Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

रविवार विशेष लेख — फुले-आंबेडकर साहित्याला विष संबोधणारे बौद्धिक दलाल

04/10/2026

रविवार विशेष लेख — अस्थी नदीत विसर्जित करण्याऐवजी स्मृतींचे झाड लावू या!

04/10/2026

चंदनापुरी येथे ‘वसुंधरा पायी दिंडी’चे स्वागत व वृक्षारोपण— बदलत्या हवामानावर मात करण्यासाठी प्रत्येकाने झाड लावून संवर्धन करावे: आमदार अमोल खताळ

03/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » शहर, तालुक्यातील अवैध धंदे बंद करण्याच्या मागणीसाठी नाशकात आयजी कार्यालयासमोर शिवसेनेचे (उबाठा) माजी शहरप्रमुख करणार आंदोलन…
सामाजिक

शहर, तालुक्यातील अवैध धंदे बंद करण्याच्या मागणीसाठी नाशकात आयजी कार्यालयासमोर शिवसेनेचे (उबाठा) माजी शहरप्रमुख करणार आंदोलन…

Annant PpangarkarBy Annant Ppangarkar02/03/2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर, दि. २
संगमनेर शहर व तालुका हद्दीतील सर्वच प्रकारचे अवैध धंदे ५ मार्चपर्यंत बंद न झाल्यास नाशिकला विशेष पोलीस महानिरीक्षकांच्या कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा शिवसेना (ठाकरे) गटाचे माजी शहरप्रमुख तथा राज्य दारूबंदी कृती समितीचे जिल्हाध्यक्ष अमर कतारी यांनी दिला असून यासंबंधीचे निवेदन पोलीस उपाधीक्षकांना देण्यात आले आहे.
कतारी यांनी म्हटले आहे की, संगमनेर शहर व तालुक्याच्या हद्दीमध्ये दारू, मटका, जुगार अड्डे, गांजा विक्री आदी प्रकारचे अवैध धंदे मोठ्या प्रमाणात सुरू आहे. काही ढाबे व हॉटेलमध्येही मोठ्या प्रमाणात दारू विक्री सुरू आहे. परवानगी असलेल्या बार चालक, दारू विक्रेत्यांकडून रात्री बारा ते एक वाजेपर्यंत बेकायदेशीर रित्या दारू विक्री सुरू असते.
यापूर्वी संगमनेरमध्ये मटक्याचा मुख्य पेढ्यामार्फत ६० ते ७० ठिकाणी अवैधरित्या व्यवसाय सुरू होता आता यात तिसरा व्यक्ती सहभागी झाला असून या पेढी चालकांवर कारवाई करून त्या कायमस्वरूपी बंद कराव्यात. या व्यवसायामुळे संगमनेरमध्ये अनेक ठिकाणी वाद होत असतात.
संगमनेरमधील शांतता व सुव्यवस्था खराब होण्याचे हे एकमेव कारण असून यामुळे दोन धर्मियात दंगली होऊ शकतात. या मटका पेढ्या, अवैध जुगार अड्डे, गांजा विक्रीची ठिकाणे कुठे-कुठे आहेत. ते कोण चालवते, हे पोलिसांसह सर्वसामान्य नागरिकांनादेखील माहिती आहे. मात्र पोलीस खात्यातील काही भ्रष्ट कर्मचारी आपले आर्थिक संबंध जपण्यासाठी कर्तव्य टाळत आहे. त्यामुळे हे धंदे खुलेआम सुरू आहेत. संगमनेर मध्ये अधिकारी बदलून आला की सुरुवातीला काही दिवस हे अवैध धंदे बंद केले जातात व नंतर अधिकाऱ्यांच्या नावावर हप्ता गोळा केला जातो.
संबंधित वरिष्ठ पोलीस अधिकारी पोलीस निरीक्षक यांच्या बद्दल कोणतीही तक्रार नसून भ्रष्ट व दोषी कर्मचाऱ्यांनी अवैधधंदे करणाऱ्या व्यावसायिकांकडून ऑनलाईन पैसे घेतल्याचे स्क्रीन शॉट थेट नाशिकच्या आयजी कार्यालयात व लाच लुचपत विभागाला देण्यात येणार असल्याचे कतारी यांनी म्हटले आहे.
५ मार्चच्या आत हे सर्व धंदे बंद न झाल्यास पोलीस प्रशासनाला जाग आणण्यासाठी नाशिकच्या आयजी ऑफिससमोर आंदोलन करण्यात येणार असल्याचे व त्यात संगमनेरमधील शिवसैनिकांचा सहभाग राहणार असल्याचे कतारी यांनी म्हटले आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 843
अमर कतारी अवैध धंदे आंदोलन
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

फडणवीसांना थेट ललकारलं! ३ महिने जेलमध्ये टाकलं तरी पुन्हा येईन; ‘कॉक्रोच जनता पार्टी’चा मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात एल्गार, दादरमध्ये उद्या ठिय्या

01/10/2026

नाशिक-पुणे रेल्वे सिन्नर-संगमनेर मार्गानेच झाली पाहिजे! आमदार सत्यजीत तांबे यांचा सरकारला थेट इशारा, अन्यथा आता मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे रोखणार

01/10/2026

संगमनेर ड्रग्ज प्रकरणातील सत्य जनतेसमोर आणा; सोशल मीडियावरील ‘मीडिया ट्रायल’ त्वरित थांबवा! — काँग्रेस कार्याध्यक्ष अमोल शेलकर यांचे पोलीस प्रशासनाला आवाहन; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन पारदर्शक चौकशीचे पुरावे मांडण्याची मागणी

24/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
रविवार विशेष

रविवार विशेष लेख — फुले-आंबेडकर साहित्याला विष संबोधणारे बौद्धिक दलाल

By Annant Ppangarkar04/10/20260

प्रवीण पुरो-  एखाद्या साहित्यातील विचारांची विषाशी तुलना करणं, हे कोण्या सामान्याचं काम नाही. समाजात विद्वेष…

रविवार विशेष लेख — अस्थी नदीत विसर्जित करण्याऐवजी स्मृतींचे झाड लावू या!

04/10/2026

चंदनापुरी येथे ‘वसुंधरा पायी दिंडी’चे स्वागत व वृक्षारोपण— बदलत्या हवामानावर मात करण्यासाठी प्रत्येकाने झाड लावून संवर्धन करावे: आमदार अमोल खताळ

03/10/2026

पोलिसाच्या शेतातील बाजरीच्या कणसांवर जादूटोणा; संगमनेर तालुक्यात एकावर गुन्हा दाखल

03/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.