Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

गुरुवार, १५ ऑक्टोंबर — आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या!

15/10/2026

संगमनेरच्या बाजारपेठेला मोठा दिलासा, दुष्काळाच्या संकटातही थोरात कारखान्याचा मोठा निर्णय; कामगारांना मिळणार इतका बोनस अन् सानुग्रह अनुदान; ऊस उत्पादकांना प्रतिटन एवढी मदत! लोकनेते बाळासाहेब थोरात यांची घोषणा

14/10/2026

रस्त्यावरील वादातून मारहाण, जीवे मारण्याची धमकी; संगमनेर न्यायालयाने सुनावली ही शिक्षा

14/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » दलबदलू म्हणून प्रसिद्ध असलेल्या विखेंनी इतरांना पक्षनिष्ठा शिकवू नये: सोमेश्वर दिवटे
राजकारण

दलबदलू म्हणून प्रसिद्ध असलेल्या विखेंनी इतरांना पक्षनिष्ठा शिकवू नये: सोमेश्वर दिवटे

म्हाळुंगी पुलासाठी विखे यांचे कोणतेही योगदान नाही...
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar22/02/2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर – सत्तेसाठी वारंवार पक्ष बदलणाऱ्या विखे घराण्याचा पक्ष बदलांचा इतिहास मोठा आहे. त्यामुळे दल बदलून प्रसिद्ध असलेल्या मंत्री विखे यांनी पक्षनिष्ठेबाबत इतरांना न शिकविता स्वतः आत्मपरीक्षण करावे. आत्तापर्यंत काँग्रेसच्या जिवावर मोठ्या झालेल्या विखेंनी ज्या आईने वाढविले तिला शिव्या देण्यासारखे काम केले असल्याचे टीका काँग्रेसचे शहराध्यक्ष सोमेश्वर दिवटे यांनी केली आहे.

दिवटे म्हणाले, काँग्रेस, समाजवादी काँग्रेस, शिवसेना, काँग्रेस, भाजपा असा वेगवेगळ्या पक्षांचा प्रवास करणाऱ्या विखेंनी पक्षनिष्ठा किंवा विचार याबाबत राज्यात कुठेही बोलू नये. कारण पक्षबदलूमध्ये राज्यात पहिला क्रमांक हा विखे घराण्याचा लागतो.

२०१९ पर्यंत भाजपा व मोदी यांच्यावर विखे टीका करत होते मात्र असा त्यांना कोणता साक्षात्कार झाला की आज त्यांना मोदी विश्वगुरू वाटत आहेत. पुन्हा महाविकास आघाडीची सत्ता येताच विखे भाजपला सोडचिठ्ठी देऊन काँग्रेसमध्ये येण्यासाठी प्रयत्न करतील हे सर्वश्रुत आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री असताना संगमनेर तालुक्यातील विकास कामे आडवून ठेवणे हा एकमेव उद्योग त्यांनी केला आहे. म्हाळुंगी पुलाच्या कामासाठी काँग्रेस पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी निधी मिळवला. मात्र स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या मागणीवरून मंत्री विखे यांनी हे काम रखडविले.

अचानक बाळासाहेब विखे यांचे नाव देण्याचा घाट घातला गेला. अजून त्या पुलाला सुरुवातही झाली नाही. भूमिपूजन प्रसंगीच नाव देण्याचा हा पहिला प्रकार घडला आहे. याला स्थानिकांनी मोठ्या प्रमाणात विरोध केला मात्र हा विरोध प्रशासन व पोलिसांनी दडपून टाकण्याचा प्रयत्न केला. यामुळे संगमनेरमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली.

विकास कामे करायचीच आहे. तर राहता मतदार संघ तिकडे वाट पाहतो आहे. नगर-मनमाड हायवे हा गचक्यांचा हायवे म्हणून प्रसिद्ध झाला आहे. हे सगळे सोडून महसूल मंत्री फक्त संगमनेरभोवती घिरट्या घालत आहे.

संगमनेर तालुका हा कायम काँग्रेस विचारांचा बालेकिल्ला राहिला असून महाराष्ट्र हा पुरोगामी विचारांचा राहिला आहे. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा वारसा सांगणाऱ्या महाराष्ट्राने कधीही गद्दारीला माफी केली नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.

म्हाळुंगी पुलासाठी विखे यांचे कोणतेही योगदान नाही…

ऑक्टोबर २०२२ मध्ये म्हाळुंगी पूल खचल्यानंतर विखे तिकडे फिरकलेही नाही. भाजपच्या कोणत्याही पदाधिकाऱ्याने जनतेला दिलासा दिला नाही. उलट चालू कामांमध्ये खोडा घालण्याचे काम केले. पूलाचे फक्त राजकारण केले. आमदार बाळासाहेब थोरात यांच्या पाठपुराव्याने मंजूर झालेल्या पुलाच्या भूमिपूजनाचा समारंभ हा म्हणजे आयत्या पिठावर रेघोट्या असा प्रकार झाल्याने नागरिकांनी विरोध केला असल्याचे स्थानिक नागरिकांनी म्हटले आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 1,515
आमदार बाळासाहेब थोरात म्हाळुंगी पूल राधाकृष्ण विखे सोमेश्वर दिवटे
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत कधी मिळणार? आमदार अमोल खताळांनी दिली ही माहिती

13/10/2026

संगमनेर आगारात आणखी पाच इलेक्ट्रिक शिवाई बसेस; जिल्ह्यांतर्गत मार्गांवर धावणार

12/10/2026

दिल्लीतील भव्य आंदोलनात बाळासाहेब थोरात यांचा सहभाग: लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी मुख्य निवडणूक आयुक्तांचा राजीनामा आवश्यक

12/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राशिभविष्य

गुरुवार, १५ ऑक्टोंबर — आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या!

By Annant Ppangarkar15/10/20260

आजचे राशिभविष्य- मेष – घरात शुभ कार्याचे आयोजन होईल. वाहन विषयक काम मार्गी लागेल. एखादी…

संगमनेरच्या बाजारपेठेला मोठा दिलासा, दुष्काळाच्या संकटातही थोरात कारखान्याचा मोठा निर्णय; कामगारांना मिळणार इतका बोनस अन् सानुग्रह अनुदान; ऊस उत्पादकांना प्रतिटन एवढी मदत! लोकनेते बाळासाहेब थोरात यांची घोषणा

14/10/2026

रस्त्यावरील वादातून मारहाण, जीवे मारण्याची धमकी; संगमनेर न्यायालयाने सुनावली ही शिक्षा

14/10/2026

माझं गाव माझा अभिमान… राजापूर

14/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.