Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

एलसीबी अन्‌ एफडीएची धडक कारवाई; १२.८१ लाखांच्या गुटख्यासह दोघांना अटक, चार जण फरार

05/10/2026

अहिल्यानगर जिल्हा बँकेसाठी संगमनेर तालुक्यातून शिवसेनेचे तीन उमेदवार मैदानात — यांनी केले अर्ज दाखल

05/10/2026

मोठी घडामोड: संगमनेर तालुका दूध उत्पादक संघाच्या चेअरमनपदाचा देशमुख यांचा राजीनामा, नवे चेअरमन कोण? तर विधानपरिषद सभापती राम शिंदे जिल्हा बँकेची निवडणूक लढविणार नाही

05/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » दहा वर्षाच्या मतिमंद मुलीचा विनयभंग, आरोपीला जिल्हा न्यायालयाने ठोठावली पाच वर्षे सश्रम कारावास व दंडाची शिक्षा
न्यायालय

दहा वर्षाच्या मतिमंद मुलीचा विनयभंग, आरोपीला जिल्हा न्यायालयाने ठोठावली पाच वर्षे सश्रम कारावास व दंडाची शिक्षा

संगमनेरच्या पठार भागात घडली होती घटना
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar21/03/2024Updated:21/03/2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

गुरुवार दि. २१ मार्च, संगमनेर

१० वर्ष वयाच्या मतिमंद असलेल्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या दत्तू पंढरीनाथ डोळझाके (रा. हिवरगाव पठार, ता. संगमनेर) याला संगमनेरच्या जिल्हा न्यायालयाने पाच वर्षे सश्रम कारावास आणि २७,५०० रुपये दंडाचे शिक्षा सुनावली आहे.

२५ मे २०२२ रोजी पठार भागातील एका गावात घडलेल्या या प्रकारासंदर्भात घारगाव पोलीस ठाण्यात पीडित मुलीच्या मामाने दिलेल्या तक्रारीवरून भा. द. वि. कलम ३५४(अ), ३५४(ब), ३२३, पोस्को, अनुसूचित जाती जमाती कायद्यानुसार दत्तू पंढरीनाथ डोळझाके यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. संगमनेरचे तत्कालीन पोलीस उपाधीक्षक राहुल मदने यांनी या गुन्ह्याचा तपास केला होता.

फिर्यादी व त्याच्या कुटुंबीय घरात असताना फिर्यादीची भाची दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास घराबाहेर गेली होती. बराच वेळ झाला तरी ती घरी न परतल्याने फिर्यादी आणि त्याच्या कुटुंबीयांनी भाचीचा शोध सुरू केला. पाच वाजण्याच्या सुमारास जवळच पाचशे-सातशे मीटर अंतरावर एका शेतात फिर्यादीची भाची तिच्या अंगावरील कपडे काढलेल्या अवस्थेत आरोपी समवेत दिसली. आरोपी तिच्यासोबत तिचा विनयभंग होईल अशा पद्धतीचे लज्जास्पद वर्तन करत होता. आरोपी मुलीच्या नातेवाईकांना बघून पळून जाऊ लागल्याने त्याला पकडून घटनास्थळी पोलिसांना बोलावून त्यांच्या ताब्यात देण्यात आले होते.

पोलीस उपाधीक्षक मदने यांनी गुन्ह्याचा तपास करून न्यायालयात आरोपी विरुद्ध आरोपपत्र दाखल केले. जिल्हा न्यायाधीश योगेश मनाठकर यांच्यासमोर या खटल्याची सुनावणी सुरू होती. सरकारी वकील संजय वाकचौरे यांनी फिर्यादी पक्षाच्या बाजूने काम बघितले. खटल्यात सात साक्षीदारांच्या साक्षी न्यायालयासमोर नोंदविण्यात आल्या होत्या. यात फिर्यादी, पीडित अल्पवयीन मुलगी आणि मतिमंद विद्यार्थी शिक्षक भाऊसाहेब नरवडे यांच्या साक्षी महत्त्वपूर्ण ठरल्या.

न्यायाधीश मनाठकर यांनी फिर्यादी व आरोपी या दोन्ही पक्षाचा युक्तिवाद ऐकल्यानंतर मंगळवारी या खटल्याचा निर्णय दिला. आरोपी दत्तू पंढरीनाथ डोळझाके याला विविध कलमांतर्गत दोषी ठरवत पाच वर्षे सश्रम कारावास व २७,५०० रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. दंडाच्या रकमेतील वीस हजार रुपयांची रक्कम पीडित मुलीला भरपाई म्हणून देण्यात येणार आहे.

या खटल्यात सरकारी वकिलांना घारगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक फौजदार प्रवीण डावरे महिला पोलीस कॉन्स्टेबल स्वाती नायकवाडी, दिपाली रहाणे, नयना पंडित व प्रतिभा थोरात यांनी सहाय्य केले.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,107
न्यायालय
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेर एम.डी. ड्रग्ज रॅकेटचे धागेदोर कोणापर्यंत? जिल्हा न्यायालयात नेमकं काय घडलं… आता एक नव्हे तर चार आरोपी

28/09/2026

चेक अनादर प्रकरणात संगमनेर न्यायालयाने आरोपीस ठोठावला एक वर्षाचा कारावास; दोन लाखांची नुकसान भरपाई व ९ टक्के व्याजासह रक्कम देण्याचा निर्णय

23/09/2026

फायनान्सचा चेक बाऊन्स: अकोले तालुक्यातील कर्जदाराला ६ महिने कारावास आणि दुप्पट दंडाची शिक्षा

04/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

एलसीबी अन्‌ एफडीएची धडक कारवाई; १२.८१ लाखांच्या गुटख्यासह दोघांना अटक, चार जण फरार

By Annant Ppangarkar05/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- अहिल्यानगर येथून नगर-मनमाड रस्त्याने भिवंडी येथे बेकायदेशीरपणे विक्रीसाठी नेण्यात येणारा सुगंधीत…

अहिल्यानगर जिल्हा बँकेसाठी संगमनेर तालुक्यातून शिवसेनेचे तीन उमेदवार मैदानात — यांनी केले अर्ज दाखल

05/10/2026

मोठी घडामोड: संगमनेर तालुका दूध उत्पादक संघाच्या चेअरमनपदाचा देशमुख यांचा राजीनामा, नवे चेअरमन कोण? तर विधानपरिषद सभापती राम शिंदे जिल्हा बँकेची निवडणूक लढविणार नाही

05/10/2026

अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या रणधुमाळीत मोठा ट्विस्ट: संगमनेरमधून यांची उमेदवारी फायनल; बाळासाहेब थोरातांच्या भूमिकेकडे जिल्ह्याचे सर्वांचे लक्ष!

05/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.