात घेण्यात आले.

दरम्यान आंदोलकांनी ज्यांना संगमनेरमध्ये येण्यास विरोध दर्शवला ते आमदार जितेंद्र आव्हाड संगमनेरमध्ये आयोजित कार्यक्रमाला उपस्थित होते. त्यामुळे काही वेळ एकीकडे आंदोलन आणि दुसरीकडे आव्हाड यांचा कार्यक्रम स्थळी प्रवेश असे चित्र बघायला मिळाले. या कार्यक्रमात आव्हाड यांनी जोरदार भाषणही केले.

बघा आंदोलनाची छायाचित्रे..

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,846
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेर येथे आदिवासी विद्यार्थ्यांचे अर्धनग्न धरणे आंदोलन सुरुच; जयश्री थोरात यांची आंदोलनस्थळी भेट

17/08/2026

बिरेवाडीत पोल्ट्री शेडवर कारवाईसाठी ग्रामपंचायत कार्यालयासमोर उपोषण सुरु; मांडवे-बिरेवाडी हद्दीतील तीन पोल्ट्रीचा वाद पेटला

14/08/2026

शिक्षणाच्या बाजारीकरणाविरुद्ध ‘छात्र भारती’ आक्रमक; शिक्षण मंत्र्यांविरोधात हजारावर विद्यार्थी रस्त्यावर

11/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

युरियाचा काळाबाजार: संगमनेरमध्ये कृषी विभागाची धडक कारवाई; विनाबिल खतविक्री अन् अनधिकृत साठा जप्त

By Annant Ppangarkar19/08/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर: रासायनिक खतांचा काळाबाजार रोखण्यासाठी कृषी विभागाने आक्रमक पावले उचलली असून,…

अवैध धंद्यांवर एलसीबीचा दणका; एकाच दिवसात ११ छापे, गुन्हे दाखल

19/08/2026

बुधवार, १९ ऑगस्ट २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

19/08/2026

संगमनेर तालुक्यात मुलींच्या स्वसंरक्षणासाठी ‘मुक्कामार’ अभियान सुरू; अभिनेत्री इशिता शर्मा व डॉ. जयश्रीताई थोरात यांचा स्तुत्य पुढाकार

18/08/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.