नवी दिल्ली, २५ फेब्रुवारी
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुढचे तीन महिने पंतप्रधान नरेंद्र मोदी “मन की बात” करणार नाही. असे पंतप्रधान मोदी यांनी आज ११० व्या कार्यक्रमात देशाला संबोधित करताना सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बात कार्यक्रमाचा ११० वा भाग रविवारी सकाळी ११ वाजता प्रसारित करण्यात आला, यावेळी त्यांनी ही घोषणा केली. पंतप्रधान मोदी प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी “मन की बात” करत असतात ऑल इंडिया रेडिओच्या ५०० हून अधिक प्रसारण केंद्रांद्वारे हा कार्यक्रम प्रसारित केला जातो.
या कार्यक्रमाची सुरुवात ३ ऑक्टोबर २०१४ रोजी करण्यात आली होती. भारतीय समाजातील महिला, वृद्ध आणि तरुणांना समाविष्ट करून विविध घटकांशी जोडणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे. या कार्यक्रमच्या माध्यमातून पंतप्रधान सरकारी उपक्रम, धोरणे आणि कल्याणकारी योजनांची माहिती प्रसारित करतात.
२२ स्थानिक भाषा तसेच फ्रेंच, नी, इंडोनेशियन, तिबेटी, बर्मी, बलुची, अरबी, पश्तू, पर्शियन, दारी आणि स्वाहिली यासह ११ परदेशी भाषांमध्ये हा कार्यक्रम प्रसारित केला जातो. भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांचं देशातील मोठ्या संख्येने लोक या कार्यक्रमाची जोडले गेले आहे.
रविवारच्या ११० व्या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी म्हणाले, देशातील महिला शक्ती प्रत्येक क्षेत्रात प्रगतीच्या नवनवीन शिखरांना स्पर्श करत आहेत. काही दिवसांनी (८ मार्च) आपण महिला दिन साजरा करू. हा विशेष दिवस म्हणजे देशाच्या विकासाच्या प्रवाहात महिला शक्तीच्या योगदानाला सलाम करण्याची संधी आहे. महिलांना समान संधी मिळाल्यावरच जग समृद्ध होईल, असे महान कवी भरथियारजी यांनी म्हटले असल्याचे ते म्हणाले. आयएफएफसीओ व्यतिरिक्त, अनेक खत कंपन्या ‘लखपती दीदी’ सारख्या बचत गट योजनांमध्ये काम करणाऱ्या महिलांना सक्षम करण्यासाठी पुढे आल्या असल्याचेही ते म्हणाले.
मात्र पुढील तीन महिने “मन की बात” कार्यक्रम होणार नसल्याचे स्पष्ट करत पंतप्रधानांनी आगामी लोकसभा निवडणुकीचे संकेत दिल्याने निवडणुकीची आचारसंहिता आता कोणत्याही क्षणी लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
पंतप्रधान मोदी आता पुढचे तीन महिने “मन की बात” करणार नाही
नव्या वर्षातील होता दुसरा कार्यक्रम

