Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

युरियाचा काळाबाजार: संगमनेरमध्ये कृषी विभागाची धडक कारवाई; विनाबिल खतविक्री अन् अनधिकृत साठा जप्त

19/08/2026

अवैध धंद्यांवर एलसीबीचा दणका; एकाच दिवसात ११ छापे, गुन्हे दाखल

19/08/2026

बुधवार, १९ ऑगस्ट २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

19/08/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » “बापू तेरे रास्ते” महात्मा गांधींवरील भावगीते, भजनांनी संगमनेरातील दिवंगत नेत्याला अनोखी आदरांजली!
सामाजिक

“बापू तेरे रास्ते” महात्मा गांधींवरील भावगीते, भजनांनी संगमनेरातील दिवंगत नेत्याला अनोखी आदरांजली!

जयंती महोत्सव कार्यक्रमाचा समारोप
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar13/01/2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज

संगमनेर – सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या “बापू तेरे रास्ते” या महात्मा गांधींवरील भावगीत, भजनाच्या कार्यक्रमातून भाऊसाहेब थोरात यांना अनोखी आदरांजली वाहण्यात आली. वैष्णव जनते, कानडा राजा पंढरीचा,मोगरा फुलला, मिले सुर मेरा तुम्हारा अशा विविध गीतांमधून परिसर भक्तीरसात न्हावून निघाला.

सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात कारखाना कार्यस्थळावरील प्रेरणास्थळ येथे स्वातंत्र्यसेनानी भाऊसाहेब थोरात यांच्या जयंतीनिमित्त बापू तेरे रास्ते हा भजनांचा कार्यक्रम झाला. यावेळी विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात, ज्येष्ठ विचारवंत मधुकर भावे, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, कांचनताई थोरात, दुर्गाताई तांबे, आमदार सत्यजित तांबे, कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्रीताई थोरात, राजवर्धन थोरात, रणजीतसिंग देशमुख, प्रा. बाबा खरात, कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर आदींसह विविध पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.

नागपूर येथील सुर संगमने सादर केलेल्या “बापू तेरे रास्ते” या भक्तिमय गीतांच्या कार्यक्रमाची सुरुवात तू प्यार का सागर है, या गांधीजींच्या गीताने झाली. सुरभीताई ढोमणे यांनी संत ज्ञानेश्वरांची मोगरा फुलला, मोगरा फुलला ही अभंग रचना गायली. त्यानंतर गायक सारंग जोशी यांनी कानडा राजा पंढरीचा हे गीत सादर केले. तर वैष्णव जन हे गीत सर्वांनी सामूहिक गायले. भक्ती पूर्ण टाळ्यांच्या साथीने रघुपती राघव राजाराम हे भावगीत उपस्थित सर्वांनी एक सूर एक तालात गायले. यानंतर दे दी हमे आजादी बिना खडग,बिना ढाल, हे भावगीत सादर झाले. महात्मा गांधीजींचे विचार या भावगीतांमध्ये निवेदक डॉ. मनोज साल्पेकर यांनी अधिक रंग भरले.

भारत चीन युद्धाचा प्रसंग त्यांनी सांगताना सर्वांच्या अंगावर शहारे आले. तर यावेळी गायलेले ए मेरे वतन के लोगो या गीताने सर्वांच्या डोळ्यात अश्रू आणले. अत्यंत भक्तिमय आणि भावनिक वातावरणात हा भक्ती गीतांचा कार्यक्रम झाला. देशाची एकात्मता आणि अखंडता दाखवणारा मिले सुर, मेरा तुम्हारा हे गीत म्हणत सर्वांनी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त केली.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 464
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेर तालुक्यात मुलींच्या स्वसंरक्षणासाठी ‘मुक्कामार’ अभियान सुरू; अभिनेत्री इशिता शर्मा व डॉ. जयश्रीताई थोरात यांचा स्तुत्य पुढाकार

18/08/2026

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना मरणोत्तर ‘भारतरत्न’ द्या; संगमनेर येथील सोहळ्यात पानिपतकार विश्वास पाटील यांची मागणी

17/08/2026

मातोश्री प्रतिष्ठानतर्फे वृक्षारोपण, वृक्षसंवर्धनातूनच हरित भविष्याची पायाभरणी: आमदार अमोल खताळ

16/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

युरियाचा काळाबाजार: संगमनेरमध्ये कृषी विभागाची धडक कारवाई; विनाबिल खतविक्री अन् अनधिकृत साठा जप्त

By Annant Ppangarkar19/08/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर: रासायनिक खतांचा काळाबाजार रोखण्यासाठी कृषी विभागाने आक्रमक पावले उचलली असून,…

अवैध धंद्यांवर एलसीबीचा दणका; एकाच दिवसात ११ छापे, गुन्हे दाखल

19/08/2026

बुधवार, १९ ऑगस्ट २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

19/08/2026

संगमनेर तालुक्यात मुलींच्या स्वसंरक्षणासाठी ‘मुक्कामार’ अभियान सुरू; अभिनेत्री इशिता शर्मा व डॉ. जयश्रीताई थोरात यांचा स्तुत्य पुढाकार

18/08/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.