Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

अहिल्यानगर जिल्हा बँकेसाठी संगमनेर तालुक्यातून शिवसेनेचे तीन उमेदवार मैदानात — यांनी केले अर्ज दाखल

05/10/2026

मोठी घडामोड: संगमनेर तालुका दूध उत्पादक संघाच्या चेअरमनपदाचा देशमुख यांचा राजीनामा, नवे चेअरमन कोण? तर विधानपरिषद सभापती राम शिंदे जिल्हा बँकेची निवडणूक लढविणार नाही

05/10/2026

अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या रणधुमाळीत मोठा ट्विस्ट: संगमनेरमधून यांची उमेदवारी फायनल; बाळासाहेब थोरातांच्या भूमिकेकडे जिल्ह्याचे सर्वांचे लक्ष!

05/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » आमदार बाळासाहेब थोरात यांच्या वाढदिवसानिमित्त संगमनेरमध्ये चार दिवस साकारणार अमोल कोल्हे यांच्या मुख्य भूमिकेतील “शिवपुत्र संभाजी” महानाट्य!
सामाजिक

आमदार बाळासाहेब थोरात यांच्या वाढदिवसानिमित्त संगमनेरमध्ये चार दिवस साकारणार अमोल कोल्हे यांच्या मुख्य भूमिकेतील “शिवपुत्र संभाजी” महानाट्य!

Annant PpangarkarBy Annant Ppangarkar29/01/2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज

संगमनेर – काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या वाढदिवसानिमित्त ४ ते ७ फेब्रुवारी दरम्यान दररोज खासदार डॉ. अमोल कोल्हे यांची प्रमुख भूमिका असलेले “शिवपुत्र संभाजी” हे महानाट्य संगमनेरकरांना बघावयास मिळणार आहे.

येथील जाणता राजा मैदानावर दररोज संध्याकाळी सहा वाजता या महानाट्याचे प्रयोग होणार असून या महानाट्याचे प्रयोग संगमनेरकरांना मोफत बघावयास मिळणार आहे. या महानाट्याची जाणता राजा मैदानावर जय्यत तयारी सुरू आहे.

या भव्य दिव्य महानाट्यात खासदार डॉ. अमोल कोल्हे हे संभाजी महाराजांच्या मुख्य भूमिकेत असून महाराणी येसूबाईच्या भूमिकेत स्नेहलता वसईकर, अनाजी पंतांच्या भूमिकेत महेश कोकाटे, कवी कलशांच्या भूमिकेत अजय तपकिरे, सेनापती हंबीररावच्या भूमिकेत रमेश रोकडे तर दिलेरखान आणि मुकर्रबखानाच्या दुहेरी भूमिकेत विश्वजीत फडतेंसोबत अनेक सिनेकलावंतांचा सहभाग यात असणार आहे.

तडाखेबाज संवाद, १२० फुटी भव्यदिव्य किल्ल्याचा रंगमंच, खरी खुरी लढाई, हत्ती, घोडे आणि बैलगाड्यांचा वापर, २६ फुटी जहाजावरून जंजिरा मोहीम, चित्तथरारक घोडेस्वारी, संपूर्ण मैदानाचा रंगमंच म्हणून वापर सोबत १५० पेक्षा जास्त कलाकार सहभागी होणार आहेत.

निळवंडे धरण व कालव्याचे निर्माते काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते आमदार थोरात यांनी राज्य मंत्रिमंडळात महसूल, कृषी, शालेय शिक्षण, पाटबंधारे, राज शिष्टाचार, जलसंधारण असे विविध महत्त्वाचे खाते भूषवले असून या सर्व खात्यांना लोकाभिमुख बनवले. याचबरोबर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, वर्किंग कमिटीचे सदस्य, विधिमंडळ पक्षनेते या जबाबदाऱ्या यशस्वीरित्या सांभाळताना संगमनेर तालुक्याला विकासाचे मॉडेल बनवले आहे.

दुष्काळी भागासाठी निळवंडे धरण व कालवे पूर्ण करून दुष्काळी भागाला पाणी दिल्याने ते महाराष्ट्राचे खरे जलनायक ठरले आहे. अत्यंत साध्या पद्धतीने आमदार थोरात यांनी कायम वाढदिवस केला असून यावर्षी लोकनेते बाळासाहेब थोरात मित्र मंडळाच्यावतीने या महानाट्याचे आयोजन करण्यात आले आहे.

महानाट्य बघण्यासाठी गटवर आणि वॉर्डनिहाय नियोजन… 

४ फेब्रुवारी – जिल्हा परिषद घुलेवाडी व साकुर गट, संगमनेर शहरातील प्रभाग क्रमांक १, २, व ५.

५ फेब्रुवारी – जिल्हा परिषद वडगाव पान व संगमनेर खुर्द गट, शहरातील प्रभाग क्रमांक ३, ४ व ६

६ फेब्रुवारी – जिल्हा परिषद आश्वी, जोर्वे व समनापुर गट, शहरातील प्रभाग क्रमांक ७, ८, ९ व १०.

७ फेब्रुवारी – जिल्हा परिषद धांदरफळ व बोटा गट, शहरातील प्रभाग क्रमांक ११, १२, १३ व १४. अशा पद्धतीचे नियोजन असून त्यासाठीचे पासेस उपलब्ध करून दिले जाणार आहेत.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 677
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेर ड्रग्ज प्रकरणातील सत्य जनतेसमोर आणा; सोशल मीडियावरील ‘मीडिया ट्रायल’ त्वरित थांबवा! — काँग्रेस कार्याध्यक्ष अमोल शेलकर यांचे पोलीस प्रशासनाला आवाहन; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन पारदर्शक चौकशीचे पुरावे मांडण्याची मागणी

24/09/2026

संगमनेर शहरात वाहतूक कोंडीचा बोजवारा: बेशिस्त रिक्षाचालक, फुटपाथवरील अतिक्रमणे अन् अवैध पार्किंगमुळे नागरिक त्रस्त; पोलीस प्रशासन ढिम्म

24/09/2026

‘संगमनेर फेस्टिव्हल’ हा संगमनेरकरांचा सांस्कृतिक मानबिंदू : मनीष मालपाणी १८ व्या संगमनेर फेस्टिव्हलचा सांगता सोहळा उत्साहात; विनोदी नाटकाने प्रेक्षकांना हसवले मनमुराद

22/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
निवडणूक

अहिल्यानगर जिल्हा बँकेसाठी संगमनेर तालुक्यातून शिवसेनेचे तीन उमेदवार मैदानात — यांनी केले अर्ज दाखल

By Annant Ppangarkar05/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- महायुती व महाविकास आघाडीने शिवसेनेला विश्वासात न घेता निवडणूक बिनविरोध करण्याचे…

मोठी घडामोड: संगमनेर तालुका दूध उत्पादक संघाच्या चेअरमनपदाचा देशमुख यांचा राजीनामा, नवे चेअरमन कोण? तर विधानपरिषद सभापती राम शिंदे जिल्हा बँकेची निवडणूक लढविणार नाही

05/10/2026

अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या रणधुमाळीत मोठा ट्विस्ट: संगमनेरमधून यांची उमेदवारी फायनल; बाळासाहेब थोरातांच्या भूमिकेकडे जिल्ह्याचे सर्वांचे लक्ष!

05/10/2026

संगमनेरमध्ये पालकमंत्री विखे पाटलांचा अधिकाऱ्यांना इशारा: दुष्काळात कामात हलगर्जीपणा चालणार नाही; पशुसंवर्धन विभागाला नोटीस

05/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.