Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

नव्या पोलीस अधीक्षकांनी जिल्हा पोलीस दलात केले मोठे फेरबदल, अधिकाऱ्यांच्या जिल्ह्यांतर्गत बदल्याचे गॅझेट बाहेर

June 11, 2026

संगमनेर नजीकच्या आढा ओढ्यात अज्ञात व्यक्तीचा जळालेला मृतदेह आढळल्याने खळबळ; पोलिसांकडून ओळख पटविण्याचे काम सुरू!

June 11, 2026

सराईत गुन्हेगार राहुल सोनवणे स्थानबद्ध; ‘एमपीडीए’ अंतर्गत संगमनेर पोलिसांची मोठी कारवाई

June 11, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » प्रदीर्घ लढा देणाऱ्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या संपात अखेर तोडगा
Uncategorized

प्रदीर्घ लढा देणाऱ्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या संपात अखेर तोडगा

अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरJanuary 25, 2024Updated:January 25, 2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज

मुंबई – महिला बाल विकास आयुक्त रुबल अग्रवाल व अन्य अधिकाऱ्यांसोबत अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडल्यानंतर ५२ दिवसाच्या प्रदीर्घ लढ्यानंतर अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या संपात अखेर तोडगा निघाला आहे. या बैठकीत कर्मचाऱ्यांच्या बहुतांशी मागण्या मान्य करण्यात आल्या आहे. शासनाच्या सकारात्मक भूमिकेमुळे तसेच ग्रॅच्युएटी व पेन्शनचा महत्त्वाचा निर्णय होत असल्याने अंगणवाडी कर्मचारी कृती समितीने आपला संप मागे घेतला.

सचिव आणि आयुक्तांसोबत झालेल्या आजच्या बैठकीला एम. ए. पाटील, ॲड. निशा शिवूरकर, शुभा शमीम, दिलीप उटणे, दत्ता देशमुख, सुवर्णा तळेकर, आप्पा पाटील, ॲड. माधुरी क्षीरसागर आदी उपस्थित होते.

Advt

अंगणवाडी कर्मचाऱ्यांसाठी पेन्शन योजनेचा अंतिम प्रस्ताव तातडीने तयार करण्याचे शासनाने मान्य केले असून लवकरात लवकर हा प्रस्ताव मंत्रिमंडळात मंजुरीसाठी मांडला जाईल असे सांगण्यात आले. तसेच कृती समितीच्या वतीने पेन्शन योजनेबाबत ठोस सुधारणांचा लेखी प्रस्ताव देण्यात आला.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे या बैठकीत ग्रॅच्युइटी देण्याचे मान्य करण्यात आले आहे. तसेच मोबाईल देखील तात्काळ दिले जातील. मिनी अंगणवाडी सेविकांना पूर्ण अंगणवाडी सेविका पदाचे आदेश त्वरित देणार असल्याचे सांगण्यात आले.

संप काळात कामावरून कमी केलेल्या कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर घेण्याचे मान्य करण्यात आले असून कर्मचाऱ्यांवरील कारवाई आदेश मागे घेतले जाणार असल्याचे बैठकीत मान्य करण्यात आले आहे.

संप काळ, कोरोना काळात राहिलेल्या दिवाळी व उन्हाळी सुट्टी समायोजित करण्याबाबत सकारात्मक विचार केला जाणार आहे. दहावी पास मदतीसांना थेट सेविकापदी नियुक्ती देण्यासंदर्भात या बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे.

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 1,486
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

नव्या पोलीस अधीक्षकांनी जिल्हा पोलीस दलात केले मोठे फेरबदल, अधिकाऱ्यांच्या जिल्ह्यांतर्गत बदल्याचे गॅझेट बाहेर

June 11, 2026

उज्ज्वला योजनेतील लाभार्थ्यांना मोठा झटका; अनुदानित गॅस सिलिंडरची संख्या ९ वरून थेट ४ वर

June 9, 2026

तुकाराम मुंडेंचा आदेश अन् अहिल्यानगरमध्ये धडक कारवाई! नामांकित ब्रँड्सचे लाखो रुपयांचे अन्नपदार्थ जप्त

June 3, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
प्रशासन

नव्या पोलीस अधीक्षकांनी जिल्हा पोलीस दलात केले मोठे फेरबदल, अधिकाऱ्यांच्या जिल्ह्यांतर्गत बदल्याचे गॅझेट बाहेर

By अनंत पांगारकरJune 11, 20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन अहिल्यानगर – अहिल्यानगर जिल्हा पोलीस दलात गुरुवारी (दि. ११ जून) मोठे…

संगमनेर नजीकच्या आढा ओढ्यात अज्ञात व्यक्तीचा जळालेला मृतदेह आढळल्याने खळबळ; पोलिसांकडून ओळख पटविण्याचे काम सुरू!

June 11, 2026

सराईत गुन्हेगार राहुल सोनवणे स्थानबद्ध; ‘एमपीडीए’ अंतर्गत संगमनेर पोलिसांची मोठी कारवाई

June 11, 2026

आयुष्याचा उत्सव साजरा करता आला पाहिजे : निवृत्त आयएएस अधिकारी इंद्रजीत देशमुख

June 11, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.