Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

रविवार विशेष लेख— शिवसेना काल आज आणि उद्या

04/10/2026

रविवार विशेष लेख — फुले-आंबेडकर साहित्याला विष संबोधणारे बौद्धिक दलाल

04/10/2026

रविवार विशेष लेख — अस्थी नदीत विसर्जित करण्याऐवजी स्मृतींचे झाड लावू या!

04/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » निमा उपक्रम | ‘नव्या युगाचे आर्थिक नियोजन’, शंभर लाख कोटींचा होईल म्युच्युअल फंड उद्योग: सुनील कडलग
सामाजिक

निमा उपक्रम | ‘नव्या युगाचे आर्थिक नियोजन’, शंभर लाख कोटींचा होईल म्युच्युअल फंड उद्योग: सुनील कडलग

Annant PpangarkarBy Annant Ppangarkar01/02/2024No Comments4 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज 

सिन्नर -चीनच्या ‘ग्लोबल टाइम्स’मध्ये भारताच्या प्रगतीची प्रशंशा करताना फुदान विद्यापीठातील सेंटर फॉर साउथ एशियन स्टडीचे संचालक झांग जियाडोंग यांनी भारताचा जगात वेगाने वाढणाऱ्या प्रमुख अर्थव्यवस्थांपैकी एक असा उल्लेख करत ‘भारत खरंच एक मोठी शक्ती’ असं म्हटलंय. वेगाने विकसित होणाऱ्या या भारतातील म्युच्युअल फंड उद्योगानेही ५० लाख कोटींचा टप्पा नुकताच पार केला असून या उद्योगाची भविष्यकालीन वाटचाल येत्या तीन ते चार वर्षात शंभर लाख कोटींची होईल, असा आशावाद कडलग इन्व्हेस्टमेंटचे संचालक सुनील कडलग यांनी व्यक्त केला.

निमाचे अध्यक्ष धनंजय बेळे व मानद सचिव राजेंद्र अहिरे यांच्या पुढाकाराने नाशिक इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (निमा) सिन्नर आयोजित “नव्या युगाचे आर्थिक नियोजन” या विषयावर चर्चासत्र पार पडले. यावेळी कडलग बोलत होते.

व्यासपीठावर सुधीर बडगुजर, किरण वाजे, एस. के. नायर, प्रवीण वाबळे, सुभाष कदम, एडलवाईज म्युच्युअल फंडाचे शाखाधिकारी यज्ञेश मराठे, एन. जे. इंडिया इन्व्हेस्ट प्रायव्हेट लिमिटेडचे मनीष पाटील उपस्थित होते. प्रास्ताविकात एस. के. नायर यांनी कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट करताना व्यवसायाच्या धावपळीत उद्योजकांचे आपल्या वैयक्तिक आर्थिक नियोजनाच्या संदर्भात दुर्लक्ष होते. आर्थिक नियोजनाची योग्य दिशा मिळावी म्हणून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याचे सांगितले.

कडलग म्हणाले, देश हा अमृत काळाचा अनुभव घेत असून पुढील वीस वर्ष ही भारताची आहेत. भारत हा तरुणांचा देश असून भारताचे वय सरासरी २८.४ आहे. भारताची युवकांची लोकसंख्या ६८ टक्केहून अधिक आहे. भारतातील युवक अधिकाधिक खर्च करतात. त्यामुळे कंपन्यांचा नफा वाढून शेअर बाजार वाढत आहे. त्याचा अनुकूल परिणाम भारतीय अर्थव्यवस्था वृद्धी दरावर व गुंतवणूकदारांच्या संपत्तीत वेगाने वाढीवर होतो. शिवाय ज्या देशात खर्च होतो, तोच देश संपत्ती निर्माण करतो. म्हणूनच भविष्यात गुंतवणूकदार म्युच्युअल फंडाच्या माध्यमातून संपत्ती निर्माण करतील.

उद्योजक हा जगाचा पोशिंदा असून भारताच्या आर्थिक वृद्धी दरात भर घालणारा महत्त्वपूर्ण घटक आहे. आपल्या पैशांतून आपण झोपेत असतानाही अर्थवृद्धीचे काम झाले पाहिजे. अमेरिका आणि चीनचा इतिहास बघता त्या देशांत अडीच ते पाच ट्रिलियन डॉलरच्या प्रवासात त्या देशांच्या अर्थव्यवस्थेचा विकास झाला. तोच ट्रेंड आता भारतात पाहायला मिळत आहे. भारतातील म्युच्युअल फंड उद्योगाने ५० लाख कोटींचा टप्पा ओलांडला असून या उद्योगाची आश्वासक वाटचाल शंभर लाख कोटींकडे चालू आहे. अर्थव्यवस्था ३.७ ट्रिलीयन डॉलरची असून २ वर्षांत ती ५ ट्रिलीयन डॉलरवर जाईल, आणि २०३० पर्यंत भारतीय अर्थव्यवस्था सात ट्रिलियन डॉलरपर्यंत पोहोचेल, असा आशावाद केंद्र सरकारने व या क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

भविष्यात भारताचा आर्थिक वृद्धी दर ७% पेक्षा अधिक असेल व जगाच्या तुलनेत असा वृद्धीदर असणारा भारत आश्वासकरीत्या तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था म्हणून पुढे येईल. ज्या देशाचा आर्थिक वृद्धीदर अशा प्रकारचा असतो त्याचा उपयोग कंपन्यांची नफा क्षमता वाढण्यात होतो व वाढलेला नफा इक्विटीच्या माध्यमातून गुंतवणूकदारांना संपत्ती निर्माण करून देतो. त्यामुळे भारत तिसरी आर्थिक महासत्ता म्हणून लवकरच उदयास येईल. महागाईवर मात करणारी गुंतवणूक करून आपल्या ध्येयांना आणि स्वप्नांना अर्थ प्राप्त करून देणारी श्रीमंती प्रत्यक्षात उतरविण्यासाठी प्रत्येक भारतीयाने इक्विटीमध्ये गुंतवणूक करावी.

आर्थिक उद्दिष्टे साध्य करण्यास म्युच्युअल फंड, एसआयपी, शेअर मार्केट, आपत्कालीन निधीसाठी लिक्विड फंड, जीवन संरक्षणासाठी टर्म इन्शुरन्स, आरोग्य विमा, अपघात विमा यांचा प्राधान्याने विचार करणे गरजेचे आहे. आर्थिक नियोजनात आरोग्य विमा नसेल तर अचानक गंभीर आजारपण आल्यावर आपली उपलब्ध सर्व बचत व गुंतवणूक त्यात खर्ची पडू शकते. आर्थिक नियोजनात आयुर्विम्याचे व अपघाती विम्याचे कवच घेतल्यास कुटुंबातील कमावत्या व्यक्तीच्या आकस्मिक निधन किंवा अपघाती कायमस्वरूपी अपंगत्वामुळे येणारे आर्थिक संकटावर मात करणे शक्य होते.

सध्या गुंतवणूकदार १७ हजार करोडहून अधिक रक्कम प्रतिमाह एसआयपीतून म्युच्युअल फंडात गुंतवतात. उद्योजक हा स्वतःच्या व्यवसायामध्ये प्रामुख्याने पैसा अडकवतो. आपल्या व्यवसायाच्या व्यतिरिक्त अनेक विविध व्यवसायांनी भारताच्या अर्थव्यवस्थेत मोलाचे योगदान दिलेले आहे ते व्यवसाय सुद्धा अनेक पटींनी वाढले आहेत. आपल्याच व्यवसायाबरोबर गुंतवणुकीच्या माध्यमातून आपण भारताला वेगवान अर्थव्यवस्था म्हणून पुढे आणणाऱ्या व्यवसायाचे भागीदार गुंतवणुकीच्या माध्यमातून होऊ शकतो आणि त्या नफ्याचा लाभ घेऊ शकतो. म्हणूनच म्युच्युअल फंडांच्या माध्यमातून गुंतवणूक करणे आवश्यक आहे.

विश्वजित निकम, अनिल सरवार, मिलिंद इंगळे, व्ही वाय वांद्रे, संजय पवार, अरुण खालकर, दत्तात्रय नवले, संतोष भामरे, विजय गोडगे, कैलास इप्पर, उमेश पवार, विजय विघे, राकेश गोजरे, ऋषिकेश आरोटे, सुदर्शन आव्हाड, दारुंटे साहेब, रावसाहेब सोनवणे आदी उद्योजकांनी विचारलेल्या प्रश्नांना कडलग व यज्ञेश मराठे यांनी उत्तरे दिली. सूत्रसंचालन प्रवीण वाबळे व आभार किरण वाजे यांनी मानले.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 552
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेर ड्रग्ज प्रकरणातील सत्य जनतेसमोर आणा; सोशल मीडियावरील ‘मीडिया ट्रायल’ त्वरित थांबवा! — काँग्रेस कार्याध्यक्ष अमोल शेलकर यांचे पोलीस प्रशासनाला आवाहन; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन पारदर्शक चौकशीचे पुरावे मांडण्याची मागणी

24/09/2026

संगमनेर शहरात वाहतूक कोंडीचा बोजवारा: बेशिस्त रिक्षाचालक, फुटपाथवरील अतिक्रमणे अन् अवैध पार्किंगमुळे नागरिक त्रस्त; पोलीस प्रशासन ढिम्म

24/09/2026

‘संगमनेर फेस्टिव्हल’ हा संगमनेरकरांचा सांस्कृतिक मानबिंदू : मनीष मालपाणी १८ व्या संगमनेर फेस्टिव्हलचा सांगता सोहळा उत्साहात; विनोदी नाटकाने प्रेक्षकांना हसवले मनमुराद

22/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
रविवार विशेष

रविवार विशेष लेख— शिवसेना काल आज आणि उद्या

By Annant Ppangarkar04/10/20260

बाळासाहेब घोडके- शिवसेना हे चार अक्षरी नाव उच्चारताच मनात एक झंझावात उभा राहतो. वंदनीय बाळासाहेब…

रविवार विशेष लेख — फुले-आंबेडकर साहित्याला विष संबोधणारे बौद्धिक दलाल

04/10/2026

रविवार विशेष लेख — अस्थी नदीत विसर्जित करण्याऐवजी स्मृतींचे झाड लावू या!

04/10/2026

चंदनापुरी येथे ‘वसुंधरा पायी दिंडी’चे स्वागत व वृक्षारोपण— बदलत्या हवामानावर मात करण्यासाठी प्रत्येकाने झाड लावून संवर्धन करावे: आमदार अमोल खताळ

03/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.