Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

नाशिक-पुणे बायपासवर भीषण अपघात: बुलेटची कंटेनरला धडक, तरुणाचा मृत्यू

05/10/2026

एलसीबी अन्‌ एफडीएची धडक कारवाई; १२.८१ लाखांच्या गुटख्यासह दोघांना अटक, चार जण फरार

05/10/2026

अहिल्यानगर जिल्हा बँकेसाठी संगमनेर तालुक्यातून शिवसेनेचे तीन उमेदवार मैदानात — यांनी केले अर्ज दाखल

05/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » लंडनचे पाहुणे संगमनेरात! अमृत उद्योग समूहास दिली भेट
शेती व सहकार

लंडनचे पाहुणे संगमनेरात! अमृत उद्योग समूहास दिली भेट

संगमनेरचा सहकार पॅटर्न जगासाठी अनुकरणीय
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar03/03/2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर, दि. ३

ग्रामीण भागातील नागरिकांच्या समृद्धीसाठी स्वातंत्र्यसेनानी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांनी आदर्श तत्त्वावर उभ्या केलेल्या सहकाराने आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत पारदर्शीपणे केलेल्या रचनात्मक वाटचालीमुळे संगमनेरचे हे सहकाराचे मॉडेल हे भारतासाठीच नव्हे तर संपूर्ण जगासाठी अनुकरणीय असल्याचे गौरवोद्गार लंडनमधील शिष्टमंडळाने काढले.

युरोपमधील व लंडनमधील शिष्टमंडळाने सहकाराच्या अभ्यास दौऱ्यासाठी संगमनेरच्या विविध सहकारी संस्थांना भेटी दिल्या. लंडन विद्यापीठाचे डीन जिरेमी स्मिथ, वरिष्ठ पत्रकार नाथाली मायरोथ, चैतन्य मार्कपवार यांचा समावेश होता. नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे, कारखान्याचे चेअरमन बाबा ओहोळ, दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह देशमुख, संतोष हासे, कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर, डॉ. सुजित खिलारी, संभाजी वाकचौरे आदींसह विविध अधिकारी उपस्थित होते.

या शिष्टमंडळाने सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना, राजहंस दूध संघ, राजहंस ॲक्वा, अमृतवाहिनी बँक, शेतकी संघासह विविध शैक्षणिक संस्थांना भेटी दिल्या.

प्रो. जेरेमी स्मिथ म्हणाले, भारतातील ग्रामीण भागात सहकार चळवळीतून मोठे आर्थिक परिवर्तन झाले आहे. याचे मोठे उदाहरण संगमनेर तालुका आहे. सहकारामुळे अगदी लहान लहान व्यक्तींना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणता येते. काँग्रेस लीडर आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली येथील साखर कारखाना दूध संघ शैक्षणिक संस्था याचबरोबर सर्व सहकार आणि तालुक्याचा होणारा विकास हे मॉडेल ठरणारे आहे. या सहकाराचा अभ्यास करून युरोपमध्येही हा पॅटर्न राबवता येणे शक्य असल्याचेही ते म्हणाले.

आमदार सत्यजित तांबे म्हणाले, स्वातंत्र्य सेनानी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांनी दूरदृष्टीतून हा सहकार उभा केला. आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली सहकारातील सर्व संस्था या अत्यंत सक्षमपणे काम करत आहेत. सर्व सभासद, उत्पादक, शेतकरी कामगार या सर्वांचे हित जोपासले जात असून यामुळे संगमनेरच्या बाजारपेठेत भरभराट आहे. ग्रामीण विकासातून आर्थिक समृद्धी निर्माण झाल्याने जागतिक पातळीवरील सर्व बँका संगमनेर शहरात असल्याचेही ते म्हणाले

रणजीतसिंह देशमुख यांनी राजहंस दूध संघाची तर बाबा ओहोळ यांनी कारखान्याची माहिती दिली. कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांनी सर्वांचे आभार मानले.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,653
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

सोशल मीडियावर खोटे पसरवणाऱ्यांचा बंदोबस्त करा: माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचा इशारा; संगमनेरची आर्थिक समृद्धी टिकवण्यासाठी संघर्षाचे आवाहन

21/09/2026

राज्यात सरसकट दुष्काळ जाहीर करा; माजी कृषिमंत्री बाळासाहेब थोरात यांची मागणी, रेल्वेप्रश्नी लोकप्रतिनिधीच्या बालिश वक्तव्यावरही केले भाष्य

19/09/2026

थोरात कारखान्याचे ११ लाख मेट्रिक टनाचे गाळप उद्दिष्ट; बॉयलर अग्नीप्रदीपन समारंभात बाळासाहेब थोरात यांचे आवाहन

19/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
अपघात

नाशिक-पुणे बायपासवर भीषण अपघात: बुलेटची कंटेनरला धडक, तरुणाचा मृत्यू

By Annant Ppangarkar05/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- नाशिक-पुणे बायपासवरील घुलेवाडी हद्दीत रविवारी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास बुलेट आणि…

एलसीबी अन्‌ एफडीएची धडक कारवाई; १२.८१ लाखांच्या गुटख्यासह दोघांना अटक, चार जण फरार

05/10/2026

अहिल्यानगर जिल्हा बँकेसाठी संगमनेर तालुक्यातून शिवसेनेचे तीन उमेदवार मैदानात — यांनी केले अर्ज दाखल

05/10/2026

मोठी घडामोड: संगमनेर तालुका दूध उत्पादक संघाच्या चेअरमनपदाचा देशमुख यांचा राजीनामा, नवे चेअरमन कोण? तर विधानपरिषद सभापती राम शिंदे जिल्हा बँकेची निवडणूक लढविणार नाही

05/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.