Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

अकोले तालुक्यात भीषण स्फोट; मासेमारीसाठी नेण्यात येणाऱ्या स्फोटकांचा दुचाकीवरच स्फोट, एक जण गंभीर जखमी

June 10, 2026

अध्यात्म सांगणे सोपे, पण जगणे कठीण : नंदकुमार पोवार

June 10, 2026

धार्मिक कार्यानंतर नदीत पोहण्यासाठी गेलेल्या दोघांचा बुडून मृत्यू

June 10, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » दारूबंदीसाठी गावात महिला आणि ग्रामस्थांनी उपोषण सुरू करताच ग्रामपंचायतीने तात्काळ घेतला असा काही निर्णय… नळ जोडणी तोडलीच पण रेशनही बंद करण्याचा दिला इशारा!
आंदोलन

दारूबंदीसाठी गावात महिला आणि ग्रामस्थांनी उपोषण सुरू करताच ग्रामपंचायतीने तात्काळ घेतला असा काही निर्णय… नळ जोडणी तोडलीच पण रेशनही बंद करण्याचा दिला इशारा!

अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरJanuary 13, 2024Updated:January 13, 2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज

अहमदनगर : गावातील अवैध दारू विक्री ग्रामपंचायतीने बंद करावी, या मागणीसाठी महिला आणि ग्रामस्थांनी उपोषण सुरू करताच ग्रामपंचायतने तात्काळ अवैध दारू विक्रेत्याची नळजोडणी तोडत त्याचा पाणीपुरवठाच बंद केला. याशिवाय त्याने अवैध दारू विक्री न थांबवल्यास ग्रामपंचायतीने त्याच्या विरोधात तीव्र कारवाई करण्याचा मानस व्यक्त केल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले.

संगमनेर तालुक्यातील सावरगाव घुले या गावांमध्ये सुरू असलेली अवैध दारू विक्री बंद करावी, यासाठी महिलांनी दारू विक्रेत्याच्या घरावर मोर्चा काढला. मात्र याचा अवैध दारू विक्रेत्यावर कोणताही परिणाम झाला नाही त्यामुळे अखेरीस महिला आणि ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीने दारूबंदी करण्याच्या मागणीसाठी शनिवारी आमरण उपोषणच सुरू केले होते.

त्यामुळे उपसरपंच नामदेव घुले, ग्रामसेवक प्रमोद जाधव यांनी उपोषणार्थी महिला, ग्रामस्थांची समजूत काढली. यावेळी महिला आणि ग्रामस्थांनी आपला संताप व्यक्त केला. गावात सुरू असलेली ही अवैध दारू विक्री बंद करावी यासाठी ग्रामपंचायतच्यावतीने वारंवार संबंधिताला नोटीसा देण्यात आल्या होत्या. तसेच राज्य उत्पादन शुल्क विभागानेही कारवाई करून देखीलही दारू विक्री सुरूच होती. त्यामुळे ग्रामपंचायतनेच कठोर निर्णय घेत अवैध दारू विक्री करणाऱ्या कुटुंबाची नळ जोडणी तात्काळ तोडली असल्याचे उपोषणकर्त्यांना सांगितले.

संबंधित दारू विक्रेत्याने यानंतर पुन्हा दारू विक्री केल्यास त्याचं रेशनही बंद करण्याचा इशारा ग्रामपंचायतच्यावतीने देण्यात आला आहे. याशिवाय विक्रेत्याने दारू विक्री स्वतःहून बंद केल्यास त्याचं शासकीय जागेतील अतिक्रमण देखील जमीन दोस्त करण्याचा निर्णय येथील ग्रामस्थांनी घेतला आहे.

संबंधितांनी दारू विक्री बंद न केल्यास ग्रामपंचायत च्या वतीने त्यांच्या सर्व सुविधा बंद केल्या जाणार असल्याचे माहिती उपसरपंच नामदेव घुले यांनी दिली.

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 1,568
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

संगमनेरमधील भेसळखोरांना कोणाचे अभय? तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईनंतरही संगमनेरचे अन्न व औषध प्रशासन सुस्तच! शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपजिल्हाप्रमुख अमर कतारी यांचा प्रशासनाला सवाल; आंदोलनाचा इशारा

June 9, 2026

मालपाणी बजाज शोरूममधील मारहाण प्रकरण: आरोपींच्या अटकेसाठी संगमनेर प्रशासकीय भवनावर मोर्चा; तीव्र आंदोलनाचा इशारा

June 6, 2026

संगमनेर पालिकेच्या कारवाई विरोधात शिंदे शिवसेना आक्रमक; भाजीची पाटीच मुख्याधिकाऱ्यांच्या दालनात नेत नगरसेविका साक्षी सूर्यवंशींचे ‘गांधीगिरी’ आंदोलन

June 3, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
महाराष्ट्र संवाद विशेष

अकोले तालुक्यात भीषण स्फोट; मासेमारीसाठी नेण्यात येणाऱ्या स्फोटकांचा दुचाकीवरच स्फोट, एक जण गंभीर जखमी

By अनंत पांगारकरJune 10, 20260

अकोले: अकोले तालुक्यातील औरंगपूर फाटा येथे आज दुपारी एक अत्यंत धक्कादायक आणि भीषण स्फोट झाल्याची…

अध्यात्म सांगणे सोपे, पण जगणे कठीण : नंदकुमार पोवार

June 10, 2026

धार्मिक कार्यानंतर नदीत पोहण्यासाठी गेलेल्या दोघांचा बुडून मृत्यू

June 10, 2026

आज बुधवार, १० जून २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

June 10, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.